Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

लातूर शहराची मुख्य बाजारपेठ गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी असलेल्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिक सहन करत आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 06, 2026 | 04:58 PM
Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:
  • गंजगोलाईत सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न उपस्थित
  • हातगाड्या, बेशिस्त रिक्षांचा नागरिकांना त्रास
  • वारंवार तक्रारी करुनही पोलिस, पालिकेचे दुर्लक्ष
 

Latur Ganjgolai Traffic: लातूर शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी लावलेल्या हातगाड्यांमुळे या भागात दिवसभर वाहतूक कोंडी होत असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गंजगोलाईचा श्वास रोखला जात आहे.

गंजगोलाई ही केवळ शहराचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची महत्त्वाची बाजारपेठ आहे. ग्रामीण भागातून तसेच जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून नागरिक रोज येथे खरेदीसाठी येतात. मात्र, बाजारपेठेच्या मध्यवर्ती रस्त्यांवर अनियंत्रित रिक्षा थांबे आणि हातगाड्यांचा वाढता विळखा यामुळे वाहतुकीचा गोंधळ वाढत आहे, यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

हेही वाचा: “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण

वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी हा परिसर अधिकच धोकादायक ठरत आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवरही होत आहे. अनेक ग्राहक गोंधळ आणि गर्दी टाळण्यासाठी गंजगोलाईत येण्याचे टाळत असल्याने नियमाने व्यवसाय करणार्या व्यापा-यांचे नुकसान होत आहे. दुकानासमोरच उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि हातगाडळांमुळे ग्राहकांना दुकाने मांडणे कठीण होत असल्याची तक्रार व्यापा-यांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस आणि महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. रिक्षांसाठी नियोजनबद्ध व स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे, हातगाड्‌यांसाठी निश्चित जागा ठरवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अन्यथा गंजगोलाईतील रोजचा बाजारपेठेचा व्यवहार आणि लातूर शहराची वाहतूक व्यवस्था आणखी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Latur Civic Polls: आयात? छे, ९० टक्के निष्ठावंत उमेदवारच विरोधकांच्या आरोपांवर संभाजी पाटील-निलंगेकरांचा पलटवार

काही रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून प्रवासी घेत असल्याने वाहतुकीची एक लेन पूर्णपणे बंद होते. या परिस्थितीचा घंट फटका दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना बसत आहे. वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने लांबच लांब रांगा लागतात. पादचा-यांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

Web Title: Latur ganjgolai traffic citizens shocked by traffic congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Latur
  • Latur news
  • Traffic

संबंधित बातम्या

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना
1

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना

Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले ‘घातपात नाही’
2

Latur Crime: लातूर हादरलं! प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा संशयास्पद आढळला मृतदेह; पोलिस म्हणाले ‘घातपात नाही’

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह
3

लातूरमध्ये खळबळ! डॉ. मेहुल राठोड यांचा गूढ मृत्यू; कारमध्ये सापडला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.