
Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
Latur Panchayat Samiti Election 2026: राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समिती निवडणूक ही पुढील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जात असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. उदंड झालेल्या इच्छुकांमध्ये यंदा बंडखोरी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रंगलेल्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारांची धावपळ वाढली आहे.
हेही वाचा: Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!
काँग्रेस, भाजपासह राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेना तसेच छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारही मैदानात सक्रिय झाले आहेत. अनेक गणांमध्ये एकाच पक्षाकडून दोन ते तीन इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारी वाटपावरून नाराजी वाढताना दिसत आहे. मागील निवडणुकांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी बंडखोरी झाली होती, त्याचा फटका संबंधित पक्षांना बसला होता. त्यामुळे यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, पंचायत समितीत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकत्यांना संधी मिळणार की बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जाणार, यावरून कार्यकर्त्यांमध्ये चर्चाना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकत्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बंडखोरी अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची चिन्हे असून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकंदरीत, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणूक उत्सुकता, संघर्ष आणि संभाव्य बंडखोरीच्या छायेत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात पंचायत समिती सदस्य हा विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार योजनांची प्रभावी अमलबजावणी है मुद्दे चंदाच्या निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे उमेदवाराची प्रतिमा, कामाचा अनुभव आणि स्थानिक जनसंपर्क या बाबी मतदारांच्या निर्णायक ठरण्याची शक्यता आहे, चंदाची पंचायत समिती निवडणूक काँग्रेस आणि भाजपातील चेट लढतीकडे झुकलेली असली, तरी काही गणामध्ये अपक्ष आणि छोटे पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतात.