• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Gears Up For Latur Zilla Parishad 2026 After Historic Municipal Win

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!

लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 18, 2026 | 01:14 PM
Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज! (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूरमध्ये काँग्रेसचा उत्साह शिगेला
  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी
  • ४५१ इच्छुकांनी केली उमेदवारीची मागणी
 
Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे लातूर व रेणापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, या प्रक्रियेत जवळपास ४५१ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने काँग्रेसमधील उत्साह आणि ताकद प्रकर्षाने दिसून आली. मुलाखतींच्या दिवशी काँग्रेस भवन परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. ही अभूतपूर्व उपस्थिती पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस आपली विजयाची परंपरा कायम राखेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

हेही वाचा: Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका

लातूर व रेणापूर तालुक्यातील अनेक गटांसाठी एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार पुढे आले आहेत. प्रत्येक इच्छुकाने आपल्या समर्थकांसह ताकद दाखवत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. विशेषतः तरुण आणि महिला इच्छुकांची संख्या लक्षणीय होती. उमेदवार निवडीत स्थानिक प्रश्नांची जाण, जनसंपर्क, संघटनात्मक काम आणि पक्षनिष्ठा या निकषांवर भर दिला जात असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सक्षम आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतः उपस्थित राहून इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतले. यामध्ये खासदार डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, लातूर ग्रामीण विधानसभा समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल; तुळजापूर तालुक्यात सत्ता समीकरणे बदलणार?

यावेळी लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित आघाडीने ७० पैकी ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील कार्यकत्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून हा विजय जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ‘बूस्टर डोस’ ठरल्याचे चित्र आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांचा हा विजय असून तोच वारसा जिल्हा परिषद निवडणुकीतही कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. मुलाखती देण्यासाठी इच्छुकांबरोबरच त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

लातूरच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखवला असून महानगरपालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेतही काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्जा असल्याचे मत खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी व्यक्त केले. मुलाखतीनंतर उमेदवारांची अंतिम यादी कधी जाहीर होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress gears up for latur zilla parishad 2026 after historic municipal win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Politics
  • ZP Election
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
1

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
2

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…
3

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…

Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…
4

Maharashtra Politics: मोठी बातमी! ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार? ‘या’ जिल्ह्यात तब्बल 155…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Jan 18, 2026 | 02:44 PM
‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा

‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा

Jan 18, 2026 | 02:41 PM
टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Jan 18, 2026 | 02:40 PM
मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

मनोज तिवारी यांच्या राहत्या घरी चोरी; लाखोंची रक्कम लंपास, ‘या’ जवळच्या व्यक्तीवर पोलिसांची कारवाई

Jan 18, 2026 | 02:38 PM
T20 World Cup मध्ये सहभागी होणाऱ्या 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या भारताच्या व्हिसाबद्दल एक मोठी अपडेट

T20 World Cup मध्ये सहभागी होणाऱ्या 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या भारताच्या व्हिसाबद्दल एक मोठी अपडेट

Jan 18, 2026 | 02:37 PM
IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

Jan 18, 2026 | 02:33 PM
भाजपच्या मुंबईतील विजयाचा जल्लोष आसाममध्ये…! PM मोदींनी महापौर अन् बहुमतावरुन केले भाजपचे कौतुक

भाजपच्या मुंबईतील विजयाचा जल्लोष आसाममध्ये…! PM मोदींनी महापौर अन् बहुमतावरुन केले भाजपचे कौतुक

Jan 18, 2026 | 02:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.