काय घडलं नेमकं?
सोनी संतोष जायभाय ही मूळची नांदेडची असून ती वाघोली येथे बायफ रोडवर वास्तव्यास होती. ही घटना सकाळी सुमारे 9.10 ते 9.15 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र बँकेजवळील बाईक रोड परिसरातील एका भाड्याच्या घरात घडली. आरोपीने आपल्या साईराज संतोष जायभाय (वय 11) या मुलाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून केला. त्यानंतर तिने धनश्री संतोष जायभाय (वय 13) या मुलीवरही हल्ला करून तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत धनश्रीने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत धनश्रीने दरवाजा उघडताच शेजाऱ्यांनी तिला तातडीने वाघोली येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
पोलीस तपास सुरु
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घरातील दृश्य पाहून घाबरले. आरोपी महिला हत्या केल्यानंतर त्या मुलाच्या शेजारी बसली होती. हात पाय रक्ताने माखलेले होते. घरात सगळीकडे रक्ताच्या खुणा होत्या. पोलिसांनी आरोपी सोनीला अटक केली आहे. तिने हत्या का केली? या हत्येमागचं कारण काय? कौटुंबिक वादाने केली मानसिक तणाव? या मागचे कारण पोलीस तपासात आहे. आता या हादरवणाऱ्या घटनेनंतर पोलीस तपासातून नेमकी कोणती बाब आणि गुपितं उघडकीस येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Ans: पुण्यातील वाघोली परिसरात, बाईफ रोड भागात.
Ans: आईने 11 वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आणि मुलीवरही जीवघेणा हल्ला केला.
Ans: आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले असून हत्येमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.






