Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिवंत असताना मतदार यादीत दाखविले मयत, काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप; उपोषणाचाही दिला इशारा

स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून 'मयत' यादीत टाकण्यात आल्याचा दावा चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 02:53 PM
अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली

Follow Us
Follow Us:

चाकूर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान चाकूर शहरातील मतदार यादीत गंभीर त्रुटी आढळल्याचा आरोप चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून ‘मयत’ यादीत टाकण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूर शहरातील भाग क्रमांक २८९ मध्ये त्यांचे नाव २००२ पासून मतदार यादीत समाविष्ट असून त्याची मॅपिंगही झाली आहे. विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओकडे गणना फॉर्म भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे नाव यादीत दिसून आले नाही. सखोल चौकशीअंती बीएलओकडून त्यांचे नाव ‘मयत’ यादीत असल्याचे सांगण्यात आले. ही बाब समजल्यानंतर मोठा मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात चौकशी केली असता, २००२ पासून नाव अस्तित्वात असूनही एप्रिल महिन्यात ते ‘मयत’ म्हणून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व पुतण्यांची नावे मतदार यादीत कायम असताना केवळ स्वतःचेच नाव वगळण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकार केवळ तांत्रिक चूक नसून जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय व्यक्त करत, यामागील दोषी अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने राजकीय हेतूने मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

हे सुद्धा वाचा : वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

तहसीलसमोर आमरण उपोषणाचा दिला इशारा

याप्रकरणात २८ जुलै २०२६ पर्यंत न्याय न मिळाल्यास तहसील चाकूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा हुसेन (पप्पुभाई) शेख यांनी दिला आहे. आपण मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचे नमूद करत, उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

Web Title: Chakur congress city president hussain shaikh has made serious allegations regarding the voter list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Congress
  • Latur
  • Voter List

संबंधित बातम्या

Voter List 2026 : मतदार यादीत नाव आहे का? 26 ऑक्टोबरपूर्वी हे काम करून घ्या ! राज्यातील मतदारांसाठी चार दिवस विशेष शिबिरं
1

Voter List 2026 : मतदार यादीत नाव आहे का? 26 ऑक्टोबरपूर्वी हे काम करून घ्या ! राज्यातील मतदारांसाठी चार दिवस विशेष शिबिरं

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
2

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता
3

Jantar-Mantar बाबत मोठी घडामोडी, थेट सुप्रीम कोर्टात याचिका, गुरुवारी सुनावणीची शक्यता

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
4

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.