
Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी
Sangali News: प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजप नेत्यांचा राडा; आयात उमेदवारांवरुन जोरदार संघर्ष
या पत्रामध्ये आधी मंजूर झालेला मार्ग अंतर व वेळेच्या दृष्टीने अधिक खर्चिक असल्याचे नमूद करून नवीन मार्ग अधिक फायदेशीर ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र ही शिफारस शासनाची दिशाभूल करणारी असून अंबेजोगाई, केज व बीड परिसरातील जनतेवर अन्याय करणारी असल्याचा आरोप केज विकास संघर्ष समितीने केला आहे. नवीन मार्गामुळे कृषी व उद्योगधंद्यांना लाभ होईल, असा युक्तिवाद करण्यात आला असला तरी मग बीड जिल्ह्यात कृषी, उद्योग व व्यवसाय नाहीत काय, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार शासनाने आधी मंजूर केलेला मार्ग हा विचारपूर्वक आखलेला असून या मार्गामुळे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई, केज, बीड ही प्रमुख तालुका ठिकाणे तसेच जिल्हा मुख्यालय थेट जोडली जाणार आहेत. यामुळे त्याप्रमाणेच मार्ग करण्याची मागणी होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या आंदोलनाद्वारे प्रस्तावित मार्गात कोणताही बदल न करता आधी मंजूर झालेल्या मार्गालाच अंतिम मंजुरी देण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी परिसरातील सर्व आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची व आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा निर्धार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी व्यक्त केला आहे.
Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात
या मागणीच्या निषेधार्थ सोमवार २९ डिसेंबर रोजी केज विकास संघर्ष समिती केज शहरातील नागरिकांच्या सहभागाने सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केज शहर कडकडीत बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.