Sangali News: उमेदवारीसाठी मुंबईत प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजपच्या नेत्यांनी असं काही केलं...
Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल
भाजपमध्ये (BJP) मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवरुन अंतर्गत कलह सुरु आहे. याबाबत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गुरुवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि जेष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. प्रदेशाक्षांसमोर झालेल्या बैठकीत नेत्यांतील वाद चांगलाच उफाळून आला.
नवा-जुना वाद, पक्षातील गट-तट यातून एकमत होण्यास अडचणी येत असल्याने उमेदवारीबाबतचा वाद थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंंत पोहोचला होता. दिग्गज नेत्यांसमोर जागांचा तिढा सुटेल असा विश्वास नेत्यांचा होता. परंतु उमेदवारी जागा वाटप करताना प्रदेशाध्यांसमोरच स्थानिक नेत्यांचा वादाला तोंड फुटले. काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या गटाला जागा देण्यावरुन चर्चेला सुरुवात झाली. पक्ष प्रवेशकरतेवेळी नेत्यांना काही आश्वासने देण्यात आली आहेत. ती आपल्याला पाळायला हवीत, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे पक्षातील नेत्यांना जागा वाटप करताना जुळवून घ्यावे लागेल, असेही सूचित करण्यात आले.
Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
नव्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जागा दिल्या जाणार असतील तर भाजपच्या जुने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कशी संधी दिली जाणार याबाबत स्पष्टता करण्याची मागणी जेष्ठ आमदारांनी केली. महिला नेत्याच्या गटाला सात ते नऊ जागा देण्याबाबत नेत्यांत एकमत झाले. मात्र आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तुम्हांला जे काय करायचे ते करा, असे सांगत बैठकीतून निघून गेल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. याबाबत सांगलीच्या आमदारांनी अद्याप अधिकृतपणे कोणताही खुलासा केलेला नाही. (Maharashtra Municipal Election 2025)
उमेदवारी जाहीर करताना अनेक विद्यमान आणि अनुभवी उमेदवारांचा पत्ता करण्यात येत आल्याबद्दल काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमच्या प्रभागात उमेदवारी देण्यात यावी. तसेच पॅनेलमध्ये स्थानिक नेत्यांची मत विचारात घेवूनच निश्चित करण्याची विनंती करण्यात आली. पॅनेल तयार करताना विश्वासात घेणार नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, असा इशाराही काही मंडळींनी दिल्याची चर्चा सुरु आहे. उमेदवारी निश्चित करताना वाद विकोपाला गेल्याचे लक्षात येताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या सर्वच नेत्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान उमेदवारी निश्चित करताना भाजपमधील अनेक इच्छुकांची निराशा होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. भाजपमधील नाराज विरोधकांच्या हाताला लागू नयेत, यासाठी भाजपची उमेदवारी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यास विलंब होणार असल्याचे चित्र आहे. असे असले तरी काही प्रभागात भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून कामाला लागा असे तोंडी आदेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी मंगळवारी (दि. 30) रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा सुरु होती. पक्षाच्या जेष्ठ महिला नेत्यांनी माझ्या प्रभागात माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. नव्याने प्रवेश केलेल्या तरुण नेत्याच्या उमेदवारीवर माझा आक्षेप आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हांलाच उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा प्रदेश कार्यालयासमोर आत्मदहन करु, अशी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकारानंतर संबंधित जेष्ठ नेत्यांनी महिला नेत्याची मनधरणी केली असल्याचे समजते.






