Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2026 | 01:24 PM
लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 'या' तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 'या' तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Follow Us
Follow Us:

लातूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटीस टप्पा व दावे-हरकतींचा निपटारा करण्यात येणार असून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

२३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास नवीन नाव नोंदणी, नावातील दुरुस्ती अथवा हरकती निर्धारित मुदतीत दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांना संबंधित बीएलओ किंवा तहसील कार्यालयातही ती पाहता येणार आहे.

उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीमध्ये आढळलेले अनमॅप्ड २३,६९८ मतदार आणि अॅनोमलीज असलेले २९,४२७ मतदार, अशा एकूण ५३,१२५ मतदारांच्या दाव्यांची व हरकतींची सुनावणी ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या नोटीस टप्प्याच्या कालावधीत घेतली जाणार आहे. ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, तसेच १ ऑक्टोबर २००६ पूर्वी जन्म झालेल्या व १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना अथवा नव्याने विवाह झालेल्या महिलांना फॉर्म ६ द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. यासाठी रंगीत छायाचित्र, आधार कार्ड, दहावीची सनद अथवा टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र अथवा शालेय प्रवेश निर्गम उतारा, वडिलांचे किंवा आईचे निवडणूक-ओळखपत्र, वीज बिल, सन २००२ मध्ये आजी अथवा आजोबा किंवा आई अथवा वडिलांच्या नावाचा मतदार यादीतील तपशील, मतदाराचा मोबाईल क्रमांक, आवश्यकतेनुसार विवाह नोंदणी प्रमाणपत्र -आदी कागदपत्रे सादर करावी लागतील. नाव, पत्ता, वय किंवा छायाचित्रामध्ये-दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म-८ भरावा.

हे सुद्धा वाचा : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

सुनावणीस उपस्थित राहण्याचे मतदारांना आवाहन

सर्व फॉर्म ईसीआय नेट अॅपद्वारे ऑनलाईन तसेच संबंधित बीएलओकडे ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनमॅप्ड आणि अॅनॉमलीज श्रेणीतील मतदारांची सुनावणी घेऊन आवश्यक पुराव्यांच्या आधारे अंतिम यादीत नावे निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केले आहे.

Web Title: The draft electoral roll for the latur city assembly constituency has been published

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Election Commission
  • Latur news
  • Voter List

संबंधित बातम्या

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश
1

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
2

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…
3

Ratnagiri मध्ये १ लाख ३१ हजार मतदार नावे वगळली; SIR प्रक्रियेत दावे व हरकती…

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
4

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.