Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter List 2026 : मतदार यादीत नाव आहे का? 26 ऑक्टोबरपूर्वी हे काम करून घ्या ! राज्यातील मतदारांसाठी चार दिवस विशेष शिबिरं

Voter List 2026 : महाराष्ट्रातील सर्व मतदान केंद्रांवर 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी मतदार यादीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मतदारांनी आपलं नाव तपासून नवीन नोंदणी, दुरुस्ती किंवा हरकतींसाठी आवश्यक अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 09:38 PM
SIR Voter List

SIR Voter List

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात मतदार यादीसाठी विशेष शिबिरं
  • राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर 17 ते 25 ऑक्टोबरदरम्यान विशेष शिबिरं
  • निवडणूक आयोगाची विशेष मोहीम
 

Voter List 2026 : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत पात्र नागरिकांची नावं समाविष्ट व्हावीत, यासाठी महाराष्ट्रात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी मतदार यादीतील आपलं नाव तपासावं आणि आवश्यक असल्यास 26 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती सादर कराव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

चार दिवस मतदान केंद्रांवर विशेष शिबिरं

या मोहिमेसाठी राज्यातील 36 जिल्हा निवडणूक अधिकारी, 288 मतदार नोंदणी अधिकारी, 7,100 सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि 1 लाख 253 केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. शिबिरांदरम्यान मतदान केंद्रांवर अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना नोंदणी, दुरुस्ती आणि अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करतील.

BEST Bus : भांडुपमध्ये बेस्ट बससेवेचा बोजवारा; तासनतास प्रतीक्षा, खच्चून गर्दी; प्रवाशांचे हाल, तरीही प्रशासन ढिम्म्!

मतदार यादीत नाव नसेल तर कोणता अर्ज भरायचा?

  • अर्ज क्रमांक 6
मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नवीन नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक 6 भरता येईल.
  • अर्ज क्रमांक 7
मतदार यादीत समाविष्ट असलेल्या एखाद्या नावाबाबत नियमानुसार आक्षेप नोंदवायचा असल्यास किंवा नाव वगळण्याची विनंती करायची असल्यास नमुना अर्ज क्रमांक 7 वापरता येतो.
  • अर्ज क्रमांक 8
निवासस्थान बदललं असेल, वैयक्तिक तपशिलात दुरुस्ती करायची असेल, नवीन मतदार ओळखपत्र (EPIC) हवं असेल किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करायची असेल, तर नमुना अर्ज क्रमांक 8 भरता येतो.

मतदार यादी तपासण्यासाठी हेल्पलाइन 1950

मतदार नोंदणी किंवा अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास नागरिकांनी ‘1950’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हानिहाय मदत केंद्रांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदार यादीतील नाव आणि तपशील वेळेत तपासून आवश्यक अर्ज सादर केल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी टाळता येऊ शकतात. त्यामुळे पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा आणि निर्धारित मुदतीत आपले दावे व हरकती नोंदवाव्यात.

पाणी वाचवणे हेच प्रथम कर्तव्य! पुणेकरांवर २५ टक्के कपातीचे संकट? जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाने चर्चेला उधाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात मतदार यादीसाठी विशेष शिबिरं कधी होणार आहेत?

    Ans: 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Que: मतदार यादीत नाव नसेल तर कोणता अर्ज भरावा?

    Ans: नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज क्रमांक 6 भरता येतो.

  • Que: मतदार यादीसंदर्भात मदत कुठे मिळेल?

    Ans: नागरिक ‘1950’ या मतदार हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Web Title: Maharashtra voter list 2026 special camps october 26 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • election commission of india
  • Voter List

संबंधित बातम्या

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!
1

SIR Voter List: मतदार यादीतून नाव वगळले? पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; मात्र मतदारांच्या अनास्थेमुळे BLO हैराण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.