Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ‘सीएसएमटी ‘च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण

घुमटातील गळतीची कायमस्वरूपी दुरुस्ती सुरू असून संपूर्ण संवर्धन प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या गळतीनंतर आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केले जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 08:47 AM
'सीएसएमटी 'च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण

'सीएसएमटी 'च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:

मुंबईची ओळख असलेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील ऐतिहासिक मध्यवर्ती घुमटातून झालेल्या गळतीमागील कारण स्पष्ट झाले आहे. शंभराहून अधिक वर्षे जुन्या दगडी बांधकामातील सांधे आणि कालांतराने सच्छिद्र झालेल्या दगडांमधून पावसाचे पाणी आत शिरत असल्याने ही गळती होत असल्याचे रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आरएलडीए) ने सांगितले आहे. सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर सीएसएमटीच्या मध्यवर्ती घुमटातून पाणी गळू लागले. त्यानंतर घुमटाखालील फोयर परिसर तात्पुरता बंद करण्यात आला. गळणारे पाणी नियंत्रित करण्यासाठी जमिनीवर शोषक चटया टाकण्यात आल्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिके उभारण्यात आले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

गळतीमागील कारणांचा केला उलगडा

आरएलडीएने दिलेल्या माहितीनुसार, ही गळती शतकभराहून अधिक काळ पाऊस, उष्णता आणि वातावरणातील बदलांना तोंड देणाऱ्या दगडी बांधकामातील सांधे कमकुवत झाल्यामुळे होत आहे. तसेच काही दगड नैसर्गिकरीत्या सच्छिद्र झाल्याने त्यातून पावसाचे पाणी झिरपत असून त्यामुळे घुमटात गळती निर्माण झाली आहे. वारसास्थळ असल्यामुळे या इमारतीवर आधुनिक जलरोधक साहित्याचा वापर करता येत नाही. मूळ वास्तुशैली आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य जपत पारंपरिक संवर्धन पद्धतीनेच दुरुस्तीचे काम सुरू आहे.

३१ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

आरएलडीएच्या माहितीनुसार, घुमटातील गळतीची कायमस्वरूपी दुरुस्ती सुरू असून संपूर्ण संवर्धन प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या गळतीनंतर आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असून ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप जपत संवर्धन केले जात आहे.

आझाद मैदानावर पान व्यावसायिकांचा ऐतिहासिक मोर्चा; IPC 328 आणि MCOCA च्या कथित गैरवापराविरोधात लाखोंचा आवाज

तज्ज्ञ संस्थांनी घेतला कामामध्ये सहभाग

या संवर्धनासाठी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय), भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (इंटॅक), केंद्रीय भवन संशोधन संस्था (सीबीआरआय), वारसा संवर्धन तज्ज्ञ आणि संरचनात्मक अभियंते यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.दगडी सांध्यांवर पारंपरिक चुना आणि गुळाचे मिश्रण वापरले जात असून, ग्रॅव्हिटी ग्राउटिंग तंत्राद्वारे दगडांतील पोकळ्या भरल्या जात आहेत.सच्छिद्र दगडांवरील उपचारासाठी अंतिम कार्यपद्धती तज्ज्ञ निश्चित करत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Leakage in csmt dome porosity of old stones identified as the cause rlda issues clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • CSMT
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
1

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
2

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
3

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…
4

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.