Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lek Ladki Yojana: मुलींच्या पालकांसाठी मोठी बातमी! ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सोपी; थेट खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या

Lek Ladki Yojana: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो फेच केली जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 15, 2026 | 04:31 PM
अकोल्यात 'लेक लाडकी'चा 888 कुटुंबांना लाभ; 44 लाखांचा निधी वितरित, आता DBT तून मिळणार निधी

अकोल्यात 'लेक लाडकी'चा 888 कुटुंबांना लाभ; 44 लाखांचा निधी वितरित, आता DBT तून मिळणार निधी

Follow Us
Follow Us:
  • ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ आता अधिक सुलभ
  • थेट खात्यात जमा होणार रक्कम
  • ‘आपले सरकार’ पोर्टलवरून करता येणार ऑनलाइन अर्ज
Lek Ladki Yojana: लेक लाडकी या योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ‘लेक लाडकी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा यासाठी आता अर्ज प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासोबतच अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

१ एप्रिल २०२३ पासूनच्या पात्र लाभार्थ्यांना संधी

यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी १ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.

आधारच्या आधारे माहिती ऑटो फेच

नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो फेच केली जाणार आहे. तसेच लाभार्थी मुलगी, तिची माता आणि पिता यांची ई-केवायसी करण्यात येणार आहे. यामुळे पालकांना प्रत्येक टप्प्यावर पुन्हा पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार आहे. योजनेच्या पुढील टप्प्यांतील लाभांसाठी पुन्हा स्वतंत्र अर्ज करण्याचीही गरज राहणार नाही.

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

लाभ थेट बँक खात्यात

योजनेच्या लाभाची रक्कम थेट संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे (Direct Benefit Transfer) जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बँक खात्याची स्वतंत्र माहिती पुन्हा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, अर्ज करताना अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही.

प्रक्रियेत नेमके काय बदलणार?

‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाइन अर्जाची सुविधा
आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी
आधार क्रमांकाच्या आधारे माहिती ऑटो फेच
लाभार्थी, माता आणि पिता यांची ई-केवायसी
पुढील टप्प्यांसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही
लाभाची रक्कम थेट संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा
बँक खात्याची स्वतंत्र माहिती देण्याची आवश्यकता नाही
अंगणवाडी केंद्राची माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही

या सुलभीकरणामुळे अर्ज प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे. परिणामी अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

‘लेक लाडकी’ योजनेत किती मिळतो लाभ?

१ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना या योजनेअंतर्गत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.

  • टप्पा मिळणारा लाभ
  • मुलीच्या जन्मानंतर ₹5,000
  • इयत्ता पहिलीत प्रवेश ₹6,000
  • इयत्ता सहावीत प्रवेश ₹7,000
  • इयत्ता अकरावीत प्रवेश ₹8,000
  • मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ₹75,000
  • एकूण ₹1,01,000
अशा प्रकारे पात्र मुलीला योजनेअंतर्गत एकूण १ लाख १ हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळू शकतो.

कोणाला मिळतो लाभ?

‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाने महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. योजनेचा मुख्य उद्देश केवळ आर्थिक मदत देणे हा नसून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे.

पालकांसाठी महत्त्वाचे

नवीन प्रक्रियेमुळे पालकांना योजनेचा अर्ज करण्यासाठी अनेक कार्यालयांमध्ये कागदपत्रांसह जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. ऑनलाइन अर्ज, आधार आधारित माहिती, ई-केवायसी आणि थेट डीबीटी यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. थोडक्यात, ‘लेक लाडकी’ योजनेतील नव्या सुलभ प्रक्रियेमुळे अर्जापासून लाभाच्या वितरणापर्यंतची प्रक्रिया अधिक डिजिटल आणि पारदर्शक होणार असून, पात्र मुलींच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

Web Title: Lek ladki yojana online application process simplified direct dbt benefit maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Government Scheme
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.