तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण वाढले (फोटो- सोशल मीडिया)
दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र
वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले
बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला
गुहागर: तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असून येथे मोठी व दाट जंगलेआहेत. ही जंगले वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास मानली जातात. मात्र गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, ओसाड होत चाललेले डोंगर, बेकायदा उत्खनन, वाढती शिकार, जंगलातील पाणीस्रोतांचा हास आणि मानवी वावरात झालेली वाढ यामुळे (Leopard)वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणात मोठी धरणे,जलाशय व अनेक नद्यांच्या काठावर दाट जंगलांचा पट्टा आहे. याच परिसरातलाहान-मोठी गावेच वाड्यावस्त्या वसलेल्या असून येथील नागरिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून शेळीपालन, आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन हे जोडधंदे मोठ्या प्रमाणावर केले जातात. भात, कडधान्ये तसेच खरीप व रब्बी ग्रामीण व दुर्गम भागांनाही बसत आहे.
मानवनिर्मित कारणाने वन्यप्राणी नागरी वस्तीत
वृक्षतोडीमुळे जंगल क्षेत्र झपाट्याने कमी होत वृक्षारोपणाचे उपक्रम केवळ फोटोसेशन व प्रसिद्धीपुरते मर्यादित राहिले असून, लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन न केल्याने मोजकीच झाडे तग धरत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड हा सरळ व्यवसाय बनला असून, यात काही वनरक्षकांचा सहभाग असल्याच्या चचर्चाही रंगू लागल्या आहेत. नैसर्गिक कारणांपेक्षा मानवनिर्मित कारणांमुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, पाळीव प्राण्यावर होणान्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे.
बिबट्यांना रोखण्यास ‘थर्मल ड्रोन’ सह ५०० ट्रॅप कॅमेरे, संगमनेरमध्ये हायटेक यंत्रणेचा वापर
बिबट्याच्या वाढत्या वावराला जबाबदार कोण?
जनावरे रानात चरायला सोडणे धोकादायक बनले असून, अनेक गावांमध्ये नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील काही महिन्यांत बिबट्याचा ग्रामीण भागासह शहरी परिसरातही वावर वाढला आहे. गुहागर तालुक्यामधील खोडदे येथे गायीच्या पाढ़शावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली असून गुहागर तालुक्यातील त्रिशुल साखरी, वाकी पिपळवट, विवट्जाचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.
बिबट्याची आता खैर नाही! संगमनेरमध्ये घुमतोय ‘कार्बाइड गन’ चा आवाज, ग्रामीण भागात सर्रास वापर
बंदुकीच्या परवान्यांचा गैरवापर केल्याचा आरोप
दुर्गम भागातील काही गावामध्ये संरक्षणाच्या नावाखाली देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, शिकारीसाठी या बंदुका वापरणे, व्यावसायिक शिकायऱ्यांना बोलावू जंगलात पार्ट्या आयोजित करणे तसेच वन्यप्राण्यांच्या मांसाची विक्री केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत याकडे संबंधित शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






