Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला बिबट्या आला! ‘या’ जिल्ह्यात मानवी वस्तीत वावर वाढला; तब्बल 46 जणांवर…

भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरीमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2025 | 02:52 PM
आला रे आला बिबट्या आला! ‘या’ जिल्ह्यात मानवी वस्तीत वावर वाढला; तब्बल 46 जणांवर…
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यात वाढला बिबट्यांचा वावर
अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण
विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय

दिनेश चव्हाण/गुहागर:  जिल्ह्यातील मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढत चालला असल्याने अनेक गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. बिबट्या दिवसाही माणसावर हल्ला करत आहे. काही ठिकाणी तर बिबट्‌या आणि मानव यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ०९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात फासकीत अडकलेल्या तसेच विहिरीत पडलेल्या बिबट्यांची नोंद लक्षणीय आहे. त्याचबरोबर अज्ञात वाहनांच्या धडकेत, विहिरीत कोसळल्याने तसेच उपासमारीमुळे बिबट्यांचे मृत्यू वाढत चालले आहेत. मध्यंतरी फासकीत अडकून मृत्युमुखी पडणाऱ्या बिबट्यांची संख्या वाढल्यानंतर पोलिस वनविभागाने फासकीविरोधात कडक धोरण अवलंबले. त्यामुळे त्यामध्ये घट दिसून येत असली तरी आता हळूहळू फासको डोके वर काढत असल्याचे अधूनमधून घडत असलेल्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

Ahilyanagar News: बिबट्याच्या हल्ल्याचा परिणाम शाळांच्या वेळांवर! आता परिपाठात शिकवण्यात येणार सुरक्षिततेचा धडा

बिबट्या पकडण्याच्या साहित्यासाठी निधी
मानवी वस्तीमध्ये आढळणाऱ्या बिबट्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाला जिल्हा नियोजन मंडळातून अधिकचा निधी देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे, कैमेरा ट्रॅप, वाहने आणि ड्रोन पुरवण्यात आले आहे.

बिबटवाचा वावर असलेल्या भागात एआय-आधारित अलर्ट प्रणाली बसवण्याची योजना आहे. जेणेकरून बिबट्या गावात शिरल्यास पूर्वसूचना मिळेल, बिबटांचे स्थलांतर आणि नसबंदी वासारख्या दीर्घकालीन उपायावरही विचार सुरू आहे.
– सर्वर खान, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण

मृत्यू, ३४ बिबट्यांचा ३२ बिबट्यांची सुटका
रत्नागिरीत २०२२ ते २०२५ या कालावधीत ३४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद आहे. तर विविध घटनांमध्ये अडकलेल्या ३२ बिबट्यांची सुटका करण्याच्या मोहिमाही यशस्वी झाल्या आहेत. २०२२ मध्ये ३, २०२३ मध्ये १३, २०२४ मध्ये १४ तसेच २०२५ मध्ये १७ मृत बिबट्यांची नोंद झाली आहे. याचा अर्थ मृत बिबट्यांची संख्या वाढते आहे. हे मृत्यू नैसर्गिक नाहीत, ही चिंतेची गोष्ट आहे.

मोठी बातमी! बिबट्यांचा धोका कमी होणार; केंद्र सरकारने दिली ‘या’ कृतीला मान्यता

दाभोळे गावात आढळून आले बिबट्याचे पांढरे पिल्लू
भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरीमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावात प्रथमच महाराष्ट्रात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू (अल्बिनो किवा ल्युसिस्टिक) आढळून आले. ही वन्यजीव अभ्यासकांसाठी एक महत्त्वाची घटना होती, समुद्र किनाऱ्याजवळच्या गावांमध्येही आता बिबट्याचे वास्तव्य दिसू लागले आहे. त्याच्यासाठी जंगलात रानडुक्कर, ससा व इतर प्राणी खाद्य म्हणून उपलब्ध आहे; परंतु बिबट्या आता दिवसाही मनुष्यवस्तीतील श्वानांना लक्ष्य करू लागला आहे. जंगलांची बेसुमार तोड आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या विकासकामांमुळे वन्यप्राण्यांनी आपले हक्काचे अधिवास गमावले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुठे आढळला पांढरा बिबट्या?

    Ans: रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावात प्रथमच महाराष्ट्रात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू (अल्बिनो किवा ल्युसिस्टिक) आढळून आले

  • Que: गेल्या तीन वर्षांमध्ये किती बिबट्यांचा मृत्यू?

    Ans: रत्नागिरीत २०२२ ते २०२५ या कालावधीत ३४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद आहे.

Web Title: Leopard attack increase at ratnagiri district guhagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?
1

Ratnagiri news : धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
2

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

दोन सख्ख्या बहिणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, अचानक बिबट्याने झडप घातली अन्…; ओतूरमधील धक्कादायक घटना
3

दोन सख्ख्या बहिणी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या, अचानक बिबट्याने झडप घातली अन्…; ओतूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.