
रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
सोमवारी (6 जुलै 2026) रात्री नऊ ते दहा च्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. दुर्घटना झाल्याचे समजताच महसूल पोलीस प्रशासन, एनडीआरएफ टीम व स्थानिक ग्रामस्थ व खेड येथील मदत पथकाने धाव घेतली. या सगळ्यांकडून सुरू असलेल्या तब्बल 21 तासांच्या शोधकार्यानंतर ढिगाराखाली अडकलेल्या दोघांचे मृतदेह मंगळवारी सायंकाळी मिळाले. सतीश शांताराम शेलार (वय 35) आणि शांताराम बलराम शेलार (वय ८४) या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री उशिरा या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक अनिल अहिरे, मंडळ अधिकारी अर्चना शिरोडकर , मदत बचाव पथक कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी मार्गस्थ होऊन ढिगऱ्याखाली अडकलेल्या कल्पना शांताराम शेलार (वय ७३) या महिलेचे प्राण वाचले आहेत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ही मोठी दरड दुर्घटना समजल्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही तातडीने शोधकार्यात स्वतः उतरले होते. एनडीआरएफ स्थानिक ग्रामस्थ व खेड मदत ग्रुप या सगळ्यांच्या भर पावसात सुरू असलेल्या शोधकार्याच्या अथक प्रयत्नामुळे 21 तासानंतर मृतदेह मिळाले.
Ratnagiri : पूरस्थिती, भूस्खलन आणि विरोधकांवर उदय सामंतांचा पलटवार
याच वाडीतील मुंबई घाटकोपर येथे राहणारे विजय सहदेव शेलार हे एका कार्यासाठी गावी आले होते ते ट्रेन लेट झाल्याने सायंकाळी उशिरा साडेसात दहिवली येथे गावी पोहोचले त्यांच्यासाठी घरी जेवणाची वाट पाहत कुटुंब थांबलं होत. जेवणानंतर ते साडेनऊच्या दरम्यान सहज बाहेर आले त्यावेळेला शेजारच्या चुलत्यांची दोन घर दिसत नव्हती यावेळी प्रसंगावधान राखत विजय यांनी केशव शेलार व मुक्ताबाई शेलार या दोघांना बाहेर काढल्याने ते बचावले आहेत. याच दरम्यान त्याही घरावर मोठे झाड कोसळलं तेही घर दरडीखाली विजय शेलार यांनीही वीस फूट खाली उडी मारल्याने ते सुदैवाने बचावले आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. विजय शेलार यांच्यामुळेच हा घडलेला प्रसंग कळला नाही तर ही दुर्घटना कदाचित दुसऱ्या दिवशीपर्यंतही कळली नसती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
खेड तालुक्यातील आपत्तीचे ठिकाणी व बाजारपेठ परिसरात पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सकाळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरड कोसळून अडकलेल्या कुटुंबाला शासनाकडून चार लाखाची मदत दिली जाईल तसेच खवटी येथील जाधव व दळवी कुटुंबाला शासनाकडून मदत मिळेलच पण आम्ही शिवसेनेकडूनही मदतीचा हात दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर काही वेळातच स्थानिक आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड खवटी व दहिवली या दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांनीही दरड दुर्घटनाग्रस्त कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला.
या सगळ्या लँडस्लाईड घटनांचे मुख्य कारण शोधणे गरजेचे आहे. आपण आत्ता पाहिलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी येथे सपाट रस्त्यावर कोकणातून मुंबईकडे जाताना डाव्या बाजूला सुमारे दोनशे तीनशे फूट लांब अंतरावर असलेला अख्खा डोंगरच शिफ्ट होऊन रस्त्यावर आला खेड तालुक्यात दहिवली येथेही दरड कोसळली दरड कोसळली. या मागची कारण शोधणे आवश्यक आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान खवटी परिसरात घडलेल्या घटनेनंतर या डोंगरावर काही महिन्यांपूर्वी या परिसरात वृक्षतोड करण्यात आली अशी चर्चा परिसरात सुरू असुन त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करणारी भीती गाव परिसरातील नागरिक विजय जाधव व सखाराम दळवी यांनी व्यक्त केली आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली त्याच नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेल नाही. मात्र या सगळ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खवटी गावच्या सरपंच मानसी पाटील यांनी सांगितले की, आमच्या गावात असा काही प्रकार घडेल असं कधी वाटले नव्हते हे नेमकं कशामुळे घडले हे सांगता येत नाही कोसळणारा मोठा पाऊस व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही दुर्घटना घडली असावी. वृक्षतोडीबाबत बाबत विचारला असता त्यांनी सांगितलं की याबद्दल मला माहिती नाही पण यापुढे गाव परिसरात कोणतीही काम करताना वृक्षतोड परवानगी देताना आधी ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी अशा स्वरूपाचे पत्र आपण महसूल व वन विभागाला देणार असल्याची प्रतिक्रिया खवटी सरपंच मानसी पाटील यांनी दिली आहे. आमच्या घराच्या अंगणातच डोंगर आला होता साक्षात काळ दारात उभा होता दैव बलवत्तर म्हणून आम्हाला मागच्या बाजूने ग्रामस्थांनी बाहेर काढले ही भीती आजही कायम आहे त्या रविवारच्या मध्यरात्रीपासून आम्ही कुटुंब झोपलेलो इतकी भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ महिला सीताबाई कृष्णा जाधव यांनी दिली आहे.
Ratnagiri : पूरस्थिती, भूस्खलन आणि विरोधकांवर उदय सामंतांचा पलटवार
दरम्यान याच खवटी गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास नवीन बांधण्यात झालेल्या अंगणवाडीच्या इमारती जवळ असलेल्या डोंगराची खाली आल्याने अंगणवाडीच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे या घटनास्थळी खवटी गावचे सरपंच पोलीस पाटील तलाठी यांनी भेट दोन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान खेड तालुक्यात खवटी येथे आलेला डोंगर दहिवली शेलारवाडी येथे कोसळलेली दरड या सगळ्या डोंगर परिसरात काहीतरी छेडछाड झाली असल्याशिवाय हे प्रकार घडलेले नाहीत.नाहीतर अशा दुर्घटना घडतील व आणखी जीव जातील त्यामुळे या सगळ्या घटनांची चौकशी करण्याची मागणी आपण लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पालकमंत्री, गृहराज्यमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे करणार आहोत अशी प्रतिक्रिया खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली आहे.