Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची कडा खचणे, दरड कोसळण्याचा धोका आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 05:07 PM
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद; पर्यटकांना नो-एंट्री

Follow Us
Follow Us:
  • पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी!
  • दरडीच्या धोक्यामुळे रघुवीर घाट १० ऑगस्टपर्यंत बंद
  • पर्यटकांना नो-एंट्री
Monsoon Tourism News Marathi : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील रस्त्यांची झालेली मोठी हानी आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

रस्ता खचल्याने प्रशासनाचा निर्णय

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात साखळी क्रमांक १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याचा कडा तुटला आहे. तसेच १००/५०० ते १०५/५०० किलोमीटर या पट्ट्यात डांबरी रस्ता आणि साईडपट्टी खचली असून अनेक ठिकाणी माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. रस्त्याला तडे गेल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

पर्यटकांना पूर्णपणे प्रवेशबंदी

पावसाळ्यात रघुवीर घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात. मात्र, सध्याची धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन घाटातील सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांना थांबण्यास तसेच खासगी वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या जड वाहनांनाही या मार्गावरून वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवांना दिलासा

प्रशासनाने अत्यावश्यक सेवांचा विचार करून अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला आवश्यकतेनुसार परवानगी दिली आहे. मात्र, या वाहनांनाही अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात डोंगरभागात दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढलेला असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

रघुवीर घाट हा कोकणातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक असला तरी मानवी जीविताचे संरक्षण आणि नैसर्गिक आपत्ती टाळणे हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत पर्यटकांनी रघुवीर घाटात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Web Title: Raghuveer ghat closed for tourists till 10 august due to landslide risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Khed
  • Monsoon
  • Ratnagiri
  • tourism

संबंधित बातम्या

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
1

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो
2

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार
3

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
4

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.