बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राची मान्यता (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे जिल्ह्यात वाढला बिबट्यांचा धोका
मानव बिबट संघर्ष उपाय योजनांबाबत बैठकीचे आयोजन
केंद्राने दिली बिबट्यांच्या नसबंदीस मान्यता
शिक्रापूर: मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्यासाठी प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी तसेच कृत्रीम बुद्धीमतेवर आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बिबट नसबंदीबाबत केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.
पुणे येथील वनसंरक्षक यांच्या सभागृहात मानव बिबट संघर्ष उपाय योजनांबाबत आयोजित बैठकीत बोलताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते, याप्रसंगी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, श्रीधर्मबीर सालचिठठल, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जयराम गौडा, कुलराज सिंह, सिध्देश सावडेकर, पंकज गर्ग यांसह आदी वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मानव बिबट संघर्षाबाबत वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असून त्यांना आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करुन देण्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असून बांबू लागवड करुन बिबटला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा असे सांगितले.
यावेळी साखर कारखान्यांनी करावयाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली, दरम्यान उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी मानव बिबट संघर्षाबाबत केलेल्या उपाय योजना बाबतचे सादरीकरण केले.
Pune News: “जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे…”;काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?
काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘अर्लट’ देण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.






