Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

सध्या सैतवडा परिसरात भीतीचे सावट असून शेतकरी आणि बागायतदार कामावर जाण्यास धजावत नाहीत, वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2026 | 03:02 PM
मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…
Follow Us
Close
Follow Us:

वनविभागाकडून पिंजरा लावण्यास टाळाटाळ
नरबळी गेल्यावर प्रशासन जागे होणार का ?
तीव्र आदोलन छेडण्याचा ग्रामस्थानी दिला इशारा

रत्नागिरी: तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्‌याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आसपासच्या वाड्यांमध्ये आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.

अचानक वासरावर हल्ला
मंगळवारी रात्री बलभीमवाडी येथील प्रदीप पवार यांच्या गोठ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक वासरावर हल्ला केला. प्राण्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरच्यांनी धाव घेतली, तेव्हा बिबट्या तेथून पसार झाला. मात्र, या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

तीव्र आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा

सध्या सैतवडा परिसरात भीतीचे सावट असून शेतकरी आणि बागायतदार कामावर जाण्यास धजावत नाहीत, वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. विशेष म्हणजे, ही या भागातील तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोन वेळा बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. प्रत्येक घटनेनंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले, पंचनामे झाले, परंतु ठोस उपाययोजना मात्र शून्य आहेत. बिबट्या आता फक्त फळ जनावरांवर नाही तर माणसाहर ही हमी मुले-बाळे भीतीपोटी घराबाहेर पडायला घाबरत आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, ‘वरिष्ठांकडून आदेश नाहीत’ किंवा ‘तांत्रिक अडचणी’ अशी कारणे पुढे करून वनविभागाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत एखादा नरबळी जात नाही, तोपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का? असा संतप्त सवाल आता बलभीमवाडीतील नागरिक विचारत आहेत.

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

मला विसरलात का? Leopard इज बॅक
जुन्नर तालुक्यातील ओतूर,रोहोकडी,डुंबरवाडी, आंबेगव्हान,खामुंडी,उंब्रज, उदापुर, डिंगोरे,अहिनवेवाडी धोलवड,ठिकेकरवाडी आणि आसपासच्या परिसरात सध्या कांदा काढणीच्या हंगामाला वेग आला आहे. शेतकरी आपल्या पिकाची आवराआवर करण्यात व्यस्त असतानाच, दुसरीकडे शेकडो मेंढपाळ कुटुंबं आपल्या उघड्यावरच्या संसारासह बिबट्याच्या छायेखाली जगतायेत. शेतात मुक्कामाला असलेल्या या मेंढपाळांना ऊन, वारा, पाऊस आणि दाट अंधाराची तमा न बाळगता दररोज रात्री ‘मृत्यूशी’ दोन हात करावे लागत आहेत.

Web Title: Leopard attack on people animals in saitwade ratnagiri forest department ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…
1

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार
2

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता
3

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral
4

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.