
अचानक वाढली गर्दी; वाहनांच्या लांब रांगा
युद्धामुळे इधन टचाइच्या अफवाना उधाण
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी: इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक बंद होणार आणि त्यामुळे इंधनटंचाई निर्माण होणार, अशी अफवा मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर आणि परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपासह जिल्ह्यातील विविध पंपांवर पेट्रोल व डिझेल, सीएनजी गॅस भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंधनपुरवठा खंडित झाल्यास अडचण निर्माण होईल, या भीतीनं अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. रत्नागिरी शहरातील माळ नाका ते जयस्तंभपर्यंतच्या सर्वच पेट्रोल पंपांवर आणि हातखंबा येथील पेट्रोल पंपांवरही इंधन भरण्यासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या मोठ्या रांगा रात्री उशिरापर्यंत होत्या.
अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. बुधवारी ही दिवसभर पेट्रोल पंपांवर गर्दी होती. रस्त्यावर वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पेट्रोल संपेल किंवा दर वाढतील या भीतीपोटी गर्दी केल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. बुधवारी सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे पेट्रोल पंपा नजीकच्या रस्त्यांवरील गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. इराण इस्त्राईल, अमेरिका यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे इंधन आयातीमध्ये अडथळे निर्माण होण्याची चर्चा अफवेसारखी पसरली आणि त्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या परिस्थितीबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशननं स्पष्टीकरण देत कोणतीही इंधनटंचाई नसल्याचं स्पष्ट केलं. इंधनसाठा मुबलक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आले आहे.
Iran Israel War मुळे भारतावर तेल संकट? केवळ ‘इतक्या’ दिवसांचा साठा; पेट्रोल-डिझेल महागणार?
रत्नागिरी येथील एका पेट्रोल पंपावरील जबाबदार कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्वच पेट्रोल पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा आहे. त्यामुळे पेट्रोल संपणार नाही. पेट्रोलवा तुटवडा निर्माण होणार नाही, मात्र अफवा पसरवली गेल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. अफवेमुळे सर्वांनीच वाहनांच्या टाक्या इंधनाने फुल्ल केल्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे, मात्र पुढील दोन-तीन दिवसात पेट्रोल पंपांवर शुकशुकाट दिसेल, कारण सर्वांनीच वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन भरून घेतले आहे, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
सध्या युद्धाचा पेट्रोल उपलब्धतेवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही. शहरात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. देशात पुरेसा इंधन साठा असल्याचे सरकारकडूनही सांगण्यात आले आहे किमान २५ दिवस पुरेल इतका इधन साठा देशात आहे. त्यामुळे इंधन टंचाई होईल अशी भीती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु असलेले अमेरिकेचे युद्ध जर लांबले तर मात्र पुढील कालावधीत इंधन आयातीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याचा धसका अनेक वाहनधारकांनी घेतला आहे. त्यामुळे वाहनाच्या टाक्या फुल्ल करण्याबरोबरच बाटल्या, कैंन यासारख्या माध्यमातूनही पेट्रोल, डिझेल ग्राहकांनी नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.