स्थिर विक्री प्रमाणपत्र देण्याची मागणी
यावेळी फक्त ३०० रुपये भरून घेण्यात आले होते व विक्री प्रमाणपत्राचे वाटप केले होते. परंतु या ४ वर्षांमध्ये सदर रक्कमेत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. ज्या फेरीवाले यांना सदर विक्री प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वांनाच फिरता विक्री परवाना असा दिला आहे. मुळात शासन निर्णयानुसार फिरता स्थिर व अन्य असे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण स्थिर झाले आहे, त्यांना स्थिर विक्री प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी शिष्ठमंडळाने केली.
परवाना फी ची अन्यायकारक वसुली
शहरातील ८४२ छोटे व्यापारी, फेरीवाले यांचे सर्वेक्षण झाले असून १० फेरीवाल्यांना काही दिवसापूर्वी विक्री प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या विक्री प्रमाणपत्रासाठी ८६० रुपये भरून घेण्यात आले. ते पूर्णपणे अन्यायकारक असून त्यामध्ये परवाना फी ६५० रुपये व विक्री प्रमाणपत्रासाठी २१० रुपये असे घेण्यात येत आहे. मुळामध्ये जे छोटे व्यापारी, फेरीवाले वार्षिक भुईभाडे भरतात. त्यांना परवाना फी ६५० रुपये लागू आहे. यापूर्वी सन २०१७ साली इचलकरंजी नगरपरिषदेकडून विक्री प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते.
प्रमाणपत्र व कीट देण्यास टाळाटाळ
मेळाव्याला येण्यापूर्वी एनयुएलएम विभागाकडून शहरातील दोन हजार फेरीवाल्यांना मेळाव्याला उपस्थित राहिल्यास प्रमाणपत्र व ३ हजार रुपयांचे किट देणार असल्याचे सागण्यात आले होते. मेळावा संपल्यावर प्रमाणपत्र व किट वाटपबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता अजून कीट व प्रमाणपत्र दिल्ली येथे ट्रान्सपोर्टमध्ये अडकले असून आठवड्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र पाच महिने झाले तरी साहित्य मिळालेले नाही.






