Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वंदे मातरम’ बोलूच पण आधी ‘या विषयावर बोला’- अजित पवार

महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचं जाहीर केलं. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 16, 2022 | 05:41 PM
‘वंदे मातरम’ बोलूच पण आधी ‘या विषयावर बोला’- अजित पवार
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, कपिल पाटील, एमआयएमचे आमदार यांना बैठकीला बोलावलं होतं. त्या बैठकीत चर्चा करुन चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचं कारणं दिलं आहे.

राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पण मूळात हे सरकारचं लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून अस्तित्वात आलेलं सरकार आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे विधीमान्य सरकार आहे. आम्ही अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं अजित पवार म्हणाले. तसंच सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असून नको त्या विषयांना महत्व दिलं जात असल्याचंही ते म्हणाले.

राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलोऐवजी आता वंदे मातरम बोलावं यासंदर्भात केलेल्या विधानाचाही अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. “महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं”, असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Lets talk about vande mataram but first talk about this issue ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2022 | 05:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Marathi News
  • vande mataram

संबंधित बातम्या

Pink Tax : पाकिस्तानने ओळखली महिलांची गरज! ‘हा’ टॅक्स केला रद्द, निर्णयाचं होतंय सर्वत्र कौतुक
1

Pink Tax : पाकिस्तानने ओळखली महिलांची गरज! ‘हा’ टॅक्स केला रद्द, निर्णयाचं होतंय सर्वत्र कौतुक

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…
2

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…

Canara Robeco AMC ची ‘#BackToSIP’ मोहीम; थांबलेल्या SIP पुन्हा सुरू करण्यासाठी खास पुढाकार
3

Canara Robeco AMC ची ‘#BackToSIP’ मोहीम; थांबलेल्या SIP पुन्हा सुरू करण्यासाठी खास पुढाकार

गुंतवणूकदारांनो इथे लक्ष द्या… Share Market मध्ये होणार धमाका! Reliance आणतोय देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO
4

गुंतवणूकदारांनो इथे लक्ष द्या… Share Market मध्ये होणार धमाका! Reliance आणतोय देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.