Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pink Tax : पाकिस्तानने ओळखली महिलांची गरज! ‘हा’ टॅक्स केला रद्द, निर्णयाचं होतंय सर्वत्र कौतुक

पाकिस्तान सरकारने महिलांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी जोडलेला अत्यंत महत्त्वाचा असा 'पिंक टॅक्स' किंवा 'पीरियड टॅक्स' पूर्णपणे रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वार्षिक अर्थसंकल्पात सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स आणि इतर महिला स्वच्छता उत्पादनांवर लागणारा १८% सेल्स टॅक्स आता थेट 'शून्य' टक्के करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 17, 2026 | 07:24 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारवर नेहमीच लिंगभेद केल्याचा आरोप
  • पाकिस्तानने हा दावा चुकीचा ठरवला
  • महिलांची गरज ओळखून कर केला रद्द
पाकिस्तानी सरकारवर नेहमीच लिंगभेद केल्याचा आरोप केला जातो. भारताच्या या शेजारी देशात महिला आणि त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतंही गांभीर्य नाही असे म्हटले जाते. पण पाकिस्तान सरकारने एक निर्णय घेत हे सगळे समज फोडून काढले आहेत. पाकिस्तानी सरकारने अलीकडेच एकाच पावलाने हा दावा चुकीचा ठरवला आहे. त्यांनी महिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नेमका हा निर्णय कोणता आहे? या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…

पाकिस्तानी सरकारने कोणता कर केला रद्द?

अरब न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सरकारने अलीकडेच महिलांच्या स्वच्छतेशी संबंधित एक कर रद्द केला आहे. अलीकडेच ‘पिंक टॅक्स’ (मासिक पाळीवरील कर) आणि ‘गर्भनिरोधक कर’ रद्द केला आहे. ही देशातील महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. पाकिस्तानमध्ये आता सॅनिटरी नॅपकिन्स आणि गर्भनिरोधकांच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकताही वाढेल.

गर्भनिरोधक करातून दिलासा

पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्या मते, “महिलांचे आरोग्य, प्रतिष्ठा आणि सामाजिक सहभागासाठी स्वच्छता उत्पादने आवश्यक आहेत. पाकिस्तान जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, त्यामुळे कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणे हे सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे.”

सरकारचा ‘मदत अर्थसंकल्प’

पाकिस्तानचे माहिती मंत्री, अताउल्ला तारार यांनी याला मदत अर्थसंकल्प म्हटले आहे आणि ते म्हणाले, “हा अर्थसंकल्प अशा काळासाठी आहे, जेव्हा आपण समृद्धीच्या काळात प्रवेश करत आहोत.” सरकारच्या या निर्णयाचे पाकिस्तानमधील अनेक महिला सक्षमीकरण संघटनांनीही स्वागत केले आहे. त्यांनी या निर्णयाची प्रशंसा केली असून याला महिलांच्या हिताचा सर्वोत्तम निर्णय म्हटले आहे.

‘पिंक किंवा पीरियड टॅक्स’ म्हणजे काय?

पिंक टॅक्स, किंवा पीरियड टॅक्स, हा महिलांच्या स्वच्छता उत्पादनांवर लादलेला कर आहे. यामुळे ही उत्पादने महाग होतात, ज्यामुळे गरीब पार्श्वभूमीच्या महिलांना त्याऐवजी कापड वापरण्यास भाग पडते. यामुळे त्यांच्या स्वच्छतेशी तडजोड होते. पाकिस्तानी सरकारने या उत्पादनांवरील १८% कर कमी करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत.

शेतकऱ्यांचं धान्य आता सडणार नाही! सरकार स्मार्ट सिस्टीम लाँच करण्याच्या तयारीत, नेमकी काय आहे योजना?

Web Title: Pakistan abolished period tax pink tax on sanitary pads marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Business News
  • india- Pakistan
  • Marathi News
  • tax
  • Tax Collection

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.