Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

जिल्हा परिषद अध्यक्षपद हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च पद नसून, जिल्ह्यातील राजकीय प्रभावाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे हे पद मिळाल्यास संबंधित तालुक्यातील नेतृत्व अधिक भक्कम होईल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 15, 2026 | 05:07 PM
पुणे जिल्हा परिषद निवडणूक, Pune ZP Election, जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, ZP President Selection, सुनेत्रा पवार, Sunetra Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, NCP Ajit Pawar

पुणे जिल्हा परिषद निवडणूक, Pune ZP Election, जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, ZP President Selection, सुनेत्रा पवार, Sunetra Pawar, राष्ट्रवादी काँग्रेस, NCP Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला
  • अध्यक्षपद ज्या तालुक्याला मिळेल, तिथल्या नेतृत्वाची पकड अधिक मजबूत होईल
  • उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस आणि बारामती येथे महत्त्वाच्या बैठका
आकाश ढुमेपाटील, Pune ZP Election news Update: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच अंतर्गत लॉबिंगला जोरदार सुरुवात झाली आहे. अध्यक्षपद आपल्या तालुक्याला मिळाल्यास पुढील विधानसभा निवडणुकीची पायाभरणी मजबूत करता येईल, या राजकीय गणितातून विविध तालुक्यांतून मागण्या पुढे येत आहेत. भोर, पुरंदर, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांतून अध्यक्षपदाचा मान मिळावा, अशी जोरदार चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

जिल्हा परिषद अध्यक्षपद हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च पद नसून, जिल्ह्यातील राजकीय प्रभावाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे हे पद मिळाल्यास संबंधित तालुक्यातील नेतृत्व अधिक भक्कम होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक बळ वाढवता येईल, अशी धारणा आहे. याच पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींपर्यंत संपर्क साधला जात असून, आपापल्या तालुक्याची ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Pune ZP Election)

दरम्यान, नऊ तालुक्यांतील जिल्हा परिषद अध्यक्षपद, पंचायत समिती सभापतीपद तसेच संभाव्य युतीच्या पर्यायांवर शुक्रवारी सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांशी संवाद साधला. प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती, स्थानिक समीकरणे आणि आघाडीचे पर्याय यांचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

उर्वरित चार तालुक्यांबाबतची चर्चा बारामती येथे पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठीचे दावे, स्थानिक नाराजी, तसेच संभाव्य आघाड्यांबाबत खुल्या स्वरूपात मते मांडण्यात आली. ‘तालुक्याचा मान’ ही भावना ठळकपणे पुढे येत असताना, संघटनात्मक संतुलन राखण्याचे आव्हानही पक्षासमोर उभे आहे.

अध्यक्षपदाचा निर्णय हा केवळ संख्याबळावर नाही, तर तालुक्यांतील प्रतिनिधित्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रत्येक इच्छुक गट आपापली ताकद मांडत आहे. पुढील काही दिवसांत या लॉबिंगचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे असून, अध्यक्षपदाचा ‘मान’ कोणत्या तालुक्याच्या गळ्यात पडतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Lobbying for the post of zilla parishad president accelerates talukas honor or the next assembly equations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Pune Zilla Parishad
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन
2

Maharashtra Politics : तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

Maharashtra Politics : राष्ट्रवादीवर नेतृत्व कोणाचं? सुनेत्रा पवार की तटकरे अन् पटेलांचं? वर्चस्वाची लढाई सुरु
3

Maharashtra Politics : राष्ट्रवादीवर नेतृत्व कोणाचं? सुनेत्रा पवार की तटकरे अन् पटेलांचं? वर्चस्वाची लढाई सुरु

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
4

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.