Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections: कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

आगामी निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढणार आहोत. अजितदादांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पुढे येऊन आगामी निवडणुकांसाठी काम करावे,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 27, 2025 | 03:35 PM
महापालिका निवडणुकांसाठी तयार रहा

महापालिका निवडणुकांसाठी तयार रहा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यापासून या निवडणुकांबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे. सुरावातीला या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकतात, असे सांगितले जात होते. पण आता पुन्हा एकदा यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास, म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता तटकरेंनी वर्तवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या “सशक्त संघटन” कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता न आल्याची कबुली दिली. तसेच अजितदादा यांच्या नेतृत्वावर झालेल्या टीकेबाबत आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. तटकरे म्हणाले, “महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले जाणार नाही, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. पण कार्यकर्त्यांना मात्र अजितदादांबद्दल खूप विश्वास होता. आपण आपण विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, तरी विधानसभेत घवघवीत यश मिळवलं,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅनडात भीषण दुर्घटना; व्हँकुव्हरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिरडले

योजनांना यशस्वी बनवलं

सुनील तटकरेंनी योजनेवर करण्यात आलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ‘लाडकी बहीण’ आणि ‘लेक योजना’ या उपक्रमांवर टीका झाली होती. मात्र, अजितदादांनी या दोन्ही योजना प्रभावीपणे राबवून त्यांना यशस्वी केलं.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ” मागील तीन-चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकांपूर्वी जनतेच्या मनात आपल्यासंबंधी विश्वास निर्माण होईल, यावर पक्षाने भर द्यायचा आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के महिलांना संधी देण्याचा निर्धारही कऱण्यात आल्याचं तटकरेनी म्हटलं आहे.

BSNL ने Jio आणि Airtel ची उडवली झोप, 336 दिवसांसाठी मिळणार भरपूर बेनिफिट्स

निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, “जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे पक्षाने लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करायच्या आहेत. आगामी निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढणार आहोत. अजितदादांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पुढे येऊन आगामी निवडणुकांसाठी काम करावे,” असे आवाहन करत तटकऱ्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढवलं.

 

Web Title: Local body elections when will the local body elections be held indicative statement by a senior ncp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • Maharashtra Local Body Election
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण
1

Raigad News : “सामाजिक सभागृहाची वास्तु कोणा एकाची नसते तर…”; कुणबी समाज भव्य समाज संकुलाचे सुनिल तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे
2

Raigad News : “ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार हा एकच मार्ग” – खासदार सुनिल तटकरे

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले
3

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड
4

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; इच्छुकांचा हिरमोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.