Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala Rain Update: लोणावळ्यात ४८ तासांत १,२९० मिमी पाऊस; गेल्या १२ वर्षांतील जुलै महिन्याचा चौथा मोठा रेकॉर्ड

Lonavala Rain: घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्यांचा घोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2026 | 10:28 AM
Lonavala Rain 48 Hours, Pune District Rainfall Data, Chinchwad Highest Rain,

Lonavala Rain 48 Hours, Pune District Rainfall Data, Chinchwad Highest Rain,

Follow Us
Follow Us:

Lonavala Rain Update: उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल १ हजार २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या २४ तासांतच ६२० मिलिमीटर पाऊस कोसळला. दरम्यान, पुणे शहरातील जुलै महिन्यातील एकूण पर्जन्यमान ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचले असून, २०१४ नंतरच्या काळातील जुलैमधील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत पुणे शहर आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले, मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे सर्वाधिक २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या

चिचबडनंतर दापोडी येथे १२५.५. एबाग येथे ११५.६. शिवाजीनगर येथे १७.५ आणि एनडीए परिसरात ९५.५ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला,
विशेष म्हणजे पाषाणमध्ये जुलै महिन्यात सलग दोन दिवस १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पहण्याची ही ऐतिहासिक घटना ठरण्याची शक्यता आहे.

– दरडी कोसळण्याचा धोका; प्रशासन सतर्क

सलग कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.

घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्यांचा घोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या आहेत. नागरिकांनी धरण क्षेत्र, नदीकाठ आणि घाट परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये तरीच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

IIM Nagpur: १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या कॅम्पसमध्ये

पश्चिम घाटातील दुर्मीळ नोंद

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा कहर सुरू असतानाच लोणावळ्यात सोमवारी अवध्या २४ तासांत ६७० मिलिमीटर पावरजची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) आयएमडी सीडब्ल्यूसी अॅटलस-२०१५मधील विश्लेषणानुसार हा पाऊस सुमारे हजार वर्षांतून एकदा अनुभवायला मिळणाऱ्या अतिवृष्टीच्या पातळीपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील ही नोंद हवामानशास्त्रीयदृष्ट्‌या अत्यंत मानली जात आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत पुणे शहरातील शिवाजीनगर वैद्यशाळेत १०८.४ मिलिमीटर पावसाची नौद झाली. जुलै महिन्यात २४ तासांत झालेल्या पावसाचा हा चौथा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. यापूर्वी १९५८ मध्ये १३०.४ मिमी, १९६७ मध्ये ११७.९ मिमी आणि २०१४ मध्ये ११४.१ मिमी पावसाची नोद झाली होती.

 

जुलैतील पावसाचा नव्या विक्रमाकडे प्रवास

पुणे शहरातील यंदाच्या मान्सून हंगामातील एकूण पाऊस ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचला आहे. हे संपूर्ण नान्सून हंगामाच्या सरासरीच्या जवळपास ५० टक्के आहे. २०१४ नंतर जुलै महिन्यातील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ३६९.१, २०२२ मध्ये ३८६.२ आणि २०२४ मध्ये ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, २०२२ पासून दर एक वर्षांआड पुणे शहरात जुलै महिन्यात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा कल दिसून येत आहे.

 

Web Title: Lonavala rain updates 48 hours record break rainfall pune ghatmatha july 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Heavy Rainfall
  • Lonavala news
  • Pune Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार
1

Maharashtra Rain Alert: पुण्यावर आभाळ फाटलं! लोणावळ्यात तब्बल १२९० मिमी…; उद्या हाहाकार

पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन
2

पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन

हाहा:कार! वाई तालुक्यात अतिवृष्टी; मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला
3

हाहा:कार! वाई तालुक्यात अतिवृष्टी; मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

Pune Rain Update: पुण्याला पावसाचा ‘रेड’ अलर्ट; खडकवासला धरण साखळीत जोर वाढला, 48 तासांमध्ये…
4

Pune Rain Update: पुण्याला पावसाचा ‘रेड’ अलर्ट; खडकवासला धरण साखळीत जोर वाढला, 48 तासांमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.