Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महा अ‍ॅप्टिकॉन परिषदेचे साताऱ्यात होणार उद्घाटन; उदयनराजेंसह महेश शिंदेही राहणार

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पाच जिल्ह्यातून तब्बल 1300 फार्मसी प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य परिषदेचे उद्घाटन होणार.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 03:18 PM
महा अॅप्टिकॉन परिषदेचे साताऱ्यात उद्या उद्घाटन

महा अॅप्टिकॉन परिषदेचे साताऱ्यात उद्या उद्घाटन

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरामध्ये असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया एपीटीआय या शिखर संस्थेच्याद्वारे 7 मार्च रोजी महा एफ्टिकॉन 2026 या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. या सभेचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पाच जिल्ह्यातून तब्बल 1300 फार्मसी प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य परिषदेचे उद्घाटन होणार असून, एपीटीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद उमेकर, राज्याच्या अध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी तसेच फार्मास्युटिकल असोसिएशनचे पदाधिकारी दिपेंद्र सिंग आणि विजय पाटील यांची सुद्धा यावेळी उपस्थिती असणार आहे.

या परिषदेमध्ये फार्मसी क्षेत्रामधील अध्यापन पद्धती, संशोधन तसेच भाषांतरित पद्धती, उद्योजकता, विकास स्टार्टअप कल्चर आणि एआयचा अध्यापनामध्ये वापरया पाच विषयांवर प्रमुख मार्गदर्शन केले जाणार आहे. एआयपीटी ही औषधनिर्माणशास्त्र शाखेतील शिखर संस्था असून, गेल्या पाच वर्षांपासून विद्यमान कार्यकारिणीने शिक्षक केंद्रित उपक्रमांना विशेष गती दिली आहे. सर्वसमावेशकता व प्रादेशिक संतुलन राखण्याचा या समितीने प्रयत्न केला आहे. या कार्याचा गौरव म्हणून शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड 2023 असे राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहे.

साताऱ्यात होणाऱ्या या संयोजन समितीचे सदस्य कृष्णा विद्यापीठाचे डीन डॉक्टर नामदेव जाधव, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम देशमुख, मसूरच्या दादासाहेब चव्हाण, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, यशोदा टेक्निकल कॅम्पस फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव आणि डॉ. नागेश अलुरकर इत्यादी मान्यवर संयोजन समितीचे काम सांभाळत असून, सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

हेदेखील वाचा : Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Web Title: Maha opticon conference to be inaugurated in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Satara News
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
3

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
4

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.