इराणने युएईमधील THAAD हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला; क्षेपणास्त्रांसमोर US झाले असहाय्य असेही इराणने म्हटले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran destroyed US THAAD in UAE news : मध्यपूर्वेतील युद्ध (Israel Iran war) आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथे केवळ दोन देश नाही तर संपूर्ण जगाची सुरक्षा व्यवस्था पणाला लागली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जगभरातील १६० देशांमध्ये आपले १,०८,००० पेक्षा जास्त सैन्य तैनात केल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. मात्र, दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या सर्वात प्रगत अशा हवाई संरक्षण यंत्रणेला खिंडार पाडल्याचा दावा करून अमेरिकन लष्करी सामर्थ्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
अमेरिकन लष्कराचे उपप्रमुख जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांनी सिनेटच्या उपसमितीसमोर साक्ष देताना सांगितले की, अमेरिकन सैन्य सध्या अत्यंत धोकादायक वातावरणात कार्यरत आहे. जगभरातील १६० देशांमध्ये १०८,००० हून अधिक सैन्य तैनात असणे हे अमेरिकेच्या ‘ग्लोबल ऑपरेशन्स’ची ताकद दर्शवते. ही तैनाती केवळ इराणला रोखण्यासाठी नाही, तर रशिया आणि चीनकडून मिळणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे. “आम्ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास सक्षम आहोत,” असा विश्वास पेंटागॉनने व्यक्त केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’
एकीकडे अमेरिका लष्करी संख्याबळाचा दावा करत असताना, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (IRGC) ने युएई (UAE) मधील अल-रुवैस येथे तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘THAAD’ (Terminal High Altitude Area Defense) हवाई संरक्षण प्रणालीवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. या एका सिस्टिमची किंमत ५०० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. इतकेच नाही तर कतारमधील अल उदेद हवाई तळावर असलेला १.१ अब्ज डॉलर्सचा ‘AN/FPS-132’ हा रडार देखील इराणी क्षेपणास्त्राने नष्ट केल्याचे वृत्त आहे. जर इराणचे हे दावे शंभर टक्के खरे असतील, तर मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सुरक्षा कवच आता पूर्णपणे उघडे पडले आहे.
Did Iran’s cheap Shahed-136 drone “annihilate” a $1.1B US radar in Qatar? 📡❌ The evidence tells a different story:
🧵 Viral photos = AI-generated fakes
🧵 Viral video = Actually filmed in Bahrain Full OSINT report: https://t.co/vkJZLPx4IR#FactCheck #Qatar #Iran #OSINT pic.twitter.com/Mdx5Wt6Ob5 — Dr. Adrian Wong (dradrianwong.bsky.social) (@DrAdrianWong) March 5, 2026
credit – social media and Twitter
धक्कादायक बाब म्हणजे, इराणने या युद्धात इस्रायलपेक्षा जास्त युएईला लक्ष्य केले आहे. गेल्या शनिवारपासून इराणने युएईवर ८६३ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागले आहेत. युएई हे इस्रायलचे जवळचे मित्र राष्ट्र मानले जाते, त्यामुळेच इराणने दुबई आणि अबू धाबीला लक्ष्य करून अरब जगताला मोठा इशारा दिला आहे. युएईकडे असलेल्या मर्यादित ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांमुळे आणि अमेरिकन संरक्षण यंत्रणा निकामी झाल्यामुळे आता युएईने इतर मित्र राष्ट्रांकडे मदतीची याचना केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा
इराणच्या दाव्यानुसार, अमेरिकेची THAAD प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा वेग रोखण्यात अपयशी ठरली आहे. जगातील १० पैकी ७ THAAD बॅटरी अमेरिका स्वतः चालवते, तर २ युएईकडे आणि १ सौदी अरेबियाकडे आहे. युएईच्या या दोन्ही यंत्रणा नष्ट झाल्याचे उपग्रह प्रतिमांमधूनही सूचित होत आहे. यामुळे इराणला या प्रदेशात आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. इराणच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे मध्यपूर्वेतील लष्करी संतुलन पूर्णपणे बिघडले असून, आता अमेरिका यावर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: THAAD ही जगातील सर्वात प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे. ती शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी वापरली जाते.
Ans: युएई हे इस्रायलचे जवळचे मित्र राष्ट्र असून तिथे अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत, त्यामुळे इराणने त्यांना दबावात ठेवण्यासाठी सर्वाधिक हल्ले केले आहेत.
Ans: याचा अर्थ असा की अमेरिका केवळ मध्यपूर्वेतच नाही, तर रशिया आणि चीनच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक स्तरावर युद्धासाठी सज्ज आहे.






