Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी सज्ज; पर्यटकांनी बहरला परिसर

नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 31, 2023 | 02:09 PM
नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी सज्ज; पर्यटकांनी बहरला परिसर
Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे.

नववर्षांच्या स्वागतासाठी याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. नौका विहाराबरोबर खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. ऐन थंडीतही पर्यटक आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक, तापोळा, पाचगणी पर्याय म्हणून पहात आहेत. येथील बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून येथील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम ,जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसत आहे.

खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक धम्माल मस्ती करत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हॉटेल्स, लॉजसाठी पर्यटक विविध साइट्‌सच्या माध्यमातून ‘ऑनलाइन बुकिंग’चा वापर करताना दिसत आहेत. नववर्षानिमित्त हॉटेल्स मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे यावे त्यासाठी इमारतीला रंगरंगोटी विद्युत रोषणाई व जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल करण्यात आली आहे. विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: Mahabaleshwar and panchgani ready to welcome new year the area flourished with tourists nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 02:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pachgani

संबंधित बातम्या

आरटीओचा अजब कारभार! महाराष्ट्रात धावणाऱ्या ‘बुलेट’चा नंबर कर्नाटकात ‘चारचाकी’ला; पाचगणीच्या वाहनधारकाची न्यायासाठी पायपीट
1

आरटीओचा अजब कारभार! महाराष्ट्रात धावणाऱ्या ‘बुलेट’चा नंबर कर्नाटकात ‘चारचाकी’ला; पाचगणीच्या वाहनधारकाची न्यायासाठी पायपीट

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’
2

100 व्या साहित्य संमेलनाची नांदी; राज्यभर 99 ठिकाणी ‘साहित्य जागर’

मार्जिन मनी योजनेला मिळतो अल्प प्रतिसाद! अमरावतीत वर्षभरात दोनच उद्योजकांना कर्ज; योजना ठरतेय दुर्लक्षित
3

मार्जिन मनी योजनेला मिळतो अल्प प्रतिसाद! अमरावतीत वर्षभरात दोनच उद्योजकांना कर्ज; योजना ठरतेय दुर्लक्षित

नव्या नाट्यलहरीत हरवतेय ज्येष्ठांची किनार; नवे विषय, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रंगभूमीकडे तरुणांचा ओढा
4

नव्या नाट्यलहरीत हरवतेय ज्येष्ठांची किनार; नवे विषय, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रंगभूमीकडे तरुणांचा ओढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.