Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरूर ते पोलादपूर कामासाठी उद्या केले जाणार महाबळेश्वर बंद आंदोलन

नोव्हेंबर २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या हा रस्ता पुढील कामासाठी रस्ते विकास मंडळाकडे हस्तांतरण करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 03:13 PM
महाबळेश्वर बंद आंदोलन

महाबळेश्वर बंद आंदोलन

Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : वारंवार मागणी करूनही सुरूर ते पोलादपूर या मार्गाच्या कामाला गती मिळत नसल्याने महाबळेश्वर येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत ‘शहर बंद’चे हत्यार उपसले. 8 मार्च रोजी असलेला महिला दिन व रंगपंचमीच्याच दिवशी महाबळेश्वर नागरिक कडकडीत शहर बंद पाळून निषेध व्यक्त करणार आहेत. या आंदोलनानंतरही जर रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही तर शहर बेमुदत बंद व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय महाबळेश्वर येथील नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.

पश्चिम महारष्ट्र व कोकण प्रदेश जोडणारा व वाई पांचगणी व महाबळेश्वर या शहरांतून जाणारा सुरूर ते पोलादपुर रस्ता रुंदीकरण करून सिमेंटीकरणच्या कामास मंजुरी मिळाली. नोव्हेंबर २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या हा रस्ता पुढील कामासाठी रस्ते विकास मंडळाकडे हस्तांतरण करण्यात आला. डिसेंबर २०२४ पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामास प्रारंभ झाला. या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम सुरू असतानाच पसरणी घाटात देखील मोरी व संरक्षक भिंत्तीचे काम सुरू करण्यात आले. हे काम अपूर्ण असतानाच बांधकाम ठेकेदाराने पाचगणी ते महाबळेश्वर या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली गेली.

अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असून, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे पाचगणी ते महाबळेश्वर हा संपूर्ण २० किमी रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी उखडलेला रस्ता अनेक ठिकाणी, पडलेले खड्ड्रे तसेच कामामुळे उडणारी धूळ त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना पर्यटकांना धूळ खात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी या मार्गावरून प्रवास करणे सोडून दिले असून, त्यांनी लांबचा पर्यायी मार्ग स्विकारला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मार्ग बदलता येत नाही. त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणारे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

सुरूर-पोलादपूर रस्त्यासह शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी पेटीट ग्रंथालयाच्या मैदानावर पक्षविरहित बैठक बोलावून नागरिकांना मोठ्या संख्येने आमंत्रित करण्यात आले. कुंभारदरे यांच्या आवाहनास शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी हॉटेल संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी सभासद व नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीसाठी पेटीट ग्रंथालयाच्या मैदानावर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष सुनिल शिंदे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे, नगरसेवक संतोष शिंदे, अफजल सुतार, ऍड संजय जंगम, नगरसेविका स्मिता पाटील, विशाल तोष्णीवाल, संदीप साळुंखे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

या बैठकीत अनेक नागरिकांनी सुरूर-पोलादपूर रस्त्याचे संथ काम यासह अनेक प्रश्न उपस्थित करून आपला संताप व्यक्त केला. याच बैठकीत रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. सर्वांत प्रथम 8 मार्चला शहर बंद आंदोलन करण्यात येईल. त्यांनतर 9 मार्चलाही आंदोलन केले जाणार आहे.

हेदेखील वाचा : PCMC Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी? १६७ एमएलडी अतिरिक्त पाण्यासाठी शहरवासीयांची प्रतीक्षा कायम

Web Title: Mahabaleshwar bandh protest to be held tomorrow for work from surur to poladpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर
1

Satara News: वाई नगरपरिषदेत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ कारभार! नगराध्यक्षांच्या एकाच प्रश्नाने अधिकारी निरुत्तर

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन
2

Satara News: मस्तवाल खासदाराचा राजीनामा घ्या”; पाटण तालुका पत्रकार संघाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांना निवेदन

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
3

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप
4

Satara News: सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन करा! ७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुशांत मोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.