Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी

Mahabaleshwar Heavy Rain: महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावत अवघ्या ४० ते ४५ दिवसांत तब्बल ५०६९ मिमी (सुमारे २०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पडझडीच्या गंभीर घटना घडल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 08:37 PM
महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ
  • पावसाचे दमदार ‘द्विशतक’ पूर्ण
  • आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
महाबळेश्वर : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि परिसरात या वर्षी पावसाने अक्षराक्षः धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यापासून असा काही जोर धरला आहे की, अवघ्या ४० ते ४५ दिवसांच्या कालावधीत सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढत पावसाने आपले दमदार ‘द्विशतक’ (२०० इंच) पूर्ण केले आहे. १ जूनपासून ते आजतागायत महाबळेश्वरमध्ये तब्बल ५०६९ मिलीमीटर म्हणजेच साधारण २०० इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कमी कालावधीत झालेल्या या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पडझडीच्या गंभीर घटना घडल्या आहेत.

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

यंदाच्या पावसाळी हंगामाची सुरुवात महाबळेश्वरकरांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी काहीशी चिंतेची ठरली होती. संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेला होता. २५ जूनच्या सुमारास पावसाने अगदी मंद गतीने हजेरी लावण्यास सुरुवात केली. मात्र, जुलै महिन्याचा पहिला आठवडा उजाडताच पावसाचे रूप पूर्णपणे बदलले. दोन महिन्यांतील पाऊस: १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत महाबळेश्वर येथे तब्बल ४१२७.६ मिलीमीटर (१६२.५० इंच) पाऊस नोंदवला गेला.

जुलैचा विक्रम: १ जुलै ते ३१ जुलै या केवळ एकाच महिन्यात ३७५५.०० मिलीमीटर (१४७.८३ इंच) पावसाची नोंद झाली. जुलैच्या पहिल्या सहा दिवसांतच पावसाने सर्वोच्च उच्चांकी गाठली होती.

सध्याची स्थिती: सध्या दररोज सरासरी ३ ते ४ इंच पाऊस कोसळत असून आज पावसाने ५०६९ मि मी ची पातळी ओलांडत द्विशतकाचा टप्पा पूर्ण केला आहे. गतवर्षाशी तुलना केली गेली तर गेल्या वर्षी आजच्या तारखेला महाबळेश्वरमध्ये सुमारे १५० इंच पाऊस झाला होता. या तुलनेत यंदा आजच्या तारखेला ४५ ते ५० इंचांपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे.

कमी वेळेत आणि सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यात आणि संपूर्ण घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पडझडीचे प्रकार घडले आहेत. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर ते तापोळा हा मुख्य रस्ता खचला असून वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. याशिवाय अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर अनेक ठिकाणी भलीमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत.

अजूनही पावसाळी हंगामाचे सुमारे ४० ते ५० दिवस बाकी आहेत. जर पावसाचा हाच वेग आणि जोर कायम राहिला, तर या वर्षाअखेर एकूण पाऊस ३०० इंचांचा टप्पा सहज पार करेल आणि पावसाचे आजपर्यंतचे सर्व ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत निघून नवीन विक्रम प्रस्थापित होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरील संभाव्य धोके आणि दुर्घटना लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे अलर्ट मोडवर राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरची जीवन वाहिनी मानला जाणारा प्रसिद्ध ‘वेण्णा तलाव’ पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी पाहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. याशिवाय महाबळेश्वरमधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला ‘लिंगमळा धबधबा’ सध्या आपल्या रौद्र आणि नयनरम्य रूपात कोसळत आहे. डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे लहान-मोठे धबधबे, सर्वत्र पसरलेली दाट धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग यामुळे महाबळेश्वरचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.

पावसाचा आणि या विलोभनीय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांचे ताफे महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारच्या वीकेंडला पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. नवविवाहित दांपत्ये, तरुण-तरुणी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने लिंगमळा धबधबा, वेण्णा लेक, केट्स पॉईंट, मेटगुताडचा प्रति मुशी डॅम आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर परिसरात हजेरी लावत आहेत. बाजारपेठेतही पर्यटकांच्या गर्दीमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

‘वंदे मातरम्’ गीताच्या स्मरणार्थ मोहीम; ‘हर घर तिरंगा’साठी समन्वयाने नियोजन करा, जिल्हाधिकारी देवरे यांचे आवाहन

Web Title: Mahabaleshwar heavy rain 5069 mm rainfall 2026 yesterday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mahabaleshwar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
2

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
3

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
4

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.