Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar: ‘आपले सरकार’ पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटींमुळे नागरिक आणि पर्यटक संतप्त

Mahabaleshwar News: महाबळेश्वर आणि पाचगणीमधील नागरिकांसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर तक्रार करणे कठीण झाले आहे. शहराचा उल्लेख नसणे आणि स्पेलिंगमधील चुकांमुळे नागरिक संतप्त आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 08:46 PM
'आपले सरकार' पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! (Photo Credit- X)

'आपले सरकार' पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • ‘आपले सरकार’ पोर्टलवर महाबळेश्वरचा उल्लेखच नाही!
  • तक्रार निवारण प्रणालीतील त्रुटींमुळे नागरिक आणि पर्यटक संतप्त
महाबळेश्वर : राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टल या ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीमध्ये महाबळेश्वर शहराशी संबंधित समस्या नोंदवण्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने महाबळेश्वर बाबत तक्रार करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. शहरात पाणीपुरवठा, वीज, रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता यांसारख्या विविध समस्या वारंवार उद्भवत असतात. मात्र, या समस्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेचा पर्याय स्पष्टपणे उपलब्ध नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, पोर्टलवर प्रामुख्याने खेडेगावांचा किंवा ग्रामपंचायत नोंदणीतील गावांचा उल्लेख दिसून येतो; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका/नगरपरिषद) शहरांचा उल्लेख आढळत नाही. याचे उदाहरण म्हणजे महाबळेश्वरसह पाचगणी या दोन्ही महत्त्वाच्या पर्यटन शहरांचा पोर्टलवर उल्लेख दिसत नाही. पोर्टलवरील अनेक गावांची नावे चुकीच्या स्पेलिंगमुळे वेगवेगळ्या प्रकारे नोंदवली गेल्याने तीच गावे दुबार दिसत आहेत. उदाहरणार्थ, “क्षेत्र महाबळेश्वर” व “क्षेत्रमहाबळेश्वर”, “मेट तळीये” व “मेट तळे”, “कुंभरोशी” व “कुंभ्रोशी” तसेच “खिंगर” व “खेंगर” अशी नावे स्वतंत्रपणे दिसत असून, यामुळे तक्रार नोंदवताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेपरंतु, दुसरीकडे तालुका म्हणून महाबळेश्वरचा उल्लेख आहे परंतू त्यानंतर महाबळेश्वर किंवा त्याचे महसुली नाव ‘माल्कम पेठ’ यांचा साधा उल्लेखही पोर्टलवर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महाबळेश्वर परिसर हा इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असतानाही, पर्यावरणाशी संबंधित विविध समस्यांची (अतिक्रमण, वृक्षतोड, प्रदूषण इ.) नोंद करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा पर्याय या पोर्टलवर उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली आहे. शहरातील तक्रारी पालिकेकडे केल्या जातात परंतू त्याची दखल घेतली नाही तर तक्रार कोठे करणार असा प्रश्न नागरिकांना व पर्यटकांना पडत आहे. तसेच पालिकेकडे ऑनलाइन तक्रार करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या अनेक तक्रारी दाखल करण्यासाठी व्यासपीठच नसल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या वाढत्या पर्यटनामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन तक्रारीची व्यवस्था निर्माण केली पाहिजे अशी मागणी अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे या संवेदनशील भागातील तक्रारी योग्य पद्धतीने नोंदवता येतील व त्याचे निरसन देखील होण्याची शक्यता वाढेल अशी नागरिकांकडून मागणी व्यक्त होत आहे.

Satara News: कोरेगावच्या राजकारणात खळबळ! शिवसेना जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांचा आमदार महेश शिंदेंवर निशाणा

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, इतर शहरांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असताना महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या पर्यटनदृष्ट्या तसेच पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना इतर विभागांचा पर्याय निवडावा लागत असून, त्यामुळे तक्रारींचे योग्य निवारण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
यासंदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पोर्टलमधील स्पेलिंग चुका दुरुस्त कराव्यात, दुबार नोंदी हटवाव्यात तसेच महाबळेश्वर/माल्कम पेठ व पाचगणीसाठी स्वतंत्र श्रेणी उपलब्ध करून द्यावी. याचबरोबर, इको-सेन्सिटिव्ह झोनमधील समस्यांसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणीची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने याबाबत विचार करुन आवश्यक ती सोय उपलब्ध करुन द्यावी व तांत्रिक त्रुटी असल्यास ती तातडीने दूर करण्यात येईल, अशी मागणी व्यक्त केली जात आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर देण्यात आलेला नंबर किंवा ईमेल हे अनेकवेळा चुकीचे किंवा त्यावर संपर्क होत नाही. काही ठिकाणी संपर्क झाला किंवा चुकीची माहिती मिळाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारींचा फॉलोअप घेण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने याबाबत देखील सुधारणा करणे गरजेचे आहे असे मत अनेकांनी व्यक्त केली आहे.

निधी मिळुनही म्हसवडकर पितायेत १० दिवसांतुन पिण्याचे पाणी! ना. गोरे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची पालिका सदस्यांची धडपड

Web Title: Mahabaleshwar malcolm peth missing on aaple sarkar portal complaint issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी
1

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन
2

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन

परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा; विद्रोही साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ
3

परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा; विद्रोही साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी
4

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.