Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Mahabaleshwar Crime News: या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ करण दशरथ घाडगे, आरोपी क्रमांक ३ गौतम सुरेश जाधव, आरोपी क्रमांक ४ भूपाल किसन घाडगे, आरोपी क्रमांक ५ राहुल भूपाल गाडगे आणि आरोपी क्रमांक ७ सागर यशवंत घाडगे (सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 01:00 PM
Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपी महिलेला कारावास, ५ जण निर्दोष

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपी महिलेला कारावास, ५ जण निर्दोष

Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वर येथील ऑक्सिजन रिसॉर्ट चोरी प्रकरणाचा न्यायालयाने दिला अंतिम निकाल.
  • मुख्य आरोपी कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, नालासोपारा) हिला १ वर्ष ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा.
  • खटल्यातील इतर ५ संशयितांची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयातून निर्दोष मुक्तता.
Mahabaleshwar Crime News : महाबळेश्वर येथील बहुचर्चित ऑक्सिजन रिसॉर्ट चोरी प्रकरणाचा निकाल माननीय न्यायालयाने दिला असून, यातील मुख्य आरोपीला १ वर्ष ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा तर ५ संशियीतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. उदय इवरे यांनी हा निकाल दिला आहे.

फिर्यादी विशाल रतिकांत तोषणीवाल (रा. डॉ. साबणे रोड, महाबळेश्वर) यांच्या रिसॉर्टवर हा धक्कादायक प्रकार घडला. तोषणीवाल यांच्या विवर रोड, तळदेव येथील ऑक्सिजन रिसॉर्टमधून २५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते २८ जून २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंत रिसॉर्टमधील साहित्याची चोरी झाली होती. यामध्ये गाद्या, बेड, फ्रिज, टीव्ही, एसी, स्वयंपाकघरातील साहित्य, डीव्हीआर, प्रोजेक्टर, संगणक यांसह तब्बल ८८ प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता.

NPCI New UPI Rules: पेट्रोल पासून रेल्वे तिकीटांपर्यंत! कोणत्या UPI व्यवहारावर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

आरोपींनी आपापसांत संगनमत करून ही चोरी केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२५, कोर्ट केस नंबर RCC ३०/२०२५, BNS कलम ३०५, ३३१(३)(४), ३०६ आणि ३१७(२) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्यात एकूण सात साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी क्रमांक १ कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय ५४, राठी नालासोपारा, वसई ईस्ट, ठाणे-मुंबई) या महिलेवरील आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला दोषी ठरवण्यात आले. तसेच, संबंधित आरोपी महिलेला १ वर्ष ३ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ करण दशरथ घाडगे, आरोपी क्रमांक ३ गौतम सुरेश जाधव, आरोपी क्रमांक ४ भूपाल किसन घाडगे, आरोपी क्रमांक ५ राहुल भूपाल गाडगे आणि आरोपी क्रमांक ७ सागर यशवंत घाडगे (सर्व रा. सैदापूर, ता. सातारा) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

आरोपी क्रमांक ६ आणि ८ हे अद्याप फरार असून, त्यांच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्याने स्वतंत्र दोषारोपपत्र तीन महिन्यांच्या आत दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार आर. एम. काळे यांनी केला. खटल्यात सरकारी वकील म्हणून डी. एम. शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून हेड कॉन्स्टेबल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी सहकार्य केले.

या प्रकरणाच्या तपासात वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Mahabaleshwar oxygen resort theft case verdict kanchan banerjee sentenced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • crime news
  • Mahabaleshwar

संबंधित बातम्या

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
1

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
2

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
3

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
4

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.