Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वर–पाचगणीतील २७० अनधिकृत बांधकामांना नोटीस; सात दिवसांत काढण्याचा प्रशासनाचा आदेश

महाबळेश्वर तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधितांनी सात दिवसांच्या आत बांधकामे काढून टाकावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 02:05 PM
Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार

Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार

Follow Us
Close
Follow Us:
  • महाबळेश्वर तहसील कार्यालय एक्शन मोडमध्ये
  • २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा
  • सात दिवसांच्या आत बांधकामे काढून टाकण्याचे आदेश
Satara News : पाचगणी : महाबळेश्वर–पाचगणी परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्यात आलेला असल्यामुळे या भागात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. (Satara News) मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधितांनी सात दिवसांच्या आत बांधकामे काढून टाकावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी १७ जानेवारी २००१ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार महाबळेश्वर–पाचगणी परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच मंजूर महाबळेश्वर–पाचगणी प्रादेशिक योजना २००२ ते २०२२ नुसार या क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, सातारा यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तहसीलदार सचिन मेस्के यांनी संबंधितांना नोटिसा बजावून स्पष्ट केले आहे की, नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांनी स्वखर्चाने अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे. अन्यथा प्रशासनाकडून सदर बांधकाम पाडण्यात येईल आणि त्यासाठी होणारा खर्च जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

हे देखील वाचा : राज्यभरात गॅस सिलेंडरवर धाडसत्र सुरुच; नाशिकमध्ये 447 टाक्या जप्त तर जालन्यात…

दरम्यान, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संबंधित खातेदारांना नोटिसा बजावून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

पाचगणी–महाबळेश्वर पर्यटनावर स्थानिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने घरांवर व व्यवसायांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजेंद्र शेठ राजपुरे यांनी दिला. तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Mahabaleshwar tehsil office issues notices to 270 holders of unauthorized constructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • daily news
  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी
1

शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात, माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; सदस्यांनी चौकशीची केली मागणी

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन
2

Satara News : वयाची शंभरी पार, पण कुस्तीचा तोच रुबाब! साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचे मातीपूजन

परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा; विद्रोही साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ
3

परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा; विद्रोही साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी
4

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.