Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 06.11.2026
Maharashtra to World Breaking News : सायडोंगर येथील वृक्षसंपदा वाचवण्यासाठी टोरेंट कंपनीच्या विरोधात २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे.
सोलापूर आणि पंढरपुरात उसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून साखर कारखानदारांविरोधात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आज ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा २४ वा हप्ता जारी करण्यात आला आहे. देशातील ९.३४ कोटी पात्र शेतकऱ्यांना ₹२००० चा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील वाद उफाळला असून आगामी निवडणुकांच्या धोरणांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये बैठकांची सत्रे सुरू झाली आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) आज श्रीहरिकोटा येथून GSLV-F18 रॉकेटद्वारे ‘NVS-03’ नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना आज ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग एजन्सीशी संबंधित ₹१,००० कोटींच्या खटल्यात ‘मेटा’ (Meta) कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
30 Oct 2026 05:59 PM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ (Asia Cup 2026) साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमध्ये होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद लक्ष्य रायचंदानीकडे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी यशवर्धन सिंग चौहानकडे देण्यात आली आहे. या संघात माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
30 Oct 2026 05:50 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं काय शिजतंय, याचा अंदाज बांधणंही कठीण झालं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे सेनेतील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असतानाच राज्यात आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
30 Oct 2026 05:40 PM (IST)
ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात (ड्रग्ज) पोलिसांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा आणि परिमंडळात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. मुंब्रा परिसरात पोलिसांनी धाड टाकून तब्बल दीड कोटी रुपयांचे मेफेड्रोन (MD) ड्रग जप्त केले असून, यात चार परदेशी नागरिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचे नेटवर्क हादरले आहे.
30 Oct 2026 05:30 PM (IST)
आज न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चौथा टी 20 सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर तब्बल 259 रन्सचा डोंगर उभा केला. 20 ओव्हर्समध्ये भारताला तब्बल 260 रन्सचे टार्गेट न्यूझीलंडने दिले होते. ग्लेन फिलिप्सने शानदार शतकी खेळी केली. जेकब डफीने चार विकेट्स घेत भारताची फलंदाजीची वाट लावली. अखेर या चौथ्या टी 20 सामन्यात भारतीय संघाचा 87 रन्सने पराभव झाला आहे.
30 Oct 2026 05:15 PM (IST)
भाईंदर पूर्व येथील सोनल पार्क परिसरात एका खासगी जागेवर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या कंटेनरवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. लोकांच्या सामाजिक कार्यासाठी आणलेल्या या कंटेनरचा वापर भलत्याच कामांसाठी होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नगरसेवक तरुण शर्मा यांनी केला आहे. एका कंटेनरमध्ये डेकोरेशनचे साहित्य भरल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या कंटेनरमधील काही तरुणांचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
30 Oct 2026 04:57 PM (IST)
महायुतीतल्या मित्र पक्षांच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोप थांबवून तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे परांजपे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 04:47 PM (IST)
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात (पेंटागॉन) एका मोठ्या सायबर आणि सुरक्षा सुरूंगाने खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन लष्कराचे (US Military) अत्यंत महत्त्वाचे रणनीतिकार आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे धोरण प्रमुख लेफ्टनंट जनरल ब्रेट सिल्व्हिया (Lt. Gen. Brett Sylvia) यांना पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. इरान संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि पेंटागॉनच्या अत्यंत गुप्त लष्करी मोहिमांची माहिती पत्रकारांना पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 04:37 PM (IST)
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. आज होणारा हा कार्यक्रम आता उद्या दुपारी ३:३० वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमात सुमारे २० विरोधी पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार होते. ३० वक्ते बोलणार होते. मीरा कुमार कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार होत्या आणि मल्लिकार्जुन खर्गे ठराव सादर करणार होते. समारोप समारंभासाठी राहुल गांधींच्या नावावर चर्चा सुरू होती. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 04:27 PM (IST)
देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. सगळ्या जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. आताही अशीच एक बातमी समोर येत आहे. स्वयंपाक घरातील महत्त्वाची असलेली आणि चहा प्रेमींसाठी महत्त्वाच घटक दूध महागणार आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये दुधाच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दुधाचा भाव एका दमात १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेला आहे. तामिळनाडूमध्येही दुधाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. आता, १ नोव्हेंबरपासून दुधाच्या दरात पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 04:17 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच चित्र दिसू लागले आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील धुसफूस गेल्या अनेक दिवसांपासून दिसत होती. आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालानंतर भाजप – शिंदे गटात जोरदार धुमश्चक्री होताना दिसत आहे. यावरूनच आता शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) हेदेखील मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता निलेश राणे यांनी नवनाथ बन यांना चांगलंच सुनावलं आहे. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 04:12 PM (IST)
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धामहून येणारे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याने आणि त्याचे लोकेशन मिळत नसल्याने स्थानिक प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर...
30 Oct 2026 03:59 PM (IST)
Eknath Shinde Mahayuti Rift: विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला ५ जागांपैकी फक्त २ जागा जिंकण्यात यश आले. तर महाविकास आघाडीचा ३ जागांवर दणदणीत विजय झाला. पण या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून भाजप आणि शिंदे गटातील तणाव चांगलाच वाढला आहे. भाजप नेत्यांनी या निवडणुकीत शिंदे सेनेमुळे पराभव झाल्याचा आरोप केला आहे.
30 Oct 2026 03:50 PM (IST)
Lonavala Station News: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकावर गुरुवारी तिकीट तपासणीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानकावर कर्तव्य बजावत असलेल्या तिकीट तपासनिसाला (TC) एका मुजोर प्रवाशाने मारहाण केली. प्लॅटफॉर्मवर भरदिवसा घडलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
30 Oct 2026 03:40 PM (IST)
मानवी इतिहासामध्ये अनेक अशा वैज्ञानिक चाचण्या झाल्या आहेत, ज्याने संपूर्ण जगाचा भूगोल आणि इतिहास बदलून टाकला. असाच एक थरारक आणि विनाशाची नवी परिसीमा गाठणारा दिवस म्हणजेच ३० ऑक्टोबर १९६१! याच दिवशी सोव्हिएत युनियनने (सध्याचे रशिया) जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली, ज्याला ‘त्सार बॉम्बा’ (Tsar Bomba) या नावाने ओळखले जाते. हा स्फोट इतका महाभयंकर आणि विनाशाची सुवर्णमोहर उमटवणारा होता की, त्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांना आपले लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी ही चाचणी घडवून आणली होती.
30 Oct 2026 03:30 PM (IST)
IND Vs PAK: आज हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्ता आमनेसामने आले. दोन्ही आज क्रिकेटच्या सामन्यात खेळले. दरम्यान हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात भारतीय चाहत्यांची थोडीशी निराशा झाली. कारण पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला आहे. भारताने दिलेले टार्गेट पाकिस्तान सहजपणे प्राप्त केल्याचे पाहायला मिळाले.
30 Oct 2026 03:20 PM (IST)
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे बांधकाम सुरू असताना माती आणि डबराचा मोठा ढिगारा अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका २५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० वर्षीय मजूर जखमी झाला आहे. शुक्रवारी ( ३० ऑक्टोबर 2026) सकाळी सुमारे दहा ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास राजवडी उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली.
30 Oct 2026 03:10 PM (IST)
कर्जत: “सह्याद्री हा केवळ डोंगरांचा प्रदेश नसून महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा आणि अस्मिता आहे. या सह्याद्रीवर कुऱ्हाड चालवून वनसंपदा उद्धवस्त करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही”, असा ठाम निर्धार व्यक्त करत शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मुख्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाविरोधात जोरदार आवाज उठवला आहे.
30 Oct 2026 03:02 PM (IST)
Pune Crime News: पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि मध्यवर्ती भाग मानल्या जाणाऱ्या सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा सडलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
30 Oct 2026 02:59 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात समृद्धी महामार्गावरील रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात बुलढाण्यातील शिवसैनिक आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने फक्त पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. आम्ही वारंवार शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नावर लढत आहोत. मात्र सरकार त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आज आम्ही समृद्धी महामार्ग रोखू आम्हाला अटक झाली तरी चालेल असे यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे.
30 Oct 2026 02:51 PM (IST)
रोजगार देतो म्हणून 42 परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकार धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगाव येथे उघडकीस आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील मजुरांसह महाराष्ट्रातील विविध भागातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या मजुरांची सुटका केली आहे. कामगार अधिकारी देखील प्रकरणाची चौकशी करत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. रोजगार देतो म्हणून पुणे मुंबई ठाणे या रेल्वे स्टेशन वरून परप्रांतीय मजूर उचलून आणत त्यांना डांबून ठेवत बळजबरीने ऊस तोडी करून घेतल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
30 Oct 2026 02:41 PM (IST)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे यांच्या दर्यापूर येथील जनसंपर्क कार्यालयातच मध्यरात्री चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्स चोरट्यांनी लंपास केला असून, काही शासकीय दस्तऐवजही चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
30 Oct 2026 02:30 PM (IST)
नागपुरात म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू असताना क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजूर जखमी झाले आहेत.
30 Oct 2026 02:21 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता आज हस्तांतरीत करण्यात आला. देशभरातील ९.३४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८ हजार ६९० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे जमा करण्यात आली.
30 Oct 2026 02:10 PM (IST)
पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, परिसरातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
30 Oct 2026 01:59 PM (IST)
हवामान विभागाने पाच राज्याला अर्णब चक्रीवादळाचा इशारा दिला होता. ठाण्यात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे. हवेत गारवा असून सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली आहे. उष्णतेपासून हैराण झालेले ठाणेकर यामुळे सुखावला आहे. अर्णब चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस कोसळणार असल्याने हवामान विभागाने अलर्ट दिला होता.
30 Oct 2026 01:48 PM (IST)
शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल माझ्या विधानाचा विर्पयास केला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखवण्याचा विषय नव्हता. मी हडाचा शेतकरी आहे. माझे वडील मजुरी म्हणून काम करायचे. शेतकऱ्यांविषयी वेळोवेळी मदत केली आहे. मी शेतकऱ्यांविषयी खूप संवेदनशील आहे. 55 शेतकऱ्यांना घरे देखील बांधून दिली आहेत. काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघात आत्महत्या झाली. काही जण नेशबाजातून, प्रेमभंगातून आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. त्याअनुषंगाने माझे विधान होते, असा खुलासा एकनाथ शिंदे शिवसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केली.
30 Oct 2026 01:36 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात समृद्धी महामार्गावरील रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असून त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात बुलढाण्यातील शिवसैनिक आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने फक्त पाच हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. आम्ही वारंवार शेतकऱ्यांसंबंधी प्रश्नावर लढत आहोत. मात्र सरकार त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आज आम्ही समृद्धी महामार्ग रोखू आम्हाला अटक झाली तरी चालेल असे यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे.
30 Oct 2026 01:23 PM (IST)
रोजगार देतो म्हणून 42 परप्रांतीय मजुरांना डांबून ठेवल्याचा प्रकार धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कौडगाव येथे उघडकीस आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील मजुरांसह महाराष्ट्रातील विविध भागातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या मजुरांची सुटका केली आहे. कामगार अधिकारी देखील प्रकरणाची चौकशी करत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. रोजगार देतो म्हणून पुणे मुंबई ठाणे या रेल्वे स्टेशन वरून परप्रांतीय मजूर उचलून आणत त्यांना डांबून ठेवत बळजबरीने ऊस तोडी करून घेतल्याचे मजुरांचे म्हणणे आहे.
30 Oct 2026 01:16 PM (IST)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार गजानन लवटे यांच्या दर्यापूर येथील जनसंपर्क कार्यालयातच मध्यरात्री चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर बॉक्स चोरट्यांनी लंपास केला असून, काही शासकीय दस्तऐवजही चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
30 Oct 2026 01:05 PM (IST)
नागपुरात म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू असताना क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून दोन मजूर जखमी झाले आहेत.
30 Oct 2026 12:48 PM (IST)
30 Oct 2026 12:36 PM (IST)
लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे कुटुंबीयांना वाटत असताना ३४ वर्षीय मुग्धा देशमुख यांचा पुण्यातील गहुंजे परिसरातील उच्चभ्रू असणाऱ्या लोढा बेलमोंडो सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. बुधवारी (२८ ऑक्टोबर) रात्री ही घटना उघडकीस आली. मुग्धा यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, त्या ऑगस्ट २०२६ च्या अखेरीसच ब्रिटनमधून भारतात परतल्याची माहिती इमिग्रेशन नोंदींमधून समोर आल्याचे वृत्त आहे.
30 Oct 2026 12:24 PM (IST)
30 Oct 2026 12:12 PM (IST)
पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाईन ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिहारमधील पाटण्यातून दोन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एकाच खोलीत बसून लोकांची ब्लॅकमेलिंग करत होते. यातील एक आरोपी सोशल मीडियावर मुलगी बनून गप्पा मारत असे, तर दुसरा आरोपी पोलिस अधिकारी बनून ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असे. याच पद्धतीने आरोपींनी खराडी येथील रहिवासी असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला पावणे दोन लाख रुपयाला गंडा घातला आहे. शिखर गौरव सक्सेना (वय २२) याच्याकडून ५ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे १ लाख ७७ हजार रुपये उकळले होते. सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासामुळे नैराश्यात आलेल्या शिखरने १ ऑक्टोबर रोजी खराडी येथील एका इमारतीच्या २७ व्या मजलवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आकाशकुमार संजय सिंह (वय १८ वर्षे २ महिने, रा. गोपाळगंज, बिहार) आणि राजकुमार संपूर्णानंद सिंह (वय २२, रा. बांका, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
30 Oct 2026 11:50 AM (IST)
महाराष्ट्रात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच CET Cell ने 2026-27 या वर्षाची MBBS आणि BDS ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. यंदा जवळपास सगळ्या जागा भरल्या आहेत.
30 Oct 2026 11:45 AM (IST)
चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक विकास महामंडळाच्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. टप्पा क्रमांक २ आणि ५ मधील तब्बल २ हजार ९६ हेक्टर जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारपासून येनापूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. या आंदोलनामुळे चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
30 Oct 2026 11:35 AM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिली.
30 Oct 2026 11:25 AM (IST)
टेक कंपनी वनप्लसने भारतात त्यांच्या फेस्टिव्ह सेल ऑफर्सची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, ऑडिओ प्रोडक्ट्सवर ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. तसेच काही निवडक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट्स, बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि बंडल्ड एक्सेसरीज देखील ऑफर केल्या जाणार आहेत.
30 Oct 2026 11:15 AM (IST)
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी२० सिरीजचा चौथा सामना आज ३० ऑक्टोबर रोजी ऑकलंडच्या ईडेन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा धडाकेबाज खेळ करून दोन मोठे रेकॉर्ड स्वतःच्या नावे करू शकतो. सर्वात पहिले म्हणजे २०२६ या वर्षातील सर्वात जास्त टी२० मध्ये धावा करणारा तो फलंदाज ठरू शकतो, ज्यासाठी त्याला केवळ ३५ धावांची गरज आहे आणि तो आपला मित्र आणि सहखेळाडू ईशान किशनला मागे सोडू शकतो.
30 Oct 2026 11:10 AM (IST)
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य ड्रोन शोदरम्यान गुरुवारी रात्री अचानक मोठी दुर्घटना घडली. शो सुरू असताना अचानक नियंत्रण सुटलेले दोन ड्रोन थेट चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने भरधाव वेगाने गेले आणि प्लॅटफॉर्मवर कोसळले. या दुर्दैवी घटनेत प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत उभा असलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे चर्चगेट स्थानकात काही काळ प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
30 Oct 2026 10:59 AM (IST)
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच संतापले असून आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
30 Oct 2026 10:50 AM (IST)
तुम्ही 100 टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्सी वाहनांचे धोरण आणले. मात्र, या E-100 वरील वाहनांना इंधन पुरवठा कसा सुनिश्चित केला जाईल, हे सांगा, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. यावर अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामानी म्हणाले, यासाठी उत्पादन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील. सरकार त्यावर न्यायालयाला माहिती देईल, असे त्यांनी सांगितले. नंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
30 Oct 2026 10:40 AM (IST)
सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक अत्यंत चलाख आणि डोळे उघडणारी नवी शक्कल शोधून काढल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. विमाननगर परिसरातील एका मायनिंग व्यावसायिकाच्या कंपनीच्या अकाउंटंटचा मोबाईल हॅक करून थेट ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करत सायबर चोरट्यांनी तब्बल १६ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या नव्या पद्धतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
30 Oct 2026 10:30 AM (IST)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. लवकरच स्वानंदी समरला गुड न्यूज देणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
30 Oct 2026 10:20 AM (IST)
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सीवर लाईन, मलटाक्या, चेंबर्स आदींची सफाई करणाऱ्या जेटिंग गाड्यांवरील १५ कंत्राटी सफाई कामगारांना थकीत वेतनाची फरकाची रक्कम व नुकसानभरपाई मिळवून देण्यात श्रमिक जनता संघ युनियनला यश आले आहे. युनियनच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने संबंधित कामगारांच्या बँक खात्यात एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये जमा केले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
30 Oct 2026 10:10 AM (IST)
टेक कंपनी सॅमसंगने गुरुवारी चीनमध्ये एक प्रिमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Samsung W27 या नावाने लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये आयोजित ‘Heart of the World’ ईव्हेंटदरम्यान हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘बुक-स्टाईल’ फोल्डेबल फ्लॅगशिप, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा वर आधारित आहे. स्मार्टफोनच्या किंमतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
30 Oct 2026 10:00 AM (IST)
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी गायकवाड यांच्या पक्षातून निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
शेतकऱ्यांबद्दल अनुचित आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून पक्षशिस्त आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर संजय गायकवाड यांच्या निलंबनाच्या कारवाईचे थेट आदेश जारी केले आहेत.
30 Oct 2026 09:50 AM (IST)
बांगलादेशातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून जात असताना त्यांच्या पलायनाचा ऐतिहासिक व्हिडिओ शूट करणारे माजी हवाई दल अधिकारी के. एम. तहसीफ सौरी (K. M. Tahseef Sauri) यांचा मृतदेह गुरुवारी (२९ ऑक्टोबर २०२६) ढाका येथील नदीत अत्यंत संशयास्पद स्थितीत सापडला आहे.के. एम. तहसीफ सौरी हे २८ ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते. दुसऱ्याच दिवशी ढाक्यातील टोंगी बंदर घाट परिसरातील नदीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
30 Oct 2026 09:40 AM (IST)
इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अत्यंत संवेदनशील सार्वत्रिक निवडणुकीचे अखेर संपूर्ण निकाल समोर आले आहेत. १२० सदस्यांच्या नेसेट (Knesset - इस्रायली संसद) मध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा ६१ जागांचा आकडा कोणत्याही एका आघाडीला गाठता आलेला नाही, ज्यामुळे देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टी (Likud) आणि मित्रपक्षांच्या उजव्या विचारसरणीच्या आघाडीला सर्वाधिक ५३ जागा मिळाल्या आहेत.
30 Oct 2026 09:30 AM (IST)
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यात एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत शहरात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून प्राप्त झालेल्या अधिकृत तक्रारीनंतर सीबीआयने ८१.६६ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी ही धडक कारवाई केली आहे.
सीबीआयने या प्रकरणात ‘आज का आनंद पेपर्स प्रा. लि.’ (Aaj Ka Anand Papers Pvt. Ltd.) या कंपनीसह तिच्या संचालकांवर आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा आणि निधीचा मोठा अपहार (Misappropriation of Funds), खात्यांच्या हिशेबात फेरफार करणे आणि बँकेची थेट फसवणूक केल्याचा गंभीर आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.






