Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 26.10.2026
Maharashtra to World Breaking News :
बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ (Cyclone Arnab) चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटनपटू नितेश कुमारने सुवर्णपदक पटकावून भारताची पदकांची घौडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ गडी राखून शानदार विजय, मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
दिवाळी सणाच्या तोंडावर भारतीय खाजगी क्षेत्राची कामगिरी गेल्या चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे आर्थिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाची शक्यता वाढल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक साठवणुकीबाबत सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
26 Oct 2026 09:00 AM (IST)
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. ३९ वर्षीय पोलार्डने दक्षिण आफ्रिकेच्या 'SA20' या टी-२० लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'SA20' लीगच्या लिलावात जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) फ्रँचायझीने पोलार्डला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते. मात्र, आता पोलार्डने थेट सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपण या हंगामात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
26 Oct 2026 08:52 AM (IST)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पक्षाने (CJP) दिल्लीत पुकारलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी उधळून लावले आहे. CJP चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी विमानतळावरच पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी अभिजित दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्याकडून 'पीस बॉन्ड' (शांततेचे हमीपत्र) लिहून घेतले आणि आंदोलकांना रोखले.
26 Oct 2026 08:43 AM (IST)
Shivsena Supreme Court Hearing: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित शिवसेना पक्ष नाव आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह वादाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील या कायदेशीर लढाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वोच्च न्यायालयात दिवाळीच्या सुट्ट्यांचा खंड पडल्यानंतर आता २३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार आहे.ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली होती. साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्णत्वाकडे गेला असून अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.






