Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.11.2026
Maharashtra to World Breaking News : ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याचदरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याप्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत विरोधी महाविकास आघाडीची मुसंडी; नागपुरात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींचा मोठा विजय झाला. कर्जत-भीमाशंकर अभयारण्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. जिओ प्लॅटफॉर्म्सचा ऐतिहासिक आयपीओ (Jio IPO) शेअर बाजारात तुफान प्रतिसादासह २१% पेक्षा जास्त प्रीमियमवर यशस्वीरीत्या लिस्ट झाला.
भारताने नवी दिल्लीत आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) महत्त्वाच्या बैठकीसाठी पाकिस्तानला अधिकृत निमंत्रण पाठवले. ‘अर्नब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर ओडिशात हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, महाराष्ट्रात काही भागांत वादळी पावसाचा अलर्ट अद्यापही कायम आहे,
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांची गती तर पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आशियाई पॅरा गेम्समधील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज यादवच्या दुर्दैवी निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा.
29 Oct 2026 06:08 PM (IST)
पुणे:/ Marathon: भारतातील सर्वात जुन्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे, अशी घोषणा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली. मॅरेथॉनचे संस्थापक स्वर्गीय सुरेश कलमाडी यांचे जानेवारी २०२६ मध्ये निधन झाले. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी यंदाची स्पर्धा 'स्वर्गीय सुरेश कलमाडी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६' या नावाने आयोजित केली जाईल.
29 Oct 2026 05:59 PM (IST)
29 Oct 2026 05:45 PM (IST)
तरुण वयात प्रेमाचे आकर्षण अनेकदा गंभीर गुन्ह्यांना आमंत्रण देते, याची प्रचीती देणारी एक थरारक आणि अत्यंत धक्कादायक घटना तामिळनाडूच्या थुथुकडी जिल्ह्यातून समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधातून घडलेल्या या रक्तरंजित नाटकात तिच्या आईला आपला जीव गमवावा लागला आहे, तर वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तामिळनाडू हादरून गेले आहे.
29 Oct 2026 05:30 PM (IST)
मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वींच सुमारे ६०,००० कर्मचाऱ्यांना वॉलंटरी एक्झिट ऑफर दिली आहे, जी त्यांच्या एकूण ग्लोबल वर्कफोर्सच्या सुमारे २७ टक्के आहे. त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून न टाकता त्यांना एक आर्थिक पॅकेज देऊन स्वतःच्या मर्जीने निवृत्ती घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मायक्रोफोर्स एआय आणि क्लाउड इन्फास्ट्रक्चरवर अब्जावधी डॉलर्स खर्च करत असल्याने आपला खर्च कमी करत आहे. याच पार्श्वभूमीवर वॉलंटरी एक्झिट नेमकी आहे तरी काय आणि त्याचा किती प्रभाव पडेल? जाणून घ्या.
29 Oct 2026 05:19 PM (IST)
कर्जतमधील सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीवरून आता चांगलंच रान पेटलं आहे. पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि राजकीय विरोधकांनी राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आधीच दुष्काळी परिस्थिती असताना होत असलेल्या वृक्षतोडीवरून मोठा संताप व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता काँग्रेसनेही यावरून राज्य सरकारला घेरत आक्रमक भूमिका घेतली आहे.
29 Oct 2026 04:57 PM (IST)
टोरंट कंपनीसाठी कर्जत भिमाशंकरच्या जंगलात होत असलेल्या झाडांच्या कत्तलीची पाहणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली व स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, "टोरंट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा संकल्प केला असताना महाराष्ट्रात मात्र झाडांची कत्तल केली जात आहे. पंतप्रधानांचा संकल्प आम्ही आज कर्जतच्या जंगलात वृक्षारोपण करून पूर्ण केला."
29 Oct 2026 04:47 PM (IST)
राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा धुरळा उडाला आहे. विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. शिवसेना शिंदे गटाला एक जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 2 जागा तर काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला. या निकालानंतर महायुतीत खडाजंगी सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच भाजप मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. वाचा सविस्तर...
29 Oct 2026 04:32 PM (IST)
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करत, “पवारांच्या उंबरठ्यावर बसणारे आता गांधींच्या उंबरठ्यावर बसलेत,” असा टोला लगावला आहे.
29 Oct 2026 04:27 PM (IST)
प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी शिवसेनेचे ठाण्यातील टेंभीनाका परिसरात शक्तिप्रदर्शन सुरू आहे. याठिकाणी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे फलक झळकविले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह सेनेचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
29 Oct 2026 04:16 PM (IST)
शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून शिंदे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
29 Oct 2026 04:14 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे प्रदीप पुर्णेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ते कुटुंबियांशी चर्चा करत आहेत. पुर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे.
29 Oct 2026 03:59 PM (IST)
दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील व्यापाराचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणारा एक मोठा आर्थिक आणि सामरिक प्रकल्प सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रात आला आहे. जपानने (Japan BIG-B Initiative) बांगलादेशातील आपल्या बहुचर्चित ‘बिग-बी’ (BIG-B – Bay of Bengal Industrial Growth Belt) या उपक्रमाचा विस्तार करत त्यात भारताचा समावेश करण्याची जोरदार शक्यता आणि मागणी मांडली आहे. बांगलादेशातील मातारबारी (Matarbari) येथे बांधल्या जाणाऱ्या पहिल्या खोल समुद्रातील बंदराला (Deep-Sea Port) केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या या योजनेमुळे बंगालच्या उपसागरात नवीन औद्योगिक आणि सागरी क्रांती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
29 Oct 2026 03:50 PM (IST)
Amazon layoffs 2026: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon मध्ये पुन्हा एकदा नोकरकपात करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या Devices and Services विभागातील सुमारे २५० पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी ईमेल आणि टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती देण्यात आली. या घडामोडीमुळे टेक इंडस्ट्रीतील नोकरकपातीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Amazon layoffs 2026)
29 Oct 2026 03:45 PM (IST)
Sambhajinagar Crime: पतीसोबत घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या एका ३० वर्षीय विवाहितेसोबत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला सुरक्षित घरी पोहोचवण्याचे आश्वासन देऊन ऑटोरिक्षात बसवणाऱ्या चालकानेच तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या जांबरगाव परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
29 Oct 2026 03:40 PM (IST)
Instagram New Update: सोशलमीडिया जाणून काही आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामध्ये इंस्टाग्राम सध्या मोठी भूमिका पार पाडतयं, छोट्या- मोठ्या गोष्टीसाठी आपण इंस्टावर पाहतो. आपली कला दाखवण्याचे एक साधन झाले. इंस्टाग्राम यामध्ये 30 सेकंदाची रील, स्टोरी, फोटो लावण्यात येते. पण आता इंस्टा एक नवीन अपडेट घेऊन आले. ज्यामुळे फेसबुक आणि यूटूबला चांगलाच धक्का लागले. सध्या कंपनी लांब व्हिडिओंवर काम असून एका नवीन गोष्टीची चाचणी करत आहे. ज्याला फिचर्स असे नाव दिले. या फीचरमध्ये काही निवडक लोकांना 90 मिनिटांपर्यंतचा मोठा व्हिडिओ टाकता येणार आहे. Instagram Update:
29 Oct 2026 03:30 PM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan News) सिंध प्रांतातील थरपारकर जिल्ह्यातून एक अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नगरपारकर तालुक्यातील डानो धांधाल भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. या अपघातात एका गरोदर महिलेसह तब्बल नऊ जणांचा जागीच व उपचारादरम्यान करुण अंत झाला आहे. तर अनेक जण आगीच्या तीव्र झळांमुळे गंभीररीत्या भाजले आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीती आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.
29 Oct 2026 03:25 PM (IST)
WPL 2026 Auction: महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL Auction) चा लिलाव २८ ऑक्टोबर कोची येथे पार पडला. कर्नाटकची युवा अष्टपैलू खेळाडू उमा काशवीने महिला प्रीमियर लीग (WPL) २०२७ च्या लिलावात इतिहास रचला. १५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू उमा काशवीला दिल्ली कॅपिटल्स (DC) संघानने आपल्या ताफ्यात सामील केले. दिल्लीने तिला १० लाख रुपयांमध्ये विकत घेतले. या करारामुळे ती डबल्यूपीएलच्या इतिहासात लिलावात विकली जाणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. उमाने अंशु नागरचा विक्रम मोडला आहे. अंशु नागरला देखील वयाच्या १५ व्या वर्षी महिला प्रीमियर लीगच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनेच संघात घेतले होते.
29 Oct 2026 03:20 PM (IST)
Chinmayi More: मराठी मनोरंजनविश्वात कलाकारांसाठी प्रत्येक नवा अनुभव खास असतो. कधी पहिलं शूटिंग, कधी पहिली भूमिका, तर कधी मोठ्या मंचावर मिळालेली संधी आयुष्यभरासाठी आठवण बनून राहते. ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेत ‘राधिका’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री चिन्मयी मोरे हिच्यासाठीही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ हा असाच अविस्मरणीय अनुभव ठरला. पहिल्यांदाच अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित राहणं, रेड कार्पेटवर चालणं आणि मोठ्या व्यासपीठावर डान्सर्सच्या ग्रुपसोबत नृत्य सादर करणं, अशा अनेक गोष्टींचा आनंद तिला यंदा अनुभवता आला.
29 Oct 2026 03:10 PM (IST)
Suicide Case News: महाराष्ट्र राज्यातील विरार पश्चिम येथील हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या ग्लोबल सिटी परिसरात गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका इमारतीतील बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या एका बहिणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या तिघांनीही एकत्र आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
29 Oct 2026 03:07 PM (IST)
Nana Patole Criticized Devendra Fadnavis: नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातच या पराभवामुळे मोठी नामुष्की ओढावल्याची चर्चा आहे. देशभरातील विधानपरिषद (MLC Election) निकालांवरून विरोधी पक्षांना डिवचणारे एक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेच ट्विट देवेंद्र फडणवीस यांनीही रिट्विट केले होते. पण नागपूरचा निकाल विरोधात जाताच फडणवीस यांनी ते ट्विट डिलीट केले. हे ट्विट डिलीट केल्यानंतर काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडले आहे.
29 Oct 2026 02:59 PM (IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण २ नोव्हेंबरला दिल्ली दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही भेट घेणार आहेत.
29 Oct 2026 02:46 PM (IST)
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.
29 Oct 2026 02:32 PM (IST)
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उद्या आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमाच्या तयारीसाठी INDIA आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पी. जी., गौरव गोगोई आणि जॉन ब्रिटास यांच्यासह INDIA आघाडीचे अन्य नेते बैठकीला उपस्थित आहेत.
29 Oct 2026 02:23 PM (IST)
पुण्यात कालवा समितीच्या बैठकीला सुरु आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील आमदार बैठकीला उपस्थित आहेत.
29 Oct 2026 02:16 PM (IST)
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. सभेसाठी आवश्यक संचालकांची उपस्थिती पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होऊ शकली नाही.
29 Oct 2026 02:02 PM (IST)
अॅमेझॉनने आपल्या डिव्हाइसेस अँड सर्व्हिसेस विभागातील सुमारे २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं आहे. या कपातीचा सर्वाधिक परिणाम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील पदांवर झाल्याचं वृत्त आहे.
29 Oct 2026 01:55 PM (IST)
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ शक्तिशाली चक्रीवादळ धडकले. वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागानुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे १.२० वाजता चक्रीवादळाच्या जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली. बापटला ते विशाखापट्टणमदरम्यान, यानमच्या दक्षिणेला काकीनाडाजवळ हे वादळ किनाऱ्यावर आले.वादळामुळे लाखो लोकांना फटका बसला असून, किनारपट्टीच्या भागांत मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान ताशी १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. किनाऱ्यावर धडकल्यानंतरही वादळाची तीव्रता कायम राहिली.
29 Oct 2026 01:45 PM (IST)
वादग्रस्त वक्तव्यांमुळे यापूर्वीही चर्चेत आलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांवरील विधानामुळे चर्चेत आले आहेत. दुष्काळाच्या संकटाने आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असताना त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रेला कोणी जाऊ नये, जेव्हा अंत्ययात्रेला कोणी जाणार नाही, तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि तो आत्महत्या करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
29 Oct 2026 01:35 PM (IST)
जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली असली, तरी तिचं भारतीय संस्कृतीशी असलेलं नातं आजही कायम आहे. भारतीय सण आणि परंपरा ती तितक्याच उत्साहाने साजऱ्या करते. याचीच झलक तिच्या करवा चौथच्या तयारीतून पाहायला मिळाली आहे. प्रियांकाने तिच्या हातावरील मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यावर पती निक जोनसचं नावही पाहायला मिळत आहे.
29 Oct 2026 01:30 PM (IST)
सोशलमीडिया जाणून काही आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामध्ये इंस्टाग्राम सध्या मोठी भूमिका पार पाडतयं, छोट्या- मोठ्या गोष्टीसाठी आपण इंस्टावर पाहतो. आपली कला दाखवण्याचे एक साधन झाले. इंस्टाग्राम यामध्ये 30 सेकंदाची रील, स्टोरी, फोटो लावण्यात येते. पण आता इंस्टा एक नवीन अपडेट घेऊन आले. ज्यामुळे फेसबुक आणि यूटूबला चांगलाच धक्का लागले. सध्या कंपनी लांब व्हिडिओंवर काम असून एका नवीन गोष्टीची चाचणी करत आहे. ज्याला फिचर्स असे नाव दिले. या फीचरमध्ये काही निवडक लोकांना 90 मिनिटांपर्यंतचा मोठा व्हिडिओ टाकता येणार आहे.
29 Oct 2026 01:25 PM (IST)
अमेरिका आणि इराणमधील (US Iran war) तणावाने आतापर्यंतची सर्वात धोकादायक पातळी गाठली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले असून मध्य पूर्वेत एका भीषण महायुद्धाचे संकेत मिळत आहेत. इराण आपल्या गुप्त पर्वतीय बोगद्यांमध्ये वेगाने अणुबॉम्ब विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. या घाईगडबडीत सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मानकांना बाजूला ठेवल्याने अत्यंत गंभीर अणु-अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. इराणच्या नव्या नेतृत्वाने आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्पने (IRGC) आपल्या नागरिकांना संभाव्य आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
29 Oct 2026 01:15 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलत धारक प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी राष्ट्रीय सामान्य वाहतूक कार्ड (NCMC) नोंदणीला गती देण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांनी नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
29 Oct 2026 01:05 PM (IST)
नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुळात, नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या रॅगिंगच्या प्रकरणावरून प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने २०२५ बॅचच्या सर्व १४६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना ३ महिन्यांसाठी सस्पेंड केले आहे. प्रिन्सिपल प्राध्यापक उषा शर्मा यांच्या मते, २०२५ बॅचच्या १४६ विद्यार्थ्यांना जानेवारी २०२७ पर्यंत वर्गात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, रॅगिंगचे आरोप असलेल्या विद्यार्थ्यांना २४ तासांच्या आत हॉस्टेल खाली करण्याचे आणि कॉलेज कॅम्पस सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
29 Oct 2026 01:00 PM (IST)
Leopard Attack Farmer: मध्यरात्रीची वेळ… शेतातील झोपडीत एकटेच झोपलेले ६५ वर्षीय वृद्ध… आणि अचानक समोर साक्षात मृत्यू बनून आलेला बिबट्या! कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा थरार घडला. गणपत जाधव या ६५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या हिमतीच्या जोरावर बिबट्याला पळवून लावले, परंतु त्यांच्या गोधडीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
29 Oct 2026 12:55 PM (IST)
मुंबई : रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना महिलांना अनेकदा स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. कॅबमध्ये बसल्यानंतर चालकाची माहिती तपासणे, प्रवासाचा मार्ग लक्षात ठेवणे, कुटुंबीयांना फोन करणे किंवा आपले लोकेशन शेअर करणे, अशा अनेक गोष्टी महिला खबरदारी म्हणून करतात. मात्र, मुंबईत रात्रीच्या प्रवासादरम्यान आलेल्या एका वेगळ्या अनुभवामुळे अपूर्वा नावाच्या तरुणीचा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
29 Oct 2026 12:50 PM (IST)
अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना (South Carolina) राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सवाना रिव्हर नॅशनल लॅबोरेटरीमध्ये (Savannah River National Laboratory – SRNL) अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. (US Nuclear Lab) अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या (Department of Energy) या प्रमुख संकुलात सायंकाळी ५:३९ च्या सुमारास ही घटना घडली. आगीची बातमी समजताच प्रशासनाने तातडीने ‘साईट एरिया इमर्जन्सी’ (Site Area Emergency) म्हणजेच आणीबाणीची घोषणा केली. अणुशस्त्रे निर्माण आणि आण्विक संशोधन करणाऱ्या या केंद्रात आग लागल्याची बातमी पसरताच स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
29 Oct 2026 12:45 PM (IST)
IND vs NZ: भारताविरूद्ध टी२० सिरीजच्या चौथ्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका लागला आहे. यजमान संघ सुरूवातीचे तिन्ही सामने भारतासमोर हरली आहे. आता संघातील वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनदेखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शुक्रवारी टी२० सिरीजचा चौथा सामना ऑकलँडमधील इडेन पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. हा संपूर्ण सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली असून सर्व तिकिट्स विकली गेली आहेत. मात्र न्यूझीलंड एक तरी सामना जिंकणार का? अशी आता चर्चा सुरू झाली आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या संघाचा डोक्याचा ताप नक्कीच वाढला आहे.
29 Oct 2026 12:40 PM (IST)
नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार. 35000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, गर्दी हा आकडा ओलांडू शकते. या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे. सभेवर लक्ष ठेवण्यासाठी २५०० ते ३००० पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. दिल्लीबाहेरून सुरक्षा दलाच्या दहा कंपन्याही बोलावण्यात येतील.
29 Oct 2026 12:35 PM (IST)
Air Marshal Vikram Gaur Appointed Additional Secretary DMA: भारतीय हवाई दल आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आला आहे. भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ आणि अत्यंत अनुभवी अधिकारी एअर मार्शल विक्रम गौर यांची संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्स’ (सैन्य व्यवहार विभाग) मध्ये अतिरिक्त सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विशेष मानली जात आहे, कारण संरक्षण मंत्रालयाच्या या महत्त्वाच्या विभागात अतिरिक्त सचिवपद भूषवणारे ते भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे भूदल, नौदल आणि हवाई दल यांच्यात अधिक चांगला समन्वय राखण्यास मदत होईल.
29 Oct 2026 12:30 PM (IST)
Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलताना दिसते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेला एक विचित्र अनुभव सांगितला आहे. एका सीनसाठी ब्रा न घालता शर्टची बटणं उघडी ठेवण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली होती, असा खुलासा राधिकाने केला. एवढंच नव्हे, तर कलाकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या इंटीमसी कोऑर्डिनेटर्सनाही निर्मात्यांच्या दबावामुळे कामावरून काढण्यात आल्याचं तिने सांगितलं.
29 Oct 2026 12:25 PM (IST)
DA Hike: नुकतेच, केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढ २०२६ जाहीर केली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ६३% झाला आहे. सरकारने काही कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणाही केली आहे. तर, या दिवाळीत गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय जाणून घेऊया: म्युच्युअल फंड, बँक एफडी, पोस्ट ऑफिस एफडी आणि पीपीएफ योजना (एसआयपी विरुद्ध पीपीएफ विरुद्ध एफडी).
29 Oct 2026 12:20 PM (IST)
Amravati Accident News: अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तिवसा शहरातून जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक ५२ वर्षीय शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. पिंटू उर्फ दिवाकर माहोरे असे वाहून गेलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, कालपासून प्रशासनाकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे, मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.
29 Oct 2026 12:15 PM (IST)
Amravati News: जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मिळणाऱ्या विविध अनुदानांच्या खर्चासाठी लागू करण्यात आलेल्या एसएनए स्पर्श प्रणालीमुळे मुख्याध्यापकांना तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे.संथ सव्र्व्हर, ऑनलाइन प्रक्रियेतील किचकटपणा आणि ओटीपीसाठी मिळणारी अवघ्या एका मिनिटाची मुदत यामुळे मुख्याध्यापकांचा अध्यापनासह शालेय कामकाजाचा वेळ खर्च होत आहे. या प्रणालीतील अडचणी दूर करून अनुदान खर्चाची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
29 Oct 2026 12:10 PM (IST)
Nagpur MLC Election 2026: राज्य विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव करत काँग्रेससाठी नागपूरमध्ये नवे दरवाजे उघडले आहेत. सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी सर्व प्रकारची रणनीती, सुक्ष्म नियोजन आणि मोठा प्रचारही करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मतदानाचे गणित जुळवण्यात मात्र पक्षाला यश मिळवता आले नाही.
29 Oct 2026 12:05 PM (IST)
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पोलीस खात्याच्या कारभारावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात राजकीय पराभव करता येत नसल्याने त्यांची बदनामी करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप देवरा यांनी केला. पोलीस खात्याबाबत भाष्य करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील घटनांवर स्पष्टीकरण द्यावे, असेही त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
29 Oct 2026 11:55 AM (IST)
आजकाल प्रत्येकाच्या खिशाला रिचार्जचा खर्च परवडत नाही. सगळे प्लॅन महाग झाले आहेत. महिन्याला 200-300 रुपये तर सहज जातात. पण तुम्हाला माहितीये का, जिओकडे एक असा प्लॅन आहे जो फक्त 123 रुपयात पूर्ण महिना चालतो? हो, अगदी खरं आहे. फक्त 123 रुपयात 28 दिवसांसाठी सगळं मिळतं
29 Oct 2026 11:45 AM (IST)
राज्यात सर्व शाळा, अंगणवाड्या तसेच आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांतील वंचित वाड्या-वस्त्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी देण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत शाळा-अंगणवाड्यांतील पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांना पाणी आणि हात धुण्याची सुविधा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश आहेत. नळजोडणीपासून वंचित आदिवासी वस्त्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. कक्ष अधिकारी अंजली बोडके यांनी ही माहिती दिली.
29 Oct 2026 11:35 AM (IST)
आजच्या काळात मुलांचे आयुष्य पुस्तके, गृहपाठ आणि निकालांपुरते मर्यादित राहिलेले नाही. हे मानसिक ताणतणाव, भविष्याची भीती आणि अनिश्चिततेचे जाळे बनले आहे. मुंबईस्थित ‘IC3 इन्स्टिट्यूट’ने ‘स्टुडंट वेल-बीइंग पल्स’ (Student Well-being Pulse) अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणात देशातील ८,५४२ पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. अहवालानुसार, १२ वीच्या सुमारे ५९% मुले-मुली त्यांच्या शालेय जीवनापासून संतुष्ट नाहीत आणि शाळा जाणे हा त्यांच्यासाठी एक भार वाटू लागला आहे.
29 Oct 2026 11:25 AM (IST)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा एक अत्यंत विचित्र आणि हायटेक प्रकार सीमाशुल्क (Customs) अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. बँकॉकहून पुण्यात उतरलेल्या एका भारतीय प्रवाशाने आपल्या स्पोर्ट्स शूजच्या सोलमधील खास कप्प्यांमध्ये लपवून आणलेले लाखो रुपयांचे हशिश ड्रग्ज अधिकाऱ्यांनी कारवाई करत जप्त केले. प्रवाशाची ही अनोखी आणि चलाख पद्धत पाहून खुद्द कस्टम अधिकारीही अवाक झाले आहेत.
29 Oct 2026 11:15 AM (IST)
नागपूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने चार राज्यांमधील विधान परिषदेच्या २८ जागांवर १२ उमेदवार उभे केले होते, पण केवळ एकच उमेदवार विजयी झाला. अभिजीत वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मोठ्या फरकाने पराभव करून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी दिली आहे.






