Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 27.10.2026
Maharashtra to World Breaking News :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकातील विधानपरिषद (MLC) निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून आज निकाल जाहीर होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इमर्जिंग सायन्स, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम परिषद २०२६’ (ESTI 2026) चे भव्य उद्घाटन होणार आहे. इस्रोने २०२९ पर्यंत चार नवी लाँच पॅड्स उभारण्याची घोषणा केली, तर भारतानं २०२९ च्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदाचा मान पटकावला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून दुखापतीमुळे सलामीवीर इसान किशन मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय रेल्वेने आज, २७ ऑक्टोबरपासून तिकीट खिडकीवरून आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी केवळ ४५ पैशांत १० लाख रुपयांपर्यंतचे optional प्रवासी कवच (Insurance) लागू केले आहे.
27 Oct 2026 09:29 AM (IST)
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बीड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, उद्या कर्जत-भीमाशंकर परिसरातील वादग्रस्त वृक्षतोड क्षेत्राला भेट देणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. याशिवाय केज तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील.
27 Oct 2026 09:19 AM (IST)
अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य मिथेनॉल विक्री करणाऱ्या कंपन्यांवर घेतलेल्या कठोर निर्णयाला खुद्द महायुती सरकारमधूनच विरोध आणि ब्रेक लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात घडलेल्या विषारी दारूच्या घटनेनंतर तुकाराम मुंढे यांनी तत्परता दाखवत अवैध मिथेनॉल साठवणूक आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. मात्र, मंत्र्यांच्या हस्तक्षेपाने या कारवाईला स्थगिती देण्यात आल्याने प्रशासकीय व राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे.
27 Oct 2026 09:09 AM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विधानपरिषदेच्या ५ मतदारसंघांमधील (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ) मतमोजणीला आज २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. २३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज अखेर राजकीय भवितव्य स्पष्ट होणार असून महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.५ जागांसाठी रिंगणात असलेल्या तब्बल १८२ उमेदवारांच्या नशिबाचा कौल आज स्पष्ट होईल.
प्रमुख मतदारसंघ:
पदवीधर मतदारसंघ (३): नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा).
शिक्षक मतदारसंघ (२): पुणे आणि अमरावती.
27 Oct 2026 08:59 AM (IST)
Madhya Pradesh Rain Alert: २७ ऑक्टोबर २०२६ पासून मध्य प्रदेशात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आज राज्याच्या पूर्व भागातील ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात मेघगर्जना आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. २९ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






