Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : ८८ मतदारसंघात दलित मतदारांची भूमिका ठरणार निर्णायक; महायुतीने आखला मास्टरप्लान

संविधान बदण्याची भाषा आणि विरोधकांकडून त्याचा प्रचारात केलेला योग्य वापर यामुळे दलित मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळाला. महाविकास आघाडीने 88 विधानसभेच्या जागांपैकी 51 जागांवर आघाडी घेतली होती.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 28, 2024 | 04:53 PM
भाजपने आपल्या कोट्यातून मित्रपक्षांसाठी ४ जागा सोडल्या आहेत.

भाजपने आपल्या कोट्यातून मित्रपक्षांसाठी ४ जागा सोडल्या आहेत.

Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या काही नेत्यांकडून संविधान बदणार असल्याची विधान करण्यात आली होती. या मुद्द्यांवरून भाजपवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. लोकसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीने प्रचारातही हाच मुद्दा उचलून धरला. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. दलित आणि अल्पसंख्याक मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे मविआला ३० जागा जिंकता आल्या. आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही दलित मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-Maharashtra Election 2024 : महायुती की महाविकास आघाडी, महाराष्ट्रात कोणाची सत्ता? निडणुकीत ठरणार हे ७ मुद्दे महत्त्वाचे

लोकसभा निवडणुकीत ५१ मतदारसंघात मविआची आघाडी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने (SP) 48 पैकी 30 जागा जिंकल्या. तर सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपला तर आधीच्या जागाही राखता आल्या नाहीत. संविधान बदण्याची भाषा आणि विरोधकांकडून त्याचा प्रचारात केलेला योग्य वापर यामुळे दलित मतदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळाला. महाविकास आघाडीने 15 टक्क्यांपेक्षा जास्त दलित मतदार असलेल्या 88 विधानसभा जागांपैकी 51 जागांमध्ये आघाडी घेतली होती.

त्यातून धसका घेतलेल्या महायुतीने विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. फेक नरेटीव्ह सेट केल्याचा आरोप केला. यातून मार्ग काढण्यासठी डॅमेज कन्ट्रोटही सुरू करण्यात आले. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दलित समजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पातळीवरूनही प्रयत्न केला जात आहे. माजी कायदामंत्री किरण रिजूजू यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात संविधान उभारण्यार असल्याचं आश्वासन दिलं होतं.

हेही वाचा-Mahavikas Aghadi | काँग्रेसच्या सचिन पोटेंचा कार्यकर्त्यांसह पदांचा राजीनामा | Congress Vidhan Sabha

युतीच्या काळात भाजप-शिवसेनेला पाठिंबा

दलित मतदार महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. 2011 च्या जनगणनेनुसार, SC मध्ये राज्याच्या 12% लोकसंख्येचा समावेश होतो. ज्यामध्ये 59 पेक्षा जास्त भिन्न जातींचा समावेश. यात नवबौद्धांची संख्या सुमारे 40 टक्के आहे. यातील मातंग समाजाचं समर्थन भाजपने मिळवलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये, 88 विधानसभा जागांमध्ये, जिथे दलित समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणिय आहे, तिथे भाजपने- शिवसेना युतीने 46 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस-NCP युतीने 33 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे २०१९ मध्ये दलित मतदार भाजपच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होतं. लोकसभा निवडणुकीपासून मात्र दलित आणि अल्पसंख्याक मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं निकालावरून दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही दलित मतदार निर्णायक भूमिका घेणार का, याची महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता लागली आहे.

Web Title: Maharashtra assembly election 2024 mahayuti prepared master plan dalit voters power 88 constituencies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
1

KDMC Election : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.