Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India-या अहवालानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केल्यानंतर राजनैतिक हालचाली तीव्र झाल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 24, 2026 | 10:18 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 Mar 2026 10:18 AM (IST)

    24 Mar 2026 10:18 AM (IST)

    टेक्सास हादरलं! पोर्ट ऑर्थरच्या ऑईल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट

    अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एक हादरवणारी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. राज्यातील पोर्ट ऑर्थ येथील वैलेरो (Valero) या ऑईल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. सोमवारी (२३ मार्च २०२६) संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

  • 24 Mar 2026 09:40 AM (IST)

    24 Mar 2026 09:40 AM (IST)

    कोलंबियात ११० सैनिकांना घेऊन जाणारे विमान कोसळले

    Colombia Military Plane Crash News Marathi : बोगोटा : दक्षिण अमेरिकेत एक भीषण दुर्घटना घडली आहे. सुमारे ११० सैनिकांना घेऊन जाणारे लष्करी वाहतूक विमान टेकऑफच्या काही क्षणानंतरच कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण कोलंबियात खळबळ उडाली आहे. याचा एक थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबियाच्या लष्कराचे C-130 हरक्यूलिस विमाना सैनिकांच्या दोन प्लाटूनना घेऊन निघाले होते. या विमानाने प्यूर्टो लेगुजामो येथील विमानतळावरुन उड्डाण घेतले. उड्डाणाच्या दोन मिनिटानंतरच इक्वाडोरच्या सीमेजवळ विमान कोसळले आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. मीडिया रिपोर्टनुसार, या विमानात ११० सैनिक होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सध्या बचाव कार्य वेगाने सुरु असून २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

  • 24 Mar 2026 09:35 AM (IST)

    24 Mar 2026 09:35 AM (IST)

    भोंदू अशोक खरातवर आणखी तीन गुन्हे दाखल 

    नाशिक: स्वयंघोषित 'कॅप्टन' आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधातील तक्रारींचा ओघ वाढतच आहे. रविवारी खरातवर आणखी तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, आता त्याच्यावरील एकूण गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

    कार्यालयातच लैंगिक छळ आणि विद्यार्थिनीवर अत्याचार तपासादरम्यान समोर आले आहे की, खरात आपल्या कार्यालयातच महिलांचा लैंगिक छळ करत असे. धक्कादायक म्हणजे, या नराधमाने एका विद्यार्थिनीलाही सोडले नाही, तिच्यावरही अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत. अनेक महिला सामाजिक दबावापोटी आणि भीतीपोटी अद्याप समोर आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, नाशिक पोलिसांनी विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला असून, पीडित महिलांनी किंवा ज्यांच्याकडे याबद्दल खात्रीलायक माहिती आहे त्यांनी निर्भीडपणे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 24 Mar 2026 09:30 AM (IST)

    24 Mar 2026 09:30 AM (IST)

    भोंदूबाबा अशोक खरातने अल्पवयीन असतानाच केली होती कुकर्मे

    नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या पूर्वायुष्यातील अनेक धक्कादायक आणि काळी कृत्ये आता समोर येऊ लागली आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, खरातचा गुन्हेगारी इतिहास त्याच्या अल्पवयीन असल्यापासूनचा असल्याचे उघड झाले आहे.

    गावातून पलायन आणि थायलंड कनेक्शन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने तरुणपणातच अशी काही कुकर्मे केली होती की, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाची मोठी बदनामी झाली होती. या कृत्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर आणि बदनामीच्या भीतीने त्याने गावातून पळ काढला होता. अनेक वर्षे मजूर म्हणून काम केल्यानंतर तो थायलंडला गेला, तिथे त्याचा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संपर्क आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

  • 24 Mar 2026 09:25 AM (IST)

    24 Mar 2026 09:25 AM (IST)

    श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मृणाल जाधवचा जामीन अर्ज फेटाळला 

    कल्याण: प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या बदलापूरच्या मृणाल जाधव हिला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला असून, तिची रवानगी पुन्हा आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी रोजी मृणाल जाधव हिने प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या घटनेची गंभीर दखल घेत बदलापूर पोलिसांनी तिला तातडीने अटक केली होती.

  • 24 Mar 2026 09:20 AM (IST)

    24 Mar 2026 09:20 AM (IST)

    Pune Crime: मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

      पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने एवढे टोकाचे पाऊल उचलायचे समोर आले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना चिखली परिसरात घडलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी तिचा मोबाईल तपासाला होता. याच राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्रश्न केले होते.

  • 24 Mar 2026 09:10 AM (IST)

    24 Mar 2026 09:10 AM (IST)

    World TB Day 2026 : 24 मार्चलाच का साजरा होतो ‘वर्ल्ड टीबी डे’?

    World TB Day 2026 Theme : दरवर्षी २४ मार्च रोजी जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिन’ (World TB Day) साजरा केला जातो. हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, तो एका अशा लढाईची आठवण करून देतो जी मानवी आरोग्य वाचवण्यासाठी गेली कित्येक दशके सुरू आहे. १८८२ मध्ये याच दिवशी डॉ. रॉबर्ट कोच यांनी ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ या जिवाणूचा शोध लावला होता. आजही टीबी हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे, परंतु वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

  • 24 Mar 2026 09:05 AM (IST)

    24 Mar 2026 09:05 AM (IST)

    Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट?

    एआय माणसांची जागा घेणार का, अशी शंका गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आणि हॉटेल्समध्ये एआय रोबोट कामासाठी ठेवण्यात आले आहेत. माणसांची जागा एआयने घेतल्यास खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरु होती. ही सर्व चर्चा सुरु असतानाच आता एआयबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याप्रमाणे एआय ऑफीसमधील कर्मचाऱ्यांसाठी काम करतो, त्याचप्रमाणे आता सिईओच्या पोस्टसाठी देखील एआय एजेंट काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Maharashtra to World Breaking News:

युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु; अनेक मुस्लिम राष्ट्र एकत्र

गेल्या काही दिवसांपासून इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले केले जात आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या युद्धामुळे मोठे संकट जगाला सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक मुस्लिम देश एकत्र येणार असून, इस्लामाबादेत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती दिली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील पाच दिवसांसाठी इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की, इराणसोबत शस्त्रसंधी चर्चा सुरू आहे. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.

Web Title: Maharashtra breaking news 24st march live updates maharashtra politics national international politics crime viral video sports world war3 breaking updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • World War 3

संबंधित बातम्या

India-Argentina Trade: संकटात ‘हा’ देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा
1

India-Argentina Trade: संकटात ‘हा’ देश ठरला खरा मित्र; भारतासाठी वाढवला LPG गॅस पुरवठा

गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार
2

गॅस सिलिंडरच्या वजनात कोणतीही कपात नाही; यापुढेही 14.2 किलोचाच गॅस मिळणार

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान
3

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान

Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव
4

Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.