Nashik News: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात कोकाटे यांच्या अटकेसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, कॅबिनेट बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद लागत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

