
Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news updates- ऑस्ट्रेलियातील सिडनीजवळील बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात घबराट पसरली. पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले, तर दुसरा ताब्यात आहे. हल्लेखोर वडील आणि मुलगा असल्याची माहिती असून 50 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला, तर 24 वर्षीय मुलावर उपचार सुरू आहेत. ज्यू समुदायाला लक्ष्य केल्याने स्थानिक ज्यू बोर्डाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
15 Dec 2025 07:04 PM (IST)
देशातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई हा साबरमती तुरुंगात बंद आहे. तर त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईचे नवीन निवासस्थान तिहार मध्यवर्ती तुरुंग आहे. अनमोलची तिहार तुरुंगात बदली झाल्यामुळे देशातील सर्वात उच्च सुरक्षा असलेले तुरुंग पुन्हा एकदा टोळीयुद्धाच्या भीतीने चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोई तिहार तुरुंगात येताच तुरुंग प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर आहे. प्रतिस्पर्धी टोळ्या आता थेट अनमोलला लक्ष्य करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीला आणखी बळकटी देण्यासाठी अनमोल तिहारमधूनच एक नवीन सिंडिकेट तयार करेल का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
15 Dec 2025 06:54 PM (IST)
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आपल्या भारत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत दाखल झाला. अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मेस्सीला भेटण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah), डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या. या खास प्रसंगी जय शाह यांनी मेस्सी, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि रोहन जेटली यांना भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट दिली. या भेटीदरम्यान मेस्सीही क्रिकेटच्या रंगात रंगलेला दिसला.
15 Dec 2025 06:38 PM (IST)
मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रैक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे या ठिकाणी कोणतंही कॉक्रिटचं होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
15 Dec 2025 06:30 PM (IST)
राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका होणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू केली गेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
15 Dec 2025 05:57 PM (IST)
जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नाही. पिंपरखेड येथील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव मंगरूळ येथे सोमवारी (दि. १५ ) भरदिवसा साडेअकरा वाजताच्या सुमारास कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
15 Dec 2025 05:35 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खान सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोल होत आहे. व्हिडिओमध्ये सोहेल मुंबईच्या रस्त्यांवर हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका व्यक्तीला त्याने शिवीगाळ केल्याने वाद आणखी वाढला. सोशल मीडिया वापरकर्ते त्याच्या निष्काळजीपणा आणि वर्तनाबद्दल त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. व्हिडिओमध्ये सोहेल खान हेल्मेटशिवाय वेगाने सायकल चालवून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या निष्काळजीपणामुळे चाहते संतापले आहेत आणि कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.
15 Dec 2025 05:19 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डूडूळगाव व किवळे येथे एकूण १,९४५ सदनिकांची संगणकीय सोडत पारदर्शक पद्धतीने घेतली. आमदार शंकर जगताप यांनी सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची महापालिकेची भूमिका अधोरेखित केली.
15 Dec 2025 04:54 PM (IST)
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुका २९ जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजची पत्रकार परिषद ही महापालिका निवडणुकांसाठी आहे. २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात येत आहे.
15 Dec 2025 04:50 PM (IST)
कणकवली तालुक्यातील कासारडे येथील शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्त्राव झाला. कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय १९) युवतीचा मृत्यू झाल्याबद्दल संतप्त ग्रामस्थांनी कणकवली शहरातील खाजगी रुग्णालय व नर्सिंग होमची तोडफोड केली. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दाखल असलेल्या पोलिसांनी कौशल्याने संतप्त जमावावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. त्यानंतर युवतीचा मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला. एकीकडे संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयाची बरीच तोडफोड केली ही गोष्ट खरी असली तरी युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर तिच्या कुटुंबीयांना मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, कणकवलीत खाजगी रुग्णालय तोडफोडीनंतर गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी दिली.
15 Dec 2025 04:40 PM (IST)
सिंधुदुर्गात पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून वेंगुर्ला, मालवण आणि देवगड या तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गात येणारे पर्यटक प्रामुख्याने समुद्रातील वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत असताना वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथे मागील दोन वर्षात “कायाकिंग” हा पर्यटनाचा नवीन ट्रेंड पुढे आला आहे. यामध्ये खाडीपात्रात पर्यटकांना कांदळवन सफारी, बोटींग, खाडीतील जैवविविधता अनुभवता येते. या नवीन “कायाकिंग” ट्रेंडमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.
15 Dec 2025 04:35 PM (IST)
बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. भाजपच्या नेतृत्वाखाली बदलापूरमधील सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असून त्यामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. बदलापूरकरांचे नॅशनल हायवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून रेल्वेमुळे शहरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला. यामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
15 Dec 2025 04:30 PM (IST)
आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडानंतर आता बदलापूरचा “देवाभाऊ चष्मा” मध्यपूर्वेतही पोहोचला आहे. इजिप्तची राजधानी कायरो येथे 11 व 12 डिसेंबर रोजी झालेल्या IRC जागतिक परिषदेत व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांनी या अभिनव उपक्रमाचे सादरीकरण केले. या परिषदेचा शुभारंभ इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबोली यांच्या हस्ते करण्यात आला.
15 Dec 2025 04:25 PM (IST)
गमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेकांचा बळी गेला आहे.ज्यात नुकताच ४ वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि सरकारच्या धोरणांविरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.या मोर्चात मृतांच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन सरकारच्या गलथान कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला...यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करून संगमनेरच्या जनतेला भयमुक्त करण्याची मागणी केली तर प्रशासन निवेदन स्वीकारायला उशिरा आल्याने आमदार तांबे संतप्त झाले आणि त्यांनी शासन व वनविभागाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.अखेर सिद्धेश कडलगच्या वडिलांनी निवेदन दिले ज्यात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
15 Dec 2025 04:20 PM (IST)
संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेकांचा बळी गेला आहे.ज्यात नुकताच ४ वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि सरकारच्या धोरणांविरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.या मोर्चात मृतांच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन सरकारच्या गलथान कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला.यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करून संगमनेरच्या जनतेला भयमुक्त करण्याची मागणी केली तर प्रशासन निवेदन स्वीकारायला उशिरा आल्याने आमदार तांबे संतप्त झाले आणि त्यांनी शासन व वनविभागाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अखेर सिद्धेश कडलगच्या वडिलांनी निवेदन दिले ज्यात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
15 Dec 2025 04:15 PM (IST)
आज सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने वागळे प्रभाग समिती कार्यालय समोर निषेध आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. सदर आंदोलनाप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते व ब्लॉक अध्यक्ष हिंदुराव गळवे, ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग, अब्बास अत्तार, निशिकांत कोळी महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्मिता वैती, मधुरा रांगळे, राजेंद्र हैबती, अमरनाथ गुप्ता, सुनील यादव सुर्वे, मीनाक्षी थोरात आशा गोखले, सनी थॉमस, बाळा डकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
15 Dec 2025 04:10 PM (IST)
डोंबिवतील कोपर स्टेशन परिसरात नरेंद्र जाधव उर्फ काल्या भाई या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे नरेंद्र जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने तीन जणांनी सपासप वार केले होते. त्यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश होता. रामनगर पोलिसांनी आरोपींनी शोधण्याकरीता तीन तपास पथके तयार केली होती. पोलिसाना या प्रकरणात अखेर यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश बिराजदार, दिवाकर गुप्ता आणि आलिफ खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसापूर्वी नरेंद्र जाधव याने आकाश याला मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आकाशने त्याच्या साथीदारासर नरेंद्र याचा काटा काढला.
15 Dec 2025 04:05 PM (IST)
देशातील पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झाचे नाव ऐकताच लोक थरथर कापत होते. त्याने महाराष्ट्राच्या गुन्हेहगारी विश्वातच नाही तर संपूर्ण अंडरवर्ल्डवर राज्य केलं. पण आज याच हाजी मस्तानची मुलगी मदतीसाठी रडताना दिसत आहे. हाजी मस्तानच्या मुलीने म्हणजेच हसीन मस्तान मिर्झा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थेट मदतीची याचना केली आहे. हसीन मस्तानने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्यायाची विनंती केली आहे. हसीन मिर्झाच्या पतीने तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. वाचा संपूर्ण प्रकरण
15 Dec 2025 04:05 PM (IST)
कल्याण डोंबिवलीतील झोपडपट्टी परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटातर्फे केडीएमसीवर मुख्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत कर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
15 Dec 2025 04:00 PM (IST)
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नसतानाच, उरण तालुक्यातील जासई परिसरात रस्त्याच्या कडेला ‘राष्ट्रीय लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे फलक झळकू लागल्याने या विषयाला पुन्हा एकदा वेग आला आहे. विमानतळावरून प्रत्यक्ष विमान उड्डाणे सुरू होण्यापूर्वीच अधिकृतपणे नाव जाहीर करण्यात यावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वाचा संपूर्ण प्रकरण
15 Dec 2025 03:55 PM (IST)
:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कात्रज कोंढवा रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुण्यात आज विविध विकासकामांचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधन केले.
LIVE | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण
🕒 दु. २.५७ वा. | १५-१२-२०२५📍पुणे. #Maharashtra #Pune #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/xY5lqATwx5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 15, 2025
15 Dec 2025 03:54 PM (IST)
दिल्ली: वायू प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टीडीपी खासदार अप्पलनायडू कालिसेट्टी यांनी मास्क घालून संसदेत सायकल चालवली. ते म्हणाले, "दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येमुळे जनता त्रस्त आहे."
#WATCH दिल्ली: TDP सांसद अप्पलनायडू कलिसेट्टी वायु प्रदूषण के बारे में जागरूकता फैलाने के लिए मास्क पहनकर साइकिल से संसद पहुंचे।
उन्होंने कहा, "दिल्ली में प्रदूषण की समस्या के कारण जनता परेशान है।" pic.twitter.com/r1kcHF7xEZ
— ANI_HindiNews (@AHindinews) December 15, 2025
15 Dec 2025 03:50 PM (IST)
हाँगकाँगचे माजी माडिया टायकून जिमी लाई यांच्यावर देशाविरोधा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. ७८ वर्षीय जिमी लाई हे चीनचे कट्टर टीकाकार आणि लोकशाहीचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी हाँगकाँग सरकार आणि चीनच्या कमुनिस्ट पक्षावर उघडपणे टिका केली आहे. २०२० मध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. दरम्यान पाच वर्षानंतर न्यायालयाने लाई यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवेले आहे.
15 Dec 2025 03:45 PM (IST)
Karma Management Global Consulting Solutions यांनी श्रम व रोजगार मंत्रालयाने 21 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या चार नव्या लेबर कोड्सवर आधारित तीन भागांची वेबिनार सिरीज यशस्वीरित्या पूर्ण केली. या सत्रांचा उद्देश संस्थांना या बदलांचा प्रत्यक्ष परिणाम समजावून सांगणे आणि सुरळीत संक्रमणासाठी तयारी करण्यात मदत करणे हा होता. HR टीम्स, कंप्लायन्स ऑफिसर्स आणि बिझनेस लीडर्स यांच्यासह 2,500 पेक्षा अधिक सहभागींनी या वेबिनार सिरीजला उपस्थिती लावली, ज्यामुळे नव्या नियमांबाबत विश्वासार्ह मार्गदर्शनाची मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले. वाचा सविस्तर
15 Dec 2025 03:40 PM (IST)
कर्जत : तालुक्यात माथेरान डोंगरात असलेल्या 13 आदिवासी वाड्या आता रस्त्याने जोडल्या जाणार आहेत. या आदिवासी वाड्या वन जमिनीवर वसलेल्या असल्याने त्या ठिकाणी रस्ता बनवता येत नव्हता. मात्र वन जमिनीचे प्रस्ताव मान्य झाल्याने आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून या रस्त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सध्या दिवसरात्र काम करून रस्त्याचे काम सुरु असून पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर पुलाची निर्मिती झाल्याने तो प्रश्न निकाली निघाला आहे. वाचा सविस्तर
15 Dec 2025 03:35 PM (IST)
ऑस्ट्रेलियात सिडनी येथे बोंडी बीच परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. भारत, अमेरिकासह अनेक राष्ट्रांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू आणि ४० जण जखमी झाले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नेतन्याहूंनी या हल्ल्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना जबाबदार धरले आहे. पॅलेस्टिनींना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिल्यानंतर यहू्ंदीविरोधी हिंसाचार वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
15 Dec 2025 03:30 PM (IST)
Motorola Edge 70 स्मार्टफोन अखेर आता भारतात लाँच करण्यात आला आहे. मिड रेंज स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना एक चांगला पर्याय मिळावा, ज्यामध्ये दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील, या उद्देशाने कंपनीने नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.
15 Dec 2025 03:25 PM (IST)
आदित्य धर यांच्या बहु-स्टारर धुरंधर चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपवादात्मक कामगिरी केली आहे, भारतात फक्त १० दिवसांत ३५० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे, तर जगभरात ५०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. दरम्यान धुरंधर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सारा अर्जुनची निवड का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिग्दर्शकाने सारा अर्जुनला खास का बनवले हे सांगितले आणि या भूमिकेसाठी १,३०० इतर मुलींनी ऑडिशन्स दिले होते असेही सांगितले. वाचा सविस्तर
15 Dec 2025 03:20 PM (IST)
संभाजीनगर शहरातील हसूल परिसरातील साईनगर (गट नंबर १४४) येथे सुरू असलेले ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडून पसार झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे काम बंद अवस्थेत असून, वारंवार तक्रारी करूनही संभाजीनगप महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने साईनगरवासियांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने नगरोत्थान योजनेअंतर्गत मध्य विधानसभा मतदारसंघात ड्रेनेज प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे कंत्राट गुजरात येथील अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. हसूल येथील साईनगर भागात गल्ली-गल्ल्यांमध्ये खोदकाम करून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने व बिल रखडल्यामुळे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून पलायन केले. वाचा सविस्तर
15 Dec 2025 03:12 PM (IST)
धुळे शहरातून एक धक्कादायक आणि संतापाची घटना समोर आली आहे. एका भीक मागून जगणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरातच निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपींनी घरातील किरकोळ वस्तूंची चोरी केल्याचेही उघड झाले आहे. ही घटना शहरातील मोहाडी उपनगर येथील वाल्मिक वसाहतीत घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
15 Dec 2025 02:55 PM (IST)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या भूस्खलनामुळे वाहतूक खोळंबण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील या अतिसंवेदनशील भागात दरड कोसळल्याने महामार्ग तासन्तास बंद पडत असल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक व मालवाहतुकीला मोठा फटका बसत होता. या पाश्र्वभूमीवर भूस्खलनाचा धोका कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार केंद्र शासनाने या कामाला प्राधान्य दिले असून, उत्तराखंड येथील केंद्र शासनाची नामांकित संस्था तेहरी हायड्रो इलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून कशेडी बोगद्याच्या परिसरात डोंगर उतारांवर रॉक बोल्टिंग तसेच तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
15 Dec 2025 02:50 PM (IST)
देशाच्या लष्करी इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे. 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून एका महिला ऑफिसर कॅडेटने प्रशिक्षण पूर्ण केले असून महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सई जाधव लेफ्टनंट बनल्या आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण देशात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
15 Dec 2025 02:45 PM (IST)
2025 हे वर्ष संपत असताना अमृता खानविलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले . एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.
15 Dec 2025 02:40 PM (IST)
मुंबई पालिका निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाला राम राम ठोकत माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
15 Dec 2025 02:35 PM (IST)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्धव ठाकरेंकडून मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला (Thackeray Group) राम राम ठोकला. आज त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई (Mumbai BJP) अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
15 Dec 2025 02:30 PM (IST)
ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे ‘नायक’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम सुरू आहे. टीबीएमची जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या दुहेरी बोगद्याचे काम में २०२८ पर्यंत दाखल करण्यात येणार आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे.
15 Dec 2025 02:25 PM (IST)
भगवान महादेव म्हणजे हिंदू धर्मातील आराध्य दैवत. पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं की, महादेव हे वैरागी होते. भगवान शंकर म्हणजे वैराग्य, तपस्या आणि सत्याचे प्रतीक. इतर देवांप्रमाणे महादेवांचा श्रृंगार नाही. असतो तो म्हणजे पांढऱ्या रंगाचा भस्म.
15 Dec 2025 02:15 PM (IST)
सासवड पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस हवालदाराचे तब्बल आठ महिन्यांच्या चौकशीनंतर निलंबन केले आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बेजाबदार गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून निलंबनाचे आदेश दिले आहेत. दरम्यान सासवड पोलिस ठाण्यातील आणखी किमान दोन ते तीन जण रडारवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय जावळे असे निलंबन झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
15 Dec 2025 02:10 PM (IST)
तुम्ही देखील जिओ यूजर आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी कंपनीने नवीन वर्षानिमित्त एक खास गिफ्ट आणलं आहे. खरं तर नवीन वर्ष सुरु होण्याच्या काही दिवस आधीच कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी या गिफ्टची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी तीन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. ‘Happy New Year 2026’ या नावाने हे प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत. यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने हे प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये डेली कनेक्टिविटीसह एंटरटेनमेंट आणि डिजिटल सर्विसेजचे कॉम्बिनेशन जोडण्यात आले आहे. या प्लॅन्सची किंमत किती आहे आणि त्यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
15 Dec 2025 02:05 PM (IST)
स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रापासून ते राजकारण, सोशल मीडियापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तुलसी विरानी यांची भूमिका मोठ्या प्रमाणावर गाजली. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे कोट्यवधी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मध्यंतरी त्यांचे वजन खूप जास्त वाढले होते. पण अथक प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे वजन कमी केले. वयाच्या ५० व्या वर्षी स्मृती इराणी अतिशय तरुण आणि फिट दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्मृती इराणी त्यांच्या फिटनेससाठी कोणता आहार आणि व्यायाम नियमित फॉलो केला, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा व्यायाम आणि आहार फॉलो करून तुम्ही वाढलेले वजन झपाट्याने कमी करू शकता
15 Dec 2025 01:55 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या अंडर-१९ आशिया कप 2025 चा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली. सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे त्यामुळे भारता आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामने असल्यावर खेळाडू हे हॅन्डशेक करत नाहीत. त्यामुळे सोशल मिडियावर यासंदर्भात वाद पाहायला मिळाला आहे.
15 Dec 2025 01:45 PM (IST)
ये रिश्ता क्या कहलाता है आणि साथ निभाना साथिया सारख्या हिट टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता अनुज सचदेवा एका भयानक घटनेत अडकला आहे. अनुज सचदेवावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता, त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ही घटना दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस अनुज आणि त्याच्या कुत्र्याला मारहाण करताना दिसत आहे. शिवाय, तो माणूस मोठ्याने शिवीगाळ करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
15 Dec 2025 01:35 PM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सिडनी येथे बोंडी बीचवर सामूहिक गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. यहूदी समुदायाच्या हनुक्का फेस्टिवल दरम्यान हा हल्ला झाला असून याला दहशतवादी हल्ला म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर हनुक्का फेस्टिव्हल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचे नेमकं कारण काय आहे? आणि हा हनुक्का फेस्टिव्हल नेमका काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
15 Dec 2025 01:30 PM (IST)
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी मनरेगाच्या नाव बदलण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, महात्मा गांधी हे देश, इतिहास आणि जगातील महान नेते आहेत, मग त्यांचे नाव का काढून टाकले जात आहे, हे समजत नाही. तसेच सभागृहात खऱ्या मुद्द्यांवर चर्चा होत नसून वेळ आणि देशाची संसाधने वाया जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षच अडथळे निर्माण करत असल्याची टीकाही प्रियांका गांधी यांनी केली.
15 Dec 2025 01:25 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित वार्षिक कार्यक्रम “परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha 2026) २०२६” साठी नोंदणी शिगेला पोहोचली आहे. या संवादात्मक सत्रात सहभागी होण्यासाठी २९ लाखांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नोंदणी केली आहे, जे या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता दर्शवते.
15 Dec 2025 01:15 PM (IST)
नवीन वर्षात भारत आणि इस्रायलचे संरक्षण संबंध (Defense Relations) एका नवीन उंचीवर पोहोचण्याच्या तयारीत आहेत. भारत आता केवळ इस्रायली शस्त्रास्त्रांचा (Israeli Weapons) ग्राहक म्हणून राहणार नाही, तर एक धोरणात्मक भागीदार (Strategic Partner) म्हणून विकसित होणार आहे. दोन्ही देश संयुक्तपणे भारतात नवीन युगातील आणि अत्यंत घातक शस्त्रे (Lethal Weapons) तयार करतील.
15 Dec 2025 01:07 PM (IST)
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात म्हणजेच शनिवारी आणि रविवारी दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी करत पुस्तक खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये युवक, युवतींचा सहभाग हा लक्षणीय होता. अनेक नागरिकांनी एकापेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन दिवसांच्या पुस्तक खरेदी- विक्रीतून काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.
15 Dec 2025 12:55 PM (IST)
बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर पोलिसांचा वाहतूक विभाग प्रंचड आक्रमक झाल्याचे कारवाईतून दिसत असून, सीसीटीव्ही माध्यमातून पोलिसांनी तब्बल साडे तेरा लाख वाहनांवर कारवाई केली आहे.
15 Dec 2025 12:45 PM (IST)
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील एकता नगरमध्ये दोन गटांतील हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी थेट हल्ला केला. पोलिसांना मारहाण, कॉलर पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.
15 Dec 2025 12:44 PM (IST)
Prithviraj Chavan : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय हालचालींना (Political News) वेग आला आहे. दिल्लीसह नागपूरमध्येही राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन पार पडले आहे. दरम्यान, कॉग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी राजकीय भविष्यवाणी केली. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. येत्या 19 डिसेंबर रोजी देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान (PM Narendra Modi) होईल या आशयाचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यामुळे नक्की कोणत्या नेत्याबाबत ते बोलत आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
15 Dec 2025 12:35 PM (IST)
पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये प्रेमातून सूड उफाळला. प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून तिच्या प्रियकराने नवऱ्याला कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. नवविवाहित दीपक जगतापचा मृत्यू झाला असून आरोपी फरार आहे.