Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: गोव्यानंतर भुवनेश्वरमधील एका नाईट क्लबमध्ये भीषण आग  

Marathi breaking live marathi - Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली सर्वात मोठी झेप, पार केला 2 लाख रुपयांचा टप्पा! सोन्याचे दर जाणून घ्या

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 06:51 PM
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates-  Gold Rate Today: भारतात 12 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,986 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,807 रुपये आहे. भारतात 12 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,860 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,760 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,070 रुपये आहे. भारतात 12 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 201.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,01,100 रुपये आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 12 Dec 2025 06:51 PM (IST)

    12 Dec 2025 06:51 PM (IST)

    IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर

    IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना काळ चंदीगडमध्ये खेळला गेला. या सामन्यात  दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला 51 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, हा त्यांचा धावांच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा T20I पराभव ठरला आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

  • 12 Dec 2025 06:41 PM (IST)

    12 Dec 2025 06:41 PM (IST)

    एकाच वर्गात शिकत होते ‘हे’ दोन सुपरस्टार, चेहऱ्यावर निरागसता, आता आहेत बॉलिवूडचे हँडसम हंक!

    सोशल मीडियाच्या युगात, काहीही व्हायरल होणे सोपे आहे. सर्व काही वणव्यासारखे पसरते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. शाळेतील या फोटोमध्ये एक नाही तर दोन सुपरस्टार आहेत. या फोटोमध्ये हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम आहेत. ते दोघेही एकाच वर्गात शिकत होते. ते लहानपणी गोंडस आणि निरागस होते, पण आता ते कूल, हँडसम आणि हृदयस्पर्शी बनले आहेत. केवळ मुलीच नाही तर मुलेही त्यांच्या लूकसाठी मरण्यास तयार असतात. त्यांच्या लूकची चर्चा केवळ भारतातच नाही तर जगभरात होते.  जे त्यांच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा चित्रपटसृष्टीतच संबंध नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही एक मनोरंजक संबंध आहे.

  • 12 Dec 2025 06:31 PM (IST)

    12 Dec 2025 06:31 PM (IST)

    पुण्यात कडाक्याची थंडी कायम; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

    महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट कायम असून पुणे शहरात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रासह पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरला.

  • 12 Dec 2025 06:21 PM (IST)

    12 Dec 2025 06:21 PM (IST)

    "MMRDA अन् ब्रुकफिल्ड च्या नेतृत्वात आशियातील सर्वात मोठे..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

    मुंबई: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

  • 12 Dec 2025 05:31 PM (IST)

    12 Dec 2025 05:31 PM (IST)

    MG Hector लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज

    MG Hector देखील मार्केटमध्ये लोकप्रिय आहे. आता लवकरच कंपनी या कारचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करणार आहे. ही कार लाँच होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही कार अधिकृतपणे 15 डिसेंबर रोजी लाँच करण्यात येईल.

  • 12 Dec 2025 05:16 PM (IST)

    12 Dec 2025 05:16 PM (IST)

    RSS प्रमुख अन् अमित शाहांच्या हस्ते अंदमानात Veer Savarkar यांच्या पुतळ्याचे अनावरण

    आज अंदमान निकोबार येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विंनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार केला.

  • 12 Dec 2025 04:50 PM (IST)

    12 Dec 2025 04:50 PM (IST)

    राजकारणातील चाणक्य Sharad Pawar यांच्या Car Collection वर एकदा नजर फिरवाच

    भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक दिग्गज नेत्यांचा उल्लेख केला जातो. यात आवर्जून Sharad Pawar यांचा देखील उल्लेख केला जातो. फक्त महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचे वाढदिवसाचे बॅनर झळकले आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा 

  • 12 Dec 2025 04:45 PM (IST)

    12 Dec 2025 04:45 PM (IST)

    हिमाचलची फेमस डिश ‘सिद्दू’ खाल्ली आहे का? हिवाळ्यात शरीराला देईल एनर्जी; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

    सिद्दू हा भारतातील हिमाचल प्रदेशातील एक पारंपारिक पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. यात मसालेदार स्टफिंग भरून झणझणीत चटणीसह याला खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारताच्या अनेक भागात ही डिश फार वेगाने लोकप्रिय होऊ लागली आहे. थंडीच्या दिवसांत ते ही वाफवलेली गरमा गरम डिश मनाला वेगळच सुख देऊन जाते. तुम्ही आजवर जर ही डिश जर कधी खाल्ली नसेल तर यावेळी तुम्ही घरीच बनवून या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चविष्ट असण्यासोबतच, ही डिश आरोग्यदायी देखील आहे कारण ती तेलाऐवजी वाफेवर शिजवली जाते. सिद्दू अनेक प्रकारे बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला मसूर सिद्दूची रेसिपी सांगणार आहोत. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

  • 12 Dec 2025 04:40 PM (IST)

    12 Dec 2025 04:40 PM (IST)

    प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर

    कानपूरच्या बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील जगदीशपूर गावात २१ वर्षीय मानसीच्या गूढ आणि दुःखद मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक विवाहित होती पण गेल्या सहा महिन्यांपासून ती तिच्या प्रियकर मनीष यादवसोबत त्याच्या घरी राहत होती. तिच्या मृत्यूनंतर, कुटुंबीयांनी आरोपी प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. मनीषने प्रथम मानसीवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि नंतर तिच्या गुप्तांगात कापडाचे तुकडे भरले. अपमान आणि वेदनेने कंटाळून मानसीने सल्फा सेवन केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतकाचे वडील धरमवीर यांनी मनीष यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके काम करत आहेत.

  • 12 Dec 2025 04:35 PM (IST)

    12 Dec 2025 04:35 PM (IST)

    ‘Core-5 युती’ सत्तासमीकरणात नवा कलाटणीबिंदू; Donald Trumpचा ‘मास्टर प्लॅन’, ‘या’ महाबली राष्ट्रांचा गठबंधन युरोपला रडू आणणार

    अमेरिकेचे अध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump )यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर वॉशिंग्टनमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. या चर्चेत अमेरिकन प्रकाशन ‘पॉलिटिको’ मधील १२ डिसेंबरच्या लेखानुसार, ट्रम्प हे सध्याच्या G7 (Group of Seven) सारख्या युरोप-केंद्रित (Europe-centric) गटांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. ट्रम्प G7 (जो केवळ जुने, श्रीमंत आणि लोकशाही देशांपुरता मर्यादित आहे) याला अपुरे मानतात. त्यामुळेच, व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या (NSS) अप्रकाशित भागातून ‘C5’ (Core Five) किंवा ‘कोर फाइव्ह’ या नवीन एलिट फोरमची कल्पना पुढे आली आहे. C5 गट हा अधिक व्यावहारिक आणि शक्ती-आधारित (Power-based) असेल.

  • 12 Dec 2025 04:30 PM (IST)

    12 Dec 2025 04:30 PM (IST)

    गिरीश महाजनांना मस्ती आलीये..; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी घेतला खरपूस समाचार

    प्रचंड विरोधानंतर देखील नाशिकमध्ये वृक्षतोड करण्यात आली, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, सयाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड करण्यास विरोध केला. यासाठी मोठ्या प्रमाणत जनआंदोलन उभारण्यात आले. मात्र तरी देखील प्रशासनाने नाशिकमधील 1200 हून अधिक झाडांची कत्तल केली. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांना मस्ती आलीये असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

  • 12 Dec 2025 04:25 PM (IST)

    12 Dec 2025 04:25 PM (IST)

    ‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक

    भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजकारण्यांपासून ते चाहत्यांपर्यंत, प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या आवडत्या ॲक्शन अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सुपरस्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मीडियावर फोटो देखील पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहेत. ज्याला चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

  • 12 Dec 2025 04:20 PM (IST)

    12 Dec 2025 04:20 PM (IST)

    आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?

    कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सध्या एका नव्या आणि आव्हानात्मक वळणावर आहे. या वळणात आदिशक्तीची रचना, तिच्या दैवी अवतारातील मानवी मर्यादा आणि भावना यांचा गुंता दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे मिळालेले आव्हान अधिकच रंजक झाले आहे.मालिकेच्या येत्या भागात दैवी शक्तींच्या मानवी अवतारातल्या नात्यांमधल्या भावना, त्यांच्यातला अविश्वास आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या रहस्यमय घटनांचं नाट्यमय मिश्रण पाहायला मिळणार आहे. शिवा–जगदंबाच्या नात्यात एका छोट्याशा भेटवस्तूच्या निमित्ताने निर्माण होणारं मोठं वादळ प्रेक्षकांना तणावाची जाणीव करून देणार आहे. या भेटवस्तूत दडलेला अर्थ आणि त्या भेटीमुळे निर्माण होणारी घटनांची मालिका ही संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहे. या भेटीमुळे जगदंबेचा जो मोठा गैरसमज होतो, तो शिवाचं सत्य दूर करेल का आणि हा दैवी प्रवास कसा घडेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

  • 12 Dec 2025 04:15 PM (IST)

    12 Dec 2025 04:15 PM (IST)

    संक्रांतीपूर्वी ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम! नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी ४ तालुक्यांत धडक कारवाई

    आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन (चायनीज) मांजाची अवैध विक्री रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Rural Police) मोठी मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चार तालुक्यांमध्ये धडक कारवाई करत ६ गुन्हे दाखल केले असून, ₹१६ हजार ७४० किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली १० डिसेंबर रोजी ही मोहीम राबवण्यात आली.

  • 12 Dec 2025 04:10 PM (IST)

    12 Dec 2025 04:10 PM (IST)

    15 हजार फुटांवरून आकाशात घेतली झेप पण तितक्यात घडला अनर्थ, पॅराशूट उघडताच विमानाला अडकला अन् मग जे घडलं…

    सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. काही मजेदार, काही हास्यास्पद तर काही थक्क करणारे व्हिडिओज इथे शेअर होतात. पण अलीकडेच इंटरनेटवर एका धक्कादायक आणि हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडून गुरुवारी पोस्ट करण्यात आला आहे. यात एका स्कायडायव्हरसोबत घडलेली थरारक घटना कैद करण्यात आल्याचे दिसून आले. आकाशात उडी मारण्यासाठी स्कायडायव्हरने जशी झेप घेऊ पाहिली तितक्यातच त्याचा त्याचा पॅराशूट ओपन झाला आणि विमानाच्या कोपऱ्याला जाऊन अडकला. यामुळे स्कायडायव्हरदेखील पॅराशूट अडकलेल्या जागी ओढला गेला आणि सुमारे 15 हजार फुटांवर आकाशात लटकला. घटनेचा हा संपूर्ण थरार तुम्हाला व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहता येईल.

  • 12 Dec 2025 04:05 PM (IST)

    12 Dec 2025 04:05 PM (IST)

    ‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

    रणवीर सिंगचा “धुरंधर” हा चित्रपट थिएटरमध्ये अभूतपूर्व कामगिरी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सतत सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचे सर्वजण प्रशंसा करताना दिसत आहेत. अभिनेत्याचा जबरदस्त अभिनय आणि व्हायरल झालेला FA9LA सीन प्रेक्षकांना रीलमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्ये, अक्षयची एक जुनी मुलाखत देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत तो त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना दिसला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.

  • 12 Dec 2025 04:00 PM (IST)

    12 Dec 2025 04:00 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान

    Legendary Kapil Dev gave advice : दक्षिण आफ्रिका सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे, या दौऱ्यावर सुर्वतीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यायांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकीली. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ आणि संघ व्यवस्थापणावर खूप टीका झाली होती. दरम्यान  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ०-२ अशा कसोटी मालिकेतील पराभवानंतर, भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली, त्यांनी म्हटले आहे की “लीगपेक्षा देशासाठी खेळणे आहे महत्त्वाचे आहे.”

    वाचा सविस्तर

  • 12 Dec 2025 03:50 PM (IST)

    12 Dec 2025 03:50 PM (IST)

    CM फडणवीस तातडीने मुंबईत दाखल

    मुंबई: सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत, महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये महत्वाचा करार पार पडला आहे. मायक्रोसॉफ्ट राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यताब आहे, या गुंतवणुकीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे.

    महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ग्लोबत कॅपॅबिलिटी सेंटर हा महत्वाचा प्रकल्प उभारण्याबाबत करार झाल्याचे समजते आहे. हा प्रकल्प जवळपास २० लाख स्केवर फुटांवर उभारले जाणार आहे. यामुळे जवळपास १५ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

     

     

  • 12 Dec 2025 03:40 PM (IST)

    12 Dec 2025 03:40 PM (IST)

    शुगर लेव्हल कमी करून हृदयरोगाचा धोकाही टाळते…

    जागतिक आरोग्य सेवा कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात ओझेम्पिक (इंजेक्शन म्हणून दिले जाणारे सेमाग्लुटाइड) दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. हे टाइप २ मधुमेह असलेल्या प्रौढांसाठी आहे ज्यांचा मधुमेह केवळ आहार आणि व्यायामाने नियंत्रित होत नाही. ओझेम्पिक आठवड्यातून एकदा दिले जाते. हे GLP-1 RA (ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट) औषधांच्या वर्गाशी संबंधित आहे. टाइप २ मधुमेहावरील उपचारांचे मुख्य आधार असलेल्या संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह सहायक उपचार म्हणून हे औषध घेतले पाहिजे.

    वाचा सविस्तर

  • 12 Dec 2025 03:20 PM (IST)

    12 Dec 2025 03:20 PM (IST)

    विनेश फोगटची मोठी घोषणा, निवृत्तीनंतर घेतला यु-टर्न

    विनेश फोगाट निवृत्ती यू-टर्न: भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने निवृत्तीनंतर यू-टर्न जाहीर केला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये विनेश फोगाटने खेळापासून दूर जाऊन राजकारणात प्रवेश केला. तथापि, ती पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. विनेश फोगाटने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांसोबत ही अपडेट शेअर केली आहे. तिचे लक्ष आता लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या २०२८ च्या ऑलिंपिक खेळांवर आहे.

    वाचा सविस्तर

  • 12 Dec 2025 03:10 PM (IST)

    12 Dec 2025 03:10 PM (IST)

    16 तासांच्या 'सीक्रेट ऑपरेशन'ने मायदेशी परतली नोबेल पारितोषिक विजेती

    Maria Corina Machado Nobel Peace Prize : व्हेनेझुएलाच्या (Venezuela) लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठीचा सर्वात प्रमुख आवाज असलेल्या मारिया कोरिना मचाडो (María Corina Machado) यांनी अनेक महिन्यांच्या लपूनछपून राहिल्यानंतर अखेर नॉर्वेमध्ये पाऊल ठेवले. हे पलायन कोणत्याही सामान्य प्रवासापेक्षा चित्रपटातील कथेसारखे (Like a movie story) होते, कारण हे अत्यंत धोकादायक ऑपरेशन अमेरिकेच्या विशेष दलाचे माजी कर्मचारी ब्रायन स्टर्न यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले होते. मचाडो यांनी देशातून पलायन करण्याचा निर्णय घेतला कारण राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या सरकारकडून त्यांना आणि इतर विरोधी नेत्यांना अटक होण्याचा धोका होता. जवळपास एक वर्ष त्या लपून बसल्या होत्या. हे धोकादायक निर्वासन (Evacuation) ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी, माचाडो कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी वाहनांमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि सुरक्षा चौक्या टाळण्यासाठी गर्दीचे मार्ग टाळण्यात आले.

    वाचा सविस्तर

  • 12 Dec 2025 03:05 PM (IST)

    12 Dec 2025 03:05 PM (IST)

    बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का!

    संत गाडगेबाबा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडलेल्या तालुका बाल क्रीडा स्पर्धेत बिडगाव जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर आपली मोहोर उमटवली आहे. गुणवत्तापूर्ण तयारी, शिस्तबद्ध खेळ आणि संघभावनेच्या बळावर बिडगावने क्रीडा क्षेत्रात आपला अपराजित दबदबा कायम ठेवल्याचे पुन्हा सिद्ध झाले. सन २०२५-२६ मधील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह अनेक प्रकारांमध्ये चुरशीचे सामने बघायला मिळाले. मात्र प्रत्येक विभागात बिडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अचूक हालचाली, रणनीतीपूर्ण खेळी आणि समन्वयपूर्ण सादरीकरणामुळे ते इतरांपेक्षा ठळकपणे उठून दिसले.

    वाचा सविस्तर

  • 12 Dec 2025 02:55 PM (IST)

    12 Dec 2025 02:55 PM (IST)

    बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का! चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर उटवली मोहोर

    संत गाडगेबाबा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडलेल्या तालुका बाल क्रीडा स्पर्धेत बिडगाव जिल्हा परिषद प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा अव्वल कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर आपली मोहोर उमटवली आहे. गुणवत्तापूर्ण तयारी, शिस्तबद्ध खेळ आणि संघभावनेच्या बळावर बिडगावने क्रीडा क्षेत्रात आपला अपराजित दबदबा कायम ठेवल्याचे पुन्हा सिद्ध झाले. सन २०२५-२६ मधील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह अनेक प्रकारांमध्ये चुरशीचे सामने बघायला मिळाले. मात्र प्रत्येक विभागात बिडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अचूक हालचाली, रणनीतीपूर्ण खेळी आणि समन्वयपूर्ण सादरीकरणामुळे ते इतरांपेक्षा ठळकपणे उठून दिसले.

  • 12 Dec 2025 02:50 PM (IST)

    12 Dec 2025 02:50 PM (IST)

    संसदेच्या आवाराला काही मर्यादा आहे का नाही?

    सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. वंदे मातरम, व्होट चोरी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर आता तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार सौगत रॉय हे जोरदार चर्चेत आले आहेत. त्यांचा संसदेच्या आवारात सिगारेट ओढताना व्हिडिओ व्हायरल (Viral News) झाला असून त्यांच्यावर कारवाई होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • 12 Dec 2025 02:45 PM (IST)

    12 Dec 2025 02:45 PM (IST)

    Border 2 चा टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी नवे पोस्टरही केले शेअर

    सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "बॉर्डर २" च्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, चित्रपटाच्या टीझरच्या प्रदर्शनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २०२६ च्या सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या "बॉर्डर २" चा टीझर १६ डिसेंबर रोजी विजय दिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.

  • 12 Dec 2025 02:40 PM (IST)

    12 Dec 2025 02:40 PM (IST)

    कपाळावर तीळ असणे शुभ की अशुभ? धनसंपत्तीशी काय आहे संबंध

    ज्योतिषशास्त्र हे विविध प्रकारचे असते, ज्यामध्ये हस्तशास्त्र, संख्याशास्त्र, सामुद्रिक शास्त्र असे अनेक प्रकार आहेत. ज्योतिषानुसार प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो आणि शरीरावर विविध ठिकाणी तीळ असण्याचा एक अर्थ असतो, याबाबत अधिक माहिती आपण आज घेऊया. सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ असणे एखाद्या व्यक्तीबद्दल सखोल अंतर्दृष्टी प्रकट करते. सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ शुभ किंवा अशुभ असू शकतो. या भागात, आपण उजव्या, डाव्या किंवा मधल्या कपाळावर तीळाचा अर्थ आणि अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यांचा तपशीलवार अभ्यास करणार आहोत. ज्योतिषाचार्य आनंद पाठक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घ्या.

  • 12 Dec 2025 02:30 PM (IST)

    12 Dec 2025 02:30 PM (IST)

    मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

    मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ती स्वप्नांची नगरी आहे. देशभरातून तरुण-तरुणी येथे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असताता. अभिनय जगात स्वतःचे नाव कमावण्याची आणि ग्लॅमर जगात स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा अनेक मुली आणि मुलांच्या मनात असते. पण येथील चित्र वेगळचं पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३७० हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २६८ मुली आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी अंदाजे ७२ टक्के आहेत. एकूण दरमहा सरासरी ६० मुले बेपत्ता होतात. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण होते.

  • 12 Dec 2025 02:25 PM (IST)

    12 Dec 2025 02:25 PM (IST)

    भारताची तलवार म्यान! स्पेनकडून पराभवानंतर भारतीय संघाला १० व्या स्थानावर मानावे लागले समाधान

    स्पेनकडून पराभव झाल्यानंतर ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकातील भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आला. ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारतीय महिला हॉकी संघाला स्पेनने पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेत एकूण १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनकडून भारतीय संघ २-१ असा पराभूत झाला. भारतीय संघाकडून कनिका सिवाचला (४१’) ने एकमेव गोल करता आला.तर स्पेनकडून नतालिया विलानोवा (१६’) आणि एस्थर कॅनालेस (३६’) यांनी गोल डागले.

  • 12 Dec 2025 02:20 PM (IST)

    12 Dec 2025 02:20 PM (IST)

    सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’!

    घरातील एक तोळे सोने चोरीस गेल्याच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या एका महिलेवर अघोरी आणि अमानुष तंत्रविद्येचा प्रयोग केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील सुराणानगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लिंबू कापून तंत्रमंत्राचा प्रयोग करणाऱ्या सासू आणि सुनेविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Dec 2025 02:14 PM (IST)

    12 Dec 2025 02:14 PM (IST)

    ‘पॅकेज’च्या जादुई शब्दाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल नको; आमदार रोहित पाटलांचा इशारा

    राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन आणि हक्क्क्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून नागपूरमधून शेतकऱ्यांसाठी खूशखबर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. यावरुन आमदार रोहित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. माध्यमांशी संवाद साधून त्यांनी इशारा दिला आहे.

  • 12 Dec 2025 02:01 PM (IST)

    12 Dec 2025 02:01 PM (IST)

    'Four More Shots Please' च्या चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांचे होणार डबल Entertainment

    ओटीटीची लोकप्रिय महिला-केंद्रित मालिका "फोर मोअर शॉट्स प्लीज" पुन्हा एकदा प्रेक्षकांचे स्वागत करण्यास सज्ज झाली आहे. चौथ्या आणि शेवटच्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हे स्पष्ट आहे की यावेळी कथा केवळ ग्लॅमरस नाईटलाइफ, नातेसंबंध आणि हृदयविकारापुरती मर्यादित नाही तर ती वैयक्तिक संघर्षांमध्ये गुंतलेली आहे. यावेळी ट्रेलरमध्ये काहीतरी खास दाखवले जाणार आहे.

  • 12 Dec 2025 01:55 PM (IST)

    12 Dec 2025 01:55 PM (IST)

    दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं

    बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका मध्यमवयीन व्यक्तीच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. मांझी नगर पंचायतीतील दक्षिण टोला येथील रहिवासी ५५ वर्षीय सूरज प्रसाद यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. त्यांचा मृतदेह मांझी दक्षिण टोला येथील त्यांच्या खोलीत बेडखाली रक्ताने माखलेला आढळला. गुन्हेगारांनी त्यांचे दोन्ही डोळे बाहेर काढले आणि त्यांचे गुप्तांग चिरडले होते.

  • 12 Dec 2025 01:44 PM (IST)

    12 Dec 2025 01:44 PM (IST)

    मुहम्मद युनूस यांच्यावर थेट अपमानजनक आरोप

    बांगलादेशमध्ये (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच, देशाचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी थेट अंतरिम सरकारचे प्रमुख (Interim Government Head) मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय बंड केले आहे. या अप्रत्याशित हल्ल्यामुळे बांगलादेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पहिल्यांदाच मीडियाला मुलाखत दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, युनूस लोकशाही तत्त्वांचे पालन करत नाहीत आणि ते राष्ट्रपतींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. शहाबुद्दीन यांच्या मते, युनूस यांच्या अपमानामुळे ते इतके दुःखी झाले आहेत की, आपला २०२८ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण न करता ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत.

  • 12 Dec 2025 01:40 PM (IST)

    12 Dec 2025 01:40 PM (IST)

    हाडांच्या सांगाड्यात कॅल्शियम खच्चून भरतील 5 पदार्थ

    आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांचा असा विश्वास आहे की हिवाळ्यात योग्य अन्न खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि सांधे लवचिक राहतात. डॉक्टरांनी स्पष्ट केले की हिवाळ्यात स्नायू कडक होतात आणि सांध्याची हालचाल कमी होते, म्हणून पौष्टिक अन्न खाणे अत्यंत महत्वाचे आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले की कॅल्शियम आणि विटामिन डी हाडांसाठी आवश्यक आहेत. योगायोगाने, हिवाळ्यात काही पदार्थ आढळतात ज्यात हे दोन्ही पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. जर तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात हे पदार्थ खाल्ले तर तुमची हाडे मजबूत होतील, शरीराची सूज कमी होईल आणि थंड हवामानातील वेदना टाळता येतील.

    • हाडांसाठी तीळ वरदान
    • पालक आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या
    • बिया आणि नट्स
    • दुग्धजन्य पदार्थ
    • आंबट आवळा हाडे मजबूत करते
  • 12 Dec 2025 01:30 PM (IST)

    12 Dec 2025 01:30 PM (IST)

    डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या

    डिजि यात्राने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, डिजी यात्राने तब्बल 19 दशलक्ष यूजर्सचा आकडा पार केला आहे. याशिवाय नवीन घोषणा देखील करण्यात आली आहे. आता डिजीयात्रा ६ प्रादेशिक भाषांमध्‍ये उपलब्ध असणार आहे. भारतातील सेल्‍फ सॉव्‍हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित डिजि यात्रा यूजर्ससाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. डिजि यात्रा हे भारतातील सेल्‍फ सॉव्‍हरेन आयडेण्टिटी (एसएसआय)-आधारित आणी प्रायव्‍हसी-बाय-डिझाइन प्लॅटफॉर्म आहे. डिजि यात्राने जलद, कॉन्‍टॅक्‍टलेस आणि अधिक सर्वसमावेशक प्रवासी अनुभवाच्‍या माध्‍यमातून विमान प्रवासाला अधिक उत्‍साहपूर्ण बनवले आहे.

  • 12 Dec 2025 01:20 PM (IST)

    12 Dec 2025 01:20 PM (IST)

    राहुल गांधीवर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप?

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरितेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंगळुरूचे एस. विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांच्यावर ब्रिटीश आणि भारतीय असे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप शिशिर यांच्याकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार असून आज याचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 12 Dec 2025 01:11 PM (IST)

    12 Dec 2025 01:11 PM (IST)

    टीम इंडियामधून वगळल्यानंतर अष्टपैलू खेळाडूने केला पुनरागमनाचा दावा

    टीम इंडियामधून वगळल्यानंतर नितीश कुमार रेड्डी उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतला आहे. हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर त्याला व्हाईट बॉल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो लक्षणीय प्रभाव पाडू शकला नाही आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. पंड्याच्या पुनरागमनानंतर, नितीशला भारताच्या टी-२० संघातूनही वगळण्यात आले. तथापि, त्याने आता शानदार हॅटट्रिक घेत पुनरागमनाचा दावा केला आहे. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध त्याच्या गोलंदाजी कौशल्याचे प्रदर्शन केले.

  • 12 Dec 2025 01:05 PM (IST)

    12 Dec 2025 01:05 PM (IST)

    पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानात

    पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानत उतरली आहे. महाविकास आघाडीसोबत जायचे की नाही याचा निर्णयाची वाट न पाहता मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून आजपासून फॉर्म वाटप केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ४ ते ७ या वेळात उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार आहे.

  • 12 Dec 2025 12:55 PM (IST)

    12 Dec 2025 12:55 PM (IST)

    भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा आत्महत्याचा प्रयत्न

    गुंतवणूकदारांची भिशी वेळेत न देता आल्याने भाजप जिल्हा उपाध्यक्षाच राजू मोरे आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने विष घेतले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिशी फुटण्याच्या दिवशीच आत्महत्याचा प्रयत्न केल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.गेल्या अनेक दिवसांपासून टोलवाटोलवी करत असल्याने गुंतवणूकदारांनी आपला गोंधळ घातला होते.

  • 12 Dec 2025 12:45 PM (IST)

    12 Dec 2025 12:45 PM (IST)

    अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द करण्याते आले आहे, सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात समन्स काढण्यात आले होते. बारामती सत्र न्यायालयाने हे समन्स रद्द केले आहे.

  • 12 Dec 2025 12:35 PM (IST)

    12 Dec 2025 12:35 PM (IST)

    नगराध्यक्षपदासाठी पाच ते सात कोटी वाटल्याची कबुली

    नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवारने सात ते आठ कोटी वाटल्याची जाहीर कबुली दिली आहे. त्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातील हा प्रकार आहे.

  • 12 Dec 2025 12:25 PM (IST)

    12 Dec 2025 12:25 PM (IST)

    मुंबई पोलिसांना सदनिका सेवानिवासस्थान मिळणार

    मुंबई पोलीस दलातील शिपाई आणि उपनिरीक्षकांना आता किमान ५३८ चौरस फुटांची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून मिळणार आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे.याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

  • 12 Dec 2025 12:15 PM (IST)

    12 Dec 2025 12:15 PM (IST)

    शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मुंबईतील वाय.बी.सेंटरमध्ये गर्दी केली आहे.

  • 12 Dec 2025 12:05 PM (IST)

    12 Dec 2025 12:05 PM (IST)

    आंध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात

    आंध्र प्रदेशातील मरेदुमिल्ली येथे एक बस दरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एएसआर जिल्ह्यातील चिंतुरू आणि भद्राचलम दरम्यान घाट रस्त्यावर एक बस उलटली. नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती एएसआरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी दिली आहे.

  • 12 Dec 2025 12:00 PM (IST)

    12 Dec 2025 12:00 PM (IST)

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मोठे आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दोनदा मोर्चा धडकला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत यासाठी राज्य सरकारने राज्यात कुणबी नोंदणींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तर हैदराबाद गॅझेटिअरसह सातारा आणि इतर गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला

  • 12 Dec 2025 11:50 AM (IST)

    12 Dec 2025 11:50 AM (IST)

    उत्तर प्रदेशात पुढील सहा महिन्यांसाठी संपावर बंदी

    उत्तर प्रदेशात पुढील सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही विभागातील कर्मचारी सहा महिने संपावर जाऊ शकत नाहीत. सरकारने हा निर्णय उत्तर प्रदेश अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्याअंतर्गत (ESMA) घेण्यात आला.

  • 12 Dec 2025 11:40 AM (IST)

    12 Dec 2025 11:40 AM (IST)

    जपानला पुन्हा 6.7 तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का

    जपानममध्ये पुन्हा एकदा भूंकपाच्या धक्क्यांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. हाचिनोहे या परिसरामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. 6 .7 तीव्रतेचा हा धक्का असून यामुळे त्सुनामीचा धक्का बसला आहे.

  • 12 Dec 2025 11:30 AM (IST)

    12 Dec 2025 11:30 AM (IST)

    श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी...; सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

    जेष्ठ नेते शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार सुळे यांनी लिहिले आहे की,
    श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!! असे सुप्रिया सुळेंनी लिहिले आहे. 
  • 12 Dec 2025 11:23 AM (IST)

    12 Dec 2025 11:23 AM (IST)

     गोव्यानंतर भुवनेश्वरमधील एका नाईट क्लबमध्ये भीषण आग  

     

     

    भुवनेश्वरच्या सत्य विहार परिसरातील एका नाईटक्लबमध्ये शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) भीषण आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसून, तीव्र ज्वाळांनी केवळ नाईटक्लबचेच नव्हे तर शेजारील फर्निचर दुकानालाही वेढले.

    लाकूड आणि स्पंजसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे दुकानात आग झपाट्याने पसरली आणि मोठे नुकसान झाले. आगीदरम्यान वाऱ्याची दिशा बदलल्याने संपूर्ण बाजारपेठेत धूर पसरला, ज्यामुळे काही काळ दृश्यमानता कमी झाली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

  • 12 Dec 2025 11:20 AM (IST)

    12 Dec 2025 11:20 AM (IST)

    शिवराज पाटील चाकुरकर यांचे निधन

    राजकारणात समाजवादी, उजवे, डावे, शेतकरी-कामगार वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक पक्ष आणि नेते होते. पण सुसंस्कृतपणा आणि शालीनता हे या राजकारण्यांचा मुख्य स्वभाग गुण होता. शिवराज पाटील चाकुरकर हे या पिढीतील नेते होते. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते, कार्यकर्त्यांना अनेक गोष्टींची यानिमित्ताने आठवण होत आहे. त्यांच्या राजबिंड व्यक्तिमत्वाला या शालिनतेचा साज होता.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports business entertainment weather report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात; ‘GOAT इंडिया टूर 2025’ला कोलकात्यात भव्य सुरुवात
1

Top Marathi News Today: 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात; ‘GOAT इंडिया टूर 2025’ला कोलकात्यात भव्य सुरुवात

Top Marathi News Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक?
2

Top Marathi News Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक?

Top Marathi News Today: राज्य विधीमंडळाचे आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू
3

Top Marathi News Today: राज्य विधीमंडळाचे आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.