
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या
Vijay Diwas 16 December 1971 : आज १६ डिसेंबर! हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. याच दिवशी, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात (India-Pakistan War) आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी (Indian Armed Forces) एक अविश्वसनीय आणि निर्णायक विजय (Decisive Victory) मिळवला होता. या विजयाचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या शूर सैनिकांच्या (Brave Soldiers) बलिदानाला वंदन करण्यासाठी संपूर्ण देशात ‘विजय दिवस’ (Vijay Diwas) साजरा केला जातो.
16 Dec 2025 05:50 PM (IST)
महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरात आचारसंहिता लागू झाली अन् चौकाचौकात असलेले बॅनर, पोस्टर्स काढण्यास सुरुवात झाली तर आचारसंहितेचा अंदाज आल्याने स्थानिक नेत्यांनी अनेक फलक कापडाने झाकून जप्तीची कारवाई टाळली. दरम्यान महापालिकेची अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असून यात १६५ मतदारांची भर पडली असून अंतिम मतदार यादीत एकूण ११ लाख १८ हजार २८३ मतदार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडले जाणार असून १६ जानेवारी रोजी शहरात तीन ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.
16 Dec 2025 05:45 PM (IST)
बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट “बॉर्डर २” च्या प्रदर्शनाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाचा २.०४ मिनिटांचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना थक्क करणारा आहे. सनी देओलचे संवाद थक्क करणारे आहेत. दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी आणि सोनम बाजवा यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर, चित्रपटाच्या टीझरवर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूया
16 Dec 2025 05:40 PM (IST)
मेक्सिकोमध्ये (Mexico) मोठा गोंधळ उडाला आहे. मेक्सिकोच्या संसदेत महिला खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी ही तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला खासदारांनी एकमेकांना मारण्यास, केस उपटण्यास, धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे देशभरात गोंधळ उडाला आहे.
16 Dec 2025 05:38 PM (IST)
IPL 2026 Mini Auction : मथिशा पाथिरानाच्या लिलावात तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. दिल्ली, लखनौ आणि कोलकाता यांनी त्याच्यासाठी बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने त्यांची बोली १६ कोटी रुपयांपर्यंत वाढवली, परंतु नंतर माघार घेतली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांची आक्रमक बोली सुरूच ठेवली. लखनऊ सुपर जायंट्सनेही १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर माघार घेतली. शेवटी, कोलकाता नाईट रायडर्सने मथिशा पाथिरानाला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले.
16 Dec 2025 05:35 PM (IST)
रणवीर सिंगचा “धुरंधर” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, या चित्रपटाचे अनेक सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे. अक्षय कुमार, विकी कौशल, हृतिक रोशनपासून ते अल्लू अर्जुन आणि समांथा रूथ प्रभूपर्यंतच्या कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता, बॉलीवूडची “स्त्री”, श्रद्धा कपूर देखील या यादीत सामील झाली आहे. चित्रपटाचे कौतुक करताना, श्रद्धाने त्याच्या सिक्वेलसाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. तिने आदित्य धर यांना हा सिक्वेल लवकरच प्रदर्शित करण्याची विनंतीही केली आहे.
16 Dec 2025 05:31 PM (IST)
मथिशा पाथिरानाच्या लिलावात तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. दिल्ली, लखनौ आणि कोलकाता यांनी त्याच्यासाठी बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने त्यांची बोली १६ कोटी रुपयांपर्यंत वाढवली, परंतु नंतर माघार घेतली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्यांची आक्रमक बोली सुरूच ठेवली. लखनऊ सुपर जायंट्सनेही १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर माघार घेतली. शेवटी, कोलकाता नाईट रायडर्सने मथिशा पाथिरानाला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले.
16 Dec 2025 05:30 PM (IST)
लातूर जिल्ह्यात एक चक्रावून सोडणारी घटना घडली आहे. ती म्हणजे एकाने चक्क १ कोटी रुपयाच कर्ज घेतल होत. त्याला ५७ लाख रुपयांची गरज होती. ते कर्ज वाचल जाव यासाठी त्याने स्वतःच्याच मृत्युचा बनाव रचला. एका वृद्ध माणसाला गाडीत बसवलं आणि गाडी पेटवून दिली. मात्र गाडी पेटवून देत असताना आपलाच मृतदेह आहे हे ओळख पटावी यासाठी त्याने हातातील कडे त्याच्या हातात घातल. मृतदेह हा त्याचाच आहे अस कुटुंबियांनी सांगितल मात्र जे बाहेर सत्य आल ते मात्र चक्रावून सोडणार होत. गणेश चव्हाण अस त्या बनाव रचणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. त्याने स्वतः ची दोन सीम बंद केली. सीम बंद करून गाडी जाळल्या अवस्थेत पाहायला मिळाली. मात्र त्याचा हा बनाव जास्त काळ टिकू शकल नाही.
16 Dec 2025 05:25 PM (IST)
भारतीय बाजारपेठेत मोठ्या वाहनांना म्हणजेच ७-सीटर SUV आणि MPV ला आता भारतात लक्षणीय मान्यता मिळत आहे. परिणामी, दर महिन्याला, जेव्हा ७-सीटर कार विक्रीचा अहवाल येतो, तेव्हा लोक कोणती कार पहिल्या क्रमांकावर आहे आणि कोणत्या कार टॉप १० मध्ये आहेत हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. गेल्या नोव्हेंबरमधील आकडेवारी पाहता, मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट MPV, एर्टिगा अव्वल स्थानावर होती. ७-सीटर कार सेगमेंटमध्ये एर्टिगाने सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
16 Dec 2025 05:20 PM (IST)
छोटं असो किंवा मोठं आपलं घर शेवटी आपलं असतं. तुम्ही कुठेही राहा पण स्वत: घर हे महत्वाचं आहे. 2025 संपून नव वर्ष काही दिवसातच नवं वर्ष सुरु होत आहे. या नववर्षातच अनेकांना वास्तूशांत गृहप्रवेश करायचा असतो. तुम्ही गृहप्रवेशासाठी मुहुर्त शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. नवीन वर्षात कोणते शुभ मुर्हुत आहेत ते जाणून घेऊयात.
16 Dec 2025 05:15 PM (IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामापूर्वी चाहते ज्या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते तो आता सुरू झाला आहे. आयपीएल २०२६ साठीचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी, यूएई येथे होत आहे. या मिनी लिलावात २२७ भारतीय आणि ११३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १० संघांमध्ये फक्त तेवढेच स्लॉट उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त ७७ खेळाडू भाग्यवान असतील. या लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडे सर्वात मोठी रक्कम आहे. तीन वेळा विजेत्या संघाकडे ६४.३० कोटी रुपये आहेत.
16 Dec 2025 05:10 PM (IST)
हिवाळ्याचा ऋतू आला की शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषण देणाऱ्या पदार्थांची गरज वाढते. अशाच पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थांपैकी एक म्हणजे मुग डाळ चिक्की. ही चिक्की केवळ चवीला अप्रतिम नसून आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे. महाराष्ट्रात तसेच भारताच्या विविध भागांत चिक्की हा लोकप्रिय पदार्थ आहे. शेंगदाणे, तिळ यांपासून चिक्की आपण नेहमी खातो, पण मुग डाळीपासून बनवलेली चिक्की थोडी वेगळी आणि खास लागते.
16 Dec 2025 05:05 PM (IST)
रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाची क्रेझ सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. प्रत्येकजण या चित्रपटावर मोहित झाला आहे. विशेषतः अक्षय खन्नाच्या अभिनयाने सर्वांनाच चकित केले आहे. भाजप नेत्या आणि “क्यूंकी सास भी कभी बहू थी” चित्रपटाच्या अभिनेत्री स्मृती इराणी यांनी गेल्या आठवड्यात चित्रपटाचा आढावा घेतला आणि दिग्दर्शक आणि इतर कलाकारांचे कौतुक केले. आता, त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाबद्दल पोस्ट केली आहे, ज्यामध्ये अक्षय खन्नासाठी ऑस्करची मागणी केली आहे.
16 Dec 2025 04:50 PM (IST)
महाराष्ट्र–गुजरात सीमावादात मनसेने थेट उडी घेतली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील वेवजी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील असल्याची सर्व अधिकृत कागदपत्रे सादर करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. महाराष्ट्राचा नकाशा हळूहळू बदलण्याचा आणि गाव गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, ग्रामपंचायत महाराष्ट्राची असताना परवानग्या मात्र गुजरातकडून दिल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष पसरल्याचे त्यांनी सांगितले.
16 Dec 2025 04:35 PM (IST)
सागर किनारी प्रांत म्हणून राज्यांची निर्मिती होत असतानाच अनेकांनी स्वतंत्र कोकण राज्य असावे अशी मागणी केली होती.कालांतराने आपल्या प्रांताचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे आली.आमचे अभियान महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी नाही तर स्वतंत्रपणे स्वाभिमानी वंचित कोकणी माणसासाठी नवी दिशा देणारी चळवळ आहे.कोकणी ही संकल्पना नव्या पिढीने स्वीकारली असून सोशल माध्यमाचे यश आहे.स्वतंत्र आणि व्यापक विचार हाच स्वतंत्र कोकण अभियानाचा ध्यास आहे असे विचार संस्थापक संजय कोकरे यांनी मांडले.
16 Dec 2025 04:30 PM (IST)
वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने आणलेल्या अभय योजनेला आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी सध्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 200जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यापैकी 82 जणांनी थकित कराची लाखो रुपयांची मूळ रक्कम भरून दंडमाफीसाठी पात्रता मिळवली आहे. आता त्यांच्या दंडमाफीसाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत.
16 Dec 2025 04:25 PM (IST)
कणकवली शहरांमध्ये खाजगी रुग्णालयाची तोडफोड प्रकरणानंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी आज 24 तास खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पार्श्वभूमीवर काही खाजगी रुग्णालयात रुग्ण तपासणी बंद ठेवली असल्याने कणकवली तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमधील रुग्ण हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. रुग्णांनी देखील सरकारी रुग्णालयामध्ये चांगली रुग्णसेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
16 Dec 2025 04:23 PM (IST)
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू अकील हुसेनला चेन्नई सुपर किंग्जने 2 कोटी मध्ये खरेदी केले. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीकडून खेळला आहे. तो एका हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे.
16 Dec 2025 04:20 PM (IST)
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अरुण गीध याने उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश केला आहे. अरुण गीध यांच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेशावरुन भाजपमध्ये प्रचंड नाराजी असून केडीएमसी निवडणूकीत भाजपने अरुण गीध आणित्यांची बहिण वंदना गीध यांना उमेदवारी देण्याचे ठरविले होते.एकीकडे युतीची बोलणी करायची आणि दुसरीकडेभाजपच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हे योग्य नाही हे चुकीचे आहे. यावरुन भाजप माजी आमदार नरेंद्र पवार संतापले आणि उपमुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे स्वत: असे करीत आहेत.
16 Dec 2025 04:15 PM (IST)
दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने या हत्याकांडातील मुख्य आरोपी, कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला अटक केली आहे. वसई–विरार–मिरा–भाईंदर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने उत्तर प्रदेशातील फतेहगड मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेतले असून, हत्या प्रकरणात न्यायालयात सादर केले आहे.
16 Dec 2025 04:15 PM (IST)
रवी बिश्नोईला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये बोली लढाई पाहायला मिळाली.अखेर त्याला राजस्थान रॉयल्सने 7.20 कोटींना विकत घेतले. तो यापूर्वी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे.
16 Dec 2025 04:12 PM (IST)
जेपी दत्ता यांचा “बॉर्डर २” या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिट झाला आहे. चित्रपटातील सनी देओलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. त्याचा प्रभावी अभिनय पाहून लोकांनी आता त्याला “देशभक्तीचा राजा” म्हणून गौरवले आहे.
16 Dec 2025 04:07 PM (IST)
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्टजेला लखनौ सुपर जायंट्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
16 Dec 2025 04:04 PM (IST)
IPL 2026 Auction Live: KKR ने माशिथा पाथिरानाला 18 कोटींना खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
16 Dec 2025 04:00 PM (IST)
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन केले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी, ‘एकाच घरातील पाच-पाच विद्यार्थी पीएचडी करत असून त्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत’ असे विधान केल्याने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या फोटोला बुटाने मारहाण करत आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थी स्वप्निल नरभाग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एका घरात पाच आमदार-खासदार असू शकतात, तर पाच विद्यार्थी शिक्षण व संशोधन का करू शकत नाहीत? पीएचडीसाठी अनेक परीक्षा, पात्रता आणि कठोर प्रक्रिया पार करावी लागते, हे सरकारने समजून घ्यावे.
16 Dec 2025 04:00 PM (IST)
नृत्यकला, संगीतकला याप्रमाणेच चित्रकलेला देखील तितकंच महत्व दिलं जातं. याचपार्श्वभूमाीवर आधारित कलारसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. ते म्हणजे रोटरी क्लब ऑफ बंगळुरू प्लॅटिनम सिटी 15 कलाकारांच्या कलाकृती असलेले एक उत्साही आणि विचारपूर्वक तयार केलेले चित्रकला प्रदर्शन आयोजित करत आहे ज्यामध्ये जाहिरात उद्योगातील एक अनुभवी सर्जनशील व्यावसायिक आणि सध्या त्यांच्या एजन्सीमध्ये डायरेक्टर-क्रिएटिव्ह एक्सलन्स म्हणून काम करणारे पी. के. अनिल कुमार यांचा समावेश आहे.त्यांचे दोन दिवसीय प्रदर्शन20 आणि 21 डिसेंबर रोजी प्रतिष्ठित कर्नाटक चित्रकला परिषद येथे आयोजित केले जात आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 ही या भव्य प्रदर्शनाची वेळ आहे.
16 Dec 2025 03:54 PM (IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामापूर्वी चाहते ज्या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत होते तो आता सुरू झाला आहे. आयपीएल २०२६ साठीचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी, यूएई येथे होत आहे. या मिनी लिलावात २२७ भारतीय आणि ११३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १० संघांमध्ये फक्त तेवढेच स्लॉट उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त ७७ खेळाडू भाग्यवान असतील. या लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडे सर्वात मोठी रक्कम आहे. तीन वेळा विजेत्या संघाकडे ६४.३० कोटी रुपये आहेत.
16 Dec 2025 03:50 PM (IST)
दिल्लीतील प्रदूषण एक गंभीर समस्या असून हिवाळ्यात ही समस्या दुपटीने वाढल्याचे दिसून येते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता (AQI) ‘धोकादायक’ पातळीवर आहे. इथे राहणाऱ्या बहुतेकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. दिल्ली हे भारतातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते आणि अशातच आता इथल्या प्रदूषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्ये पाहून यूजर्स हादरून गेले. तापमानात घट आणि हवेची गुणवत्ता खालावताना, धुक्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोक त्रासदायक स्थितीत आहेत. इंटरनेटनर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला आपल्या बाल्कनीबाहेरचे दृश्य दाखवताना दिसून येते, ज्यात फक्त धुराचे वादळ दिसून येते. प्रदूषण इतके जास्त असते की, यामुळे समोरचे दृश्यही स्पष्ट दिसत नाही.
16 Dec 2025 03:42 PM (IST)
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या युगात केवळ एकाच विषयात मर्यादित ज्ञान असून चालत नाही. नोकरीच्या बाजारात आता पाठांतरापेक्षा विचार करण्याची पद्धत, समस्या सोडविण्याची क्षमता, संवादकौशल्य आणि सतत बदलांना सामोरे जाण्याची अनुकूलता अधिक महत्त्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लिबरल आर्ट्स शिक्षणपद्धतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. ‘काय शिकायचे?’ यापेक्षा ‘कसे विचार करायचे?’ यावर भर देणारी ही शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि बहुविध दृष्टिकोन विकसित करते. त्यामुळे भारतातील बदलत्या शिक्षणप्रवाहात लिबरल आर्ट्स हा एक महत्त्वाचा आणि आधुनिक पर्याय म्हणून पुढे येत आहे.
16 Dec 2025 02:54 PM (IST)
हॉलिवूड मधून धक्कादायक बातमी समोर आली होती. अमेरिकन चित्रपट निर्माते रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल सिंगर रेनर हे त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांचा मुलगा निक रेनर हा त्यांच्या कथित हत्येतील संशयितांपैकी एक मानला जात होता. आता त्याला अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
16 Dec 2025 02:44 PM (IST)
महाड नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेच्या काळात घडलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी राडाप्रकरणी महाड पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप शिरगावचे सरपंच व शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकास गोगावले व अन्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.
16 Dec 2025 02:34 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मोलकरणीची हत्या तिच्या मालकानेच केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिची हत्या करून सुटकेसमध्ये भरून शेतात फेकून दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांना एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची हत्या अनेक दिवसांपूर्वी करण्यात आल्याची समोर आले आहे. कारण बॅगमध्ये मृतदेहाचा सांगाडा सापडला. त्यामुळे पोलिसांना या पीडितेची ओळख पटवणं खूप कठीण झालं होत. मात्र पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे.
16 Dec 2025 02:24 PM (IST)
रणवीर सिंग सध्या त्याच्या "धुरंधर" चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी चर्चेत होता, पण एका वादामुळे त्याने दाक्षिणात्य स्टार ऋषभ शेट्टीच्या "कांतारा चॅप्टर १" चित्रपटातील एका दृश्यात देवी चामुंडाची नक्कल करून लोकांच्या भावना दुखावल्या. परंतु, नंतर त्याने माफी देखील मागितली. आता, ऋषभने यावर स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता या वादावर नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
16 Dec 2025 02:20 PM (IST)
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या नवीन पर्व यंदा 26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या कार्यक्रमाचं नव्या संकल्पनेसह आणि काही जुन्या-नव्या कलाकारांच्या सहभागामुळे या पर्वाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अवघ्या ५ महिन्यांच्या आतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
16 Dec 2025 02:10 PM (IST)
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एक नवीन रोजगार योजना आणणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे मनरेगा रद्द केला जाईल आणि त्याऐवजी एक नवीन योजना आणली जाईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्यासाठी आणि एक नवीन कायदा करण्यासाठी सरकार लोकसभेत एक विधेयक सादर करणार आहे. ही नवीन योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानली जात आहे, जरी विरोधक या योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याच्या प्रयत्नावर टीका करत आहेत.
16 Dec 2025 02:05 PM (IST)
फिल्मफेअरसोबत रेणुका शहाणे यांचा प्रवास जवळपास तीन दशकांनंतर अतिशय सुंदररीत्या पूर्ण वर्तुळात आला आहे. १९९५ मध्ये मराठी चित्रपट अबोलीसाठी अभिनेत्रीला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, आणि त्या काळात मराठी सिनेमा अजून आपली ओळख निर्माण करत होता आणि त्या सुरुवातीच्या सन्मानाने त्यांच्या कलात्मक प्रवासाची आशादायक सुरुवात झाली. आज, २९ वर्षांनंतर, शहाणे यांना 'धावपट्टी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि 'दुपहिया' या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपट आणि कथाकथन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण प्रभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
16 Dec 2025 01:55 PM (IST)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. मागील, म्हणजेच २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले होते. तेव्हापासून, शेतकरी पुढील हप्त्याची तारीख जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
16 Dec 2025 01:45 PM (IST)
ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने पाहत, अखेर त्याची प्रतीक्षा संपली अजून महाराष्ट्राचा लाडका भाऊ आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठीद्वारे बिग बॉस मराठी सिझन ६ चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं असून, अवघ्या १२ तासांत २.४ Million हून अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे.
16 Dec 2025 01:35 PM (IST)
पाकिस्तानवर कर्जाचे डोंगर निर्माण झाले आहे. शाहबाज सरकारच्या २० महिन्यांत तब्बल ७६,९७९ अब्ज रुपये कर्ज घेतले आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे देशाची नाजूक आर्थिक परिस्थिती स्पष्टपणे उघड झाली. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पाकिस्तानचे एकूण कर्ज १२,१६९ अब्ज रुपयांनी वाढले. म्हणजेच, पाकिस्तान दररोज सरासरी २० अब्ज रुपयांचे कर्ज घेत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिलेल्या आकडेवारीनुसार, या काळात सरकारचे देशांतर्गत कर्ज ११,३०० अब्ज रुपयांनी वाढले तर, बाह्य कर्ज ८६९ अब्ज रुपयांनी वाढले आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाकिस्तानचे एकूण कर्ज ७६,९७९ अब्ज रुपये झाले आहे, जे फेब्रुवारी २०२४ मध्ये ६४,८१० अब्ज रुपये होते.
16 Dec 2025 01:28 PM (IST)
भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामध्ये सध्या आशिया कप अंडर 19 चा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. भारताच्या संघाने झालेल्या दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्याने दुबईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 171 धावांची खेळी खेळली होती. तर आज सुरु असलेल्या सामन्यामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकावले पण तो त्याची खेळी मोठी खेळण्यात अपयशी ठरला.
16 Dec 2025 01:20 PM (IST)
सॅमसंग स्मार्टफोन खलरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. यावेळी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने कोणत्याही सेलची घोषणा केली नाही. हा सेल सॅमसंगने सुरु केला आहे. सॅमसंगने ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काही दिवस आधीच एका सेलची घोषणा केली आहे. हा सेल फ्लिपकार्टवर सुरु झाला आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर Samsung Galaxy Days 2025 चे आयोजन केले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरु झाला आहे.
16 Dec 2025 01:10 PM (IST)
मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरुन गेला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये फक्त कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही. या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी धाव घेतली आहे. या अर्जावर आज उर्वरीत युक्तीवाद आज (दि.16) होणार आहे.
16 Dec 2025 01:05 PM (IST)
मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्या आहेत. अशातच आता आज आदित्य ठाकरे मुंबई शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. आज सायंकाळी सहा वाजता वरळी येथील एनएससीआय डोम इथे आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आजच मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
16 Dec 2025 12:55 PM (IST)
पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार या मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. पिंपरीमधील भाजपचे नगरसेवक अश्विनी जाधव, शिवसेनेच्या शहरप्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
16 Dec 2025 12:45 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
16 Dec 2025 12:32 PM (IST)
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीबाबत ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
16 Dec 2025 12:31 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मल्लिक यांच्यासोबत इशान सिद्दीकी, व सना मलिक आज संवाद साधणार आहे. आगामी महापालिक निवडणु बाबत दोघे चर्चा करणार आहेत.
16 Dec 2025 12:00 PM (IST)
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर भाजपकडे इच्छुकांच्या रांगा वाढल्या आहेत. अनेकांनी तिकीटासाठी भाजपकडे जाण्यास सुरुवात केली आहे. देशात, राज्यात सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.
16 Dec 2025 11:50 AM (IST)
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील माजी महापौरासह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे.मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे.
16 Dec 2025 11:40 AM (IST)
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंची युती कधी होणार याबाबत खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का?. ठाकरे बंधुंना हा प्रश्न का विचारता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आमच्याशी युती करा युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन” असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं.
16 Dec 2025 11:34 AM (IST)
अलीकडे एक घटना समोर आली आहे ज्यात प्रियकराला कोर्टात लग्नाच्या प्रोसेस दरम्यान हे समजलं की तो ज्या मुलीसोबत लग्नाचं स्वप्न बघत आहे तिचं आधीच दुसऱ्या कोणाशी लग्न झालेलं आहे.