Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खेळाडूंच्या 5 टक्के आरक्षणाचे सुधारित धोरण मंजूर करण्यात आले. यासोबतच सार्वजनिक आरोग्यासाठी ‘प्रगती’ प्रकल्पासह सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 06:10 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • खेळाडूंच्या नोकरीतील 5% आरक्षणासाठी सुधारित धोरण मंजूर.
  • सार्वजनिक आरोग्यासाठी 2026-31 दरम्यान ‘प्रगती’ प्रकल्प राबवणार.
  • माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाला मंजुरी.
 

Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (8 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित अनेक निर्णय (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आले. त्यामध्ये खेळाडूंच्या सरकारी नोकरीतील आरक्षणाचं सुधारित धोरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी ‘प्रगती’ प्रकल्प आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत कोणते मोठे निर्णय झाले?

  • खेळाडूंसाठी 5 टक्के आरक्षणाचं सुधारित धोरण
यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रांमध्ये नोकरी मिळण्यासाठी असलेल्या 5 टक्के आरक्षणाबाबत सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यापूर्वीचे शासन निर्णय, शुद्धिपत्रके, परिपत्रक आणि पत्रं रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाशी संबंधित आहे.
  • सार्वजनिक आरोग्यासाठी ‘प्रगती’ प्रकल्प
राज्यातील प्राथमिक आरोग्य व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी PRAGATI (Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration) हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 2026 ते 2031 या पाच वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास आणि त्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

  • उद्योग आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीत ह्योसंग इंडिया प्रा. लि. यांना भांडवली अनुदान देण्यासही मंजुरी देण्यात आली. हा निर्णय वस्त्रोद्योग विभागाचा आहे. तसंच सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयासाठी आवश्यक पदं आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
  • मुंबई आणि नागपूरसाठीही महत्त्वाचे निर्णय
मुंबईतील कैवल्यधाम ईश्वरदास चुन्नीलाल योगिक सेंटरच्या भाडेपट्ट्याचं सवलतीच्या दरात नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.

चेंबूर येथील भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशन संस्थेला त्यांच्या वहिवाटीतील जमीन देण्यासही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.

दरम्यान, नागपूरमधील कोराडी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Pune Prabhag Samiti: पुणे पालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी चुरस! ४५ जागांसाठी २९८ अर्ज

एकंदरीत, आजच्या बैठकीत क्रीडा, आरोग्य, उद्योग, न्यायव्यवस्था आणि महसूल विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात आले. विशेषतः खेळाडूंच्या 5 टक्के आरक्षणाचं सुधारित धोरण आणि आरोग्य क्षेत्रातील ‘प्रगती’ प्रकल्प हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

Web Title: Maharashtra cabinet decisions devendra fadnavis sports reservation pragati project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Cabinet Decision
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
1

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
3

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
4

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.