Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Meeting Decision: १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये,  महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, दिव्यांग व्यक्ती, सिंचन, उद्योग, विमानसेवा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचे अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2026 | 03:35 PM
शेतकऱ्यांची महत्त्वाचा निर्णय! १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

शेतकऱ्यांची महत्त्वाचा निर्णय! १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Follow Us
Follow Us:
  • मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय!
  • १.५ कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये
  • बजाज ऑटोला ६६.८२ कोटींचे अनुदान
Cabinet Meeting Decision: महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग नागरिक, औद्योगिक विकास, सिंचन व्यवस्था, विमानसेवा आणि प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे शेतीला आर्थिक मदत, रोजगार व्यवस्थेतील बदल आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाचील 12 महत्त्वाचे निर्णय

• राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील दिड कोटी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रीम मिळणार. पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम मिळणार. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे अग्रीम जमा होणार. (मदत व पुनर्वसन विभाग)

• मातोश्री ग्रामसमृद्धी शेत- पाणंद रस्ते योजना विकसित भारत – जी राम जी योजनेसोबतच विविध योजनांच्या समन्वयातून सुरु ठेवली जाणार. या राज्यस्तरीय योजनेस जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे करता येणार, त्यासाठी योजनेला जिल्हास्तरीय योजना म्हणूनही मान्यता. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समितीला अधिकार देण्यास मंजुरी ( रोजगार हमी योजना विभाग)

Dhule Accident News: धुळ्यात काळाचा घाला! न्यायालयीन काम आटोपून परतणाऱ्या दोन चुलत भावांचा भीषण अपघातात मृत्यू

• राज्यातील दिव्यांग जनांच्या कल्याणासाठी महत्वाचे पाऊल. दिव्यांगांसाठीच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत एक टक्के निधीचा वापर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. (दिव्यांग सक्षमीकरण विभाग)

• जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित. नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. (जलसंपदा विभाग )

• पुण्यातील लोहगाव येथे भारत मंडपमच्या उभारणीस गती मिळणार. पुणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील लोहगाव येथील खेळाचे मैदानाच्या आरक्षणात बदल करून या ठिकाणी नवी दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शन केंद्र होणार. (नगर विकास)

• महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत बजाज ऑटो लिमिटेड कंपनीला ई-व्हेईकल निर्मितीसाठी ६६ कोटी ८२ लाख रुपये देण्यास मंजुरी. (परिवहन विभाग)

• सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळासाठीची विमान सेवा नव्या दमाने सुरु होणार. नवी मुंबई चिपी(सिंधुदुर्ग)- नवी मुंबई आणि नवी मुंबई-चिपी (सिंधुदुर्ग) हवाई मार्गाकरिता विमान कंपन्यांना शंभर टक्के ( व्यवहार्यता तफावत निधी – Viability Gap Funding) निधी देण्यास मंजुरी. (सामान्य प्रशासन- विमानचालन विभाग)

• लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथील मल्हारराव होळकर भटक्या विमुक्त जमाती सहकारी सूतगिरणीला शासन अर्थसहाय्य मिळणार. (वस्त्रोद्योग विभाग)

• महाराष्ट्र सार्वजनिक-खाजगी भागीदारी धोरण (पीपीपी) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. प्रकल्पांची छाननी, तत्वतः मान्यता, प्रस्तावासाठी विनंती, व्यवहार संरचना, निविदा प्रक्रीया व बोली या टप्प्यांचे सुनियोजन होणार. (नियोजन विभाग)

• राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आता सहायक प्रशासन अधिकारी असे एकच पद राहणार. लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी (एस – १३) आणि सहायक प्रशासन अधिकारी (एस-१४) हे दोन संवर्ग एकत्रित करण्यात येणार. त्यामुळे सहायक प्रशासन अधिकारी (एस-१४) असा एकच संवर्ग राहणार. (ग्राम विकास विभाग)

• धुळे जिल्ह्यातील मौजे रावेर येथील जमीन एमआयडीसीली देण्यास मंजुरी. रावेर येथील २८९ हेक्टर ६९आर जमीन प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे यांना एमआयडीसीच्या विस्तारासाठी उपलब्ध करुन देण्यास मंजुरी. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी. प्र – कुलगुरू पदावरील व्यक्तीस हटविण्याचे अधिकार कुलपती यांना मिळणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार आहे?

    Ans: मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अग्रीम देण्यात येणार आहे. पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाणार आहे.

  • Que: बजाज ऑटोला किती निधी मंजूर झाला आहे?

    Ans: महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी बजाज ऑटो लिमिटेडला ६६ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  • Que: मंत्रिमंडळाने विमानसेवा आणि पायाभूत सुविधांबाबत कोणते निर्णय घेतले?

    Ans: नवी मुंबई–चिपी (सिंधुदुर्ग) विमान मार्गासाठी विमान कंपन्यांना १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुण्यातील लोहगाव येथे भारत मंडपमच्या धर्तीवर राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला आणि जलसंपदा विभागाच्या ३९,७२२ पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra cabinet decisions farmers diwali aid 5000 pune bharat mandapam ev policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Cabinet Meeting
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात
1

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा
2

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?
3

Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत वादाची ठिणगी? शिंदे गटाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार, नेमकं कारण काय?

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन
4

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.