Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल, दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार, Urban Challenge Fund, ST बसस्थानकांचा PPP विकास, बीड क्रीडा संकुलासाठी निधी आणि अन्य महत्त्वाचे निर्णय मंजूर.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 04:03 PM
Devendra Fadnavis Super CM, Maharashtra Government Business Rules 2026,

Devendra Fadnavis Super CM, Maharashtra Government Business Rules 2026,

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल करण्यात आला असून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सहकार व पणन मंत्रालय

पालघर जिल्ह्यातील दापचरी (ता. डहाणू) येथील दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार आणि आधुनिक पणन सुविधा उभारण्यात येणार असून पालघर, ठाणे आणि परिसरातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

  • ५० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा रद्द.
  • सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना नियमित कर्जमाफीचा लाभ.
  • २०२६-२७ मधील नियमित कर्जफेडीची अट हटविण्यात आली.
  • त्यामुळे आणखी २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार.
Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

नगर विकास मंत्रालय

राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण (Monetisation) धोरण मंजूर करण्यात आले आहे. यामुळे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना त्यांच्या मालमत्तांमधून अधिक पारदर्शक आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील.

तसेच केंद्र सरकारच्या Urban Challenge Fund अभियानाची अंमलबजावणी करण्यालाही मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून शहरांना आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बाजाराधारित वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे.

क्रीडा मंत्रालय

बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २४.९५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल व हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान, इनडोअर हॉलचे आधुनिकीकरण, वसतिगृह विस्तार आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा समावेश आहे.

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर; कृषीमंत्र्यांनी सांगितले विलंबाचे कारण

महिला व बाल विकास मंत्रालय

अपराधी परिविक्षा अधिनियम, १९५८ अंतर्गत मुक्तबंदी व परिविक्षाधीन बंदी यांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदान योजनेच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ करण्यात येणार आहे. निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा योजनेत समावेश करुन योजनेअंतर्गत सहायक अनुदान आता पंचवीस वरून पन्नास हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

गृह – परिवहन विभाग

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या – एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास होणार असून पीपीपी तत्वावर जिल्हा, तालुका व ग्रामीण भागातील बसस्थानक व महामंडळाच्या जागांचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra cabinet decisions farmers loan waiver urban challenge fund dapchari market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadnavis
  • maharashtra
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
1

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
3

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.