Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis On TCS Case: “कोणालाही पाठीशी…TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग”; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) नाशिक घोटाळ्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 01:56 PM
"कोणालाही पाठीशी...TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

"कोणालाही पाठीशी...TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

Follow Us
Follow Us:

Devendra Fadnavis On TCS Case News In Marathi: नाशिक टीसीएस घोटाळ्यात एक मोठा खुलासा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एचआर प्रमुखाबद्दल निदा खानच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याचदरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) नाशिक घोटाळ्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराप्रकरणी नाशिकमध्ये एका महिला कर्मचाऱ्यासह सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

TCS Nashik case: TCS नाशिक प्रकरणात मोठा खुलासा; मास्टरमाइंड निदा खान गर्भवती आहे की नाही? कोर्टाने दिलं स्पष्टीकरण

नाशिक टीसीएस प्रकरणात मोठा कट

“नाशिकमधील हे प्रकरण खूप गंभीर आहे. याच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय. टीसीएसमधील प्रकरण हा एका कटाचा भाग आहे. कंपनीने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची टीसीएसची भूमिका आहे. या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत याचा आम्ही तपास करु. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदत घेतली जाईल,” असं मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संघटित टोळी असल्याचा पोलिसांना संशय

गुरुवारी, पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींची ओळख रझा रफीक मेमन (३५) आणि शफी बिखान शेख (३६) अशी पटली आहे. एका संबंधित प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन महिला आरोपींच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना बुधवारी सांगितले की, अटक केलेल्या युनिटच्या ऑपरेशन्स आणि एचआर प्रमुखाने कथितरित्या एका पीडितेला तक्रार दाखल करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांनी पुढे सांगितले की, एचआर प्रमुखाने त्या महिलेला “अशा गोष्टी घडतात” असे सांगितले होते, ज्यामुळे आरोपींना पाठिंबा मिळाला होता. दोन महिला आरोपींपैकी एक फरार आहे. त्यांनी सांगितले की तपासात असे उघड झाले आहे की, सात पुरुष आरोपी एक संघटित टोळी म्हणून महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत होते.

आरोप काय आहेत?

या आठवड्याच्या सुरुवातीला, पोलिसांनी तपासासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. आठ महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या महिला कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ झाला, तर एचआर विभागाने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. आरोपी पुरुषांची नावे दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सारी आणि शाहरुख शेख अशी आहेत.

नाशिक धर्मांतर प्रकरण! अखेर फरार निदा खान आली समोर, “मी प्रेग्नंट आहे” म्हणत न्यायालयाकडे मागितला दिलासा

Web Title: Maharashtra cm devendra fadnavis speaks for the first time on the tcs nashik case news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nashik
  • TCS
  • TCS Nashik Case

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
1

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
2

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
3

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
4

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.