Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Top Breaking Stories in India- पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आणि नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 03, 2026 | 12:30 PM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 03 Apr 2026 12:30 PM (IST)

    03 Apr 2026 12:30 PM (IST)

    पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड

    पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुका गुरुवारी बिनविरोध पार पडत जिल्हा परिषदेच्या राजकारणात सहमतीचा सूर उमटला. यापूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुका देखील अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध झाल्या होत्या. त्याच धर्तीवर विषय समित्यांची निवडणूकही एकमताने पूर्ण करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी भाजप नेते प्रदीप कंद यांच्यावर हलक्याफुलक्या शब्दांत टोला लगावला. हे आमचे जुने सहकारी आहेत. आमचं ट्युनिंग चांगलं जमतं,” असे म्हणत त्यांनी भविष्यात एकत्रितपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये पूर्वीच चर्चा झाली होती. त्यानुसार सर्वांनी एकमताने ही निवडणूक पार पाडली. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी अमोल नलावडे, महिला व बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील, तर समाजकल्याण सभापतीपदी जितेंद्र बडेकर, दीपाली खुलावळे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन करताना विषय समित्यांमध्ये विरोधी पक्षांनाही योग्य सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

  • 03 Apr 2026 12:20 PM (IST)

    03 Apr 2026 12:20 PM (IST)

    दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली

    तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. भरत पोपट गायकवाड (वय ४६, रा. कान्हूरमेसाई, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 03 Apr 2026 12:10 PM (IST)

    03 Apr 2026 12:10 PM (IST)

    पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग

    अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकारी ‘ऑन फिल्ड’ हाेते असा दावाही प्रशासनाने केला आहे.

  • 03 Apr 2026 12:07 PM (IST)

    03 Apr 2026 12:07 PM (IST)

    मिरा रोडमध्ये स्पाच्या आड देहव्यापाराचा भंडाफोड; १४ महिलांची सुटका

    महाराष्ट्रातील मिरा रोड पूर्व परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे पोलिसांनी स्पा सेंटरच्या आड चालवण्यात येणाऱ्या कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डीसीपी राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत ‘तनिष्क स्पा’वर छापा टाकून पोलिसांनी १४ महिलांची या रॅकेटमधून सुटका केली आहे. यामध्ये थायलंड आणि भारतातील महिलांचा समावेश आहे.
    पोलिसांनी घटनास्थळावरून ३ आरोपींना अटक केली असून, हे आरोपी संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात स्पाच्या आडून दीर्घकाळापासून बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे.

  • 03 Apr 2026 11:56 AM (IST)

    03 Apr 2026 11:56 AM (IST)

    साखरपा येथे खासगी बसला भीषण आग; ३० प्रवासी थोडक्यात बचावले

    संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागून गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) यांच्या ताब्यातील एनएल ०१ बी २४४२ क्रमांकाची प्रवासी ट्रॅव्हल्स पुणे येथून सायंकाळी सहाच्या सुमारास ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे निघाली होती. ही गाडी पहाटे सुमारे ३.३० वाजता साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर पोहोचताच अचानक वाहनातून धूर आणि नंतर ज्वाळा उठताना चालकाच्या निदर्शनास आले.

  • 03 Apr 2026 11:48 AM (IST)

    03 Apr 2026 11:48 AM (IST)

    आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान

    चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेला गेली अनेक वर्षे प्रगतीपथावर नेणारे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय श्री. सुभाषराव चव्हाण यांना ‘नवभारत–नवराष्ट्र समूहातर्फे आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सहकार, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुभाषराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजाची छाप उमटवली.

  • 03 Apr 2026 11:43 AM (IST)

    03 Apr 2026 11:43 AM (IST)

    इराण-इस्रायल युद्धाची झळ अहिल्यानगरच्या 'चुली'पर्यंत, व्यावसायिक गॅस महाग मिळत असल्याने हॉटेल चालकांचे कंबरडे मोडले

    जागतिक राजकारणात इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट फटका आता ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग मिळत असल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपला मोर्चा आता पारंपरिक चुलींकडे वळवला आहे. वाढत्या खर्चामुळे हॉटेल चालवणे कठीण झाल्याने जिल्ह्यातील अनेक धाब्यांवर आणि उपाहारगृहांमध्ये आता चुलीवरचा स्वयंपाक शिजताना पाहायला मिळत आहे.

  • 03 Apr 2026 11:37 AM (IST)

    03 Apr 2026 11:37 AM (IST)

    संसद अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू होणार

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून 816 करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेण्याचा आणि महिलांच्या राखीव जागांचा कायदा लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न असणार आहे. १६ ते १८ एप्रिल यादरम्यान अधिवेशन होणार आहे.

  • 03 Apr 2026 11:28 AM (IST)

    03 Apr 2026 11:28 AM (IST)

    काल पुण्यात 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद

    पुण्याला काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे पुणेकरांना चक्क पाण्याखाली गेलेल्या रस्ताने प्रवास करावा लागला. अनेकांना या अवकाळी पावसाचा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आता कालचा हा मुसळधार पाऊस पुण्यात तब्बल 130 वर्षांनी पडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 130 वर्षानंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर काल पुण्याच 65 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय आहे.

  • 03 Apr 2026 11:16 AM (IST)

    03 Apr 2026 11:16 AM (IST)

    बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार

    बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याला काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे.

  • 03 Apr 2026 11:05 AM (IST)

    03 Apr 2026 11:05 AM (IST)

    खासदार राघव चड्ढा यांनी एक्सवर शेअर केला भाषणांचा व्हिडिओ

    आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • 03 Apr 2026 10:45 AM (IST)

    03 Apr 2026 10:45 AM (IST)

    7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच

    Realme Smartphone Launched: टेक कंपनी रिअलमीने भारतात Realme 16 5G या नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन तगडा प्रोसेसर आणि दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत सादर केला आहे. कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर काही ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

  • 03 Apr 2026 10:35 AM (IST)

    03 Apr 2026 10:35 AM (IST)

    दंड भरण्यास नकार; पैसे देण्याऐवजी तुरुंगात जाण्यास राजपाल यादव तयार

    ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि विनोदी कलाकार राजपाल यादव यांच्या चेक बाऊन्स प्रकरणातील कायदेशीर अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आहेत. ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात त्यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली होती. एका कौटुंबिक लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्याने जामिनासाठी अर्ज केला आणि तक्रारदाराकडे १.५ कोटी रुपये जमा केले, त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी दिलासा मिळूनही राजपाल यादव यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उच्च न्यायालयाने त्यांच्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला आहे.

  • 03 Apr 2026 10:25 AM (IST)

    03 Apr 2026 10:25 AM (IST)

    इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला तडाखा 

    दुबई/नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे गंभीर परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागले आहेत. इराणने 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज'मधील जलवाहतुकीवर नियंत्रण मिळवल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडले आहेत. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तान आणि श्रीलंकेला बसला असून, तिथे पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, या देशांना लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.

  • 03 Apr 2026 10:20 AM (IST)

    03 Apr 2026 10:20 AM (IST)

     अमेरिकेचे आपल्या नागरिकांना ४८ तासांत इराक सोडण्याचे आदेश

    वॉशिंग्टन/बगदाद: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, इराकमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना पुढील ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे कडक आदेश दिले आहेत.

    अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या या तातडीच्या आदेशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. काहीतरी मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने जॉर्डनमधील अमेरिकन तळाला लक्ष्य करत जोरदार क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्याचे भीषण चित्रण असलेले व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकेने अधिक घातक हल्ले करण्याची धमकी दिल्याने अनेक देश 'अलर्ट मोड'वर आले आहेत. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिका प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

  • 03 Apr 2026 10:16 AM (IST)

    03 Apr 2026 10:16 AM (IST)

    खरातकडे स्वेच्छेने जाणाऱ्या महिलांवरही कारवाई करा; लेखिका अरुणा सबाने यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात केवळ खरातवरच नाही, तर त्याच्याकडे स्वेच्छेने जाणाऱ्या महिलांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांनी केली आहे.

    अरुणा सबाने यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.उपलब्ध व्हिडीओ आणि फोटोंचे निरीक्षण केले असता, संबंधित महिलांना तिथे जबरदस्तीने आणले आहे असे वाटत नाही. तसेच त्यांना गुंगीचे औषध दिल्याचेही दिसून येत नाही, असे निरीक्षण सबाने यांनी नोंदवले आहे.

  • 03 Apr 2026 10:15 AM (IST)

    03 Apr 2026 10:15 AM (IST)

    भोंदू अशोक खरातचा कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड

    पुणे: भोंदू बाबा अशोक खरात याने १३० बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. जगदंबा आणि समता पतसंस्थेच्या माध्यमातून हा मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    पोलिसांच्या आदेशानुसार समता पतसंस्थेने १०० हून अधिक खात्यांचे व्यवहार तातडीने 'होल्ड'वर ठेवले आहेत. या होल्ड केलेल्या खात्यांमध्ये रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर, काही बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या खात्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 03 Apr 2026 10:10 AM (IST)

    03 Apr 2026 10:10 AM (IST)

    बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक, काँग्रेस दोन्ही जागा लढवणार  

    मुंबई: राज्यातील आगामी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला असून पक्षश्रेष्ठींकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. यावेळी स्थानिक राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राहुरी मतदारसंघासाठी उमेदवार निश्चितीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इच्छुकांची मोठी संख्या पाहता, पक्ष नेतृत्व अत्यंत काळजीपूर्वक उमेदवाराची निवड करणार आहे.

Maharashtra to World Breaking News:  आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

पुणेकरांनो सावध रहा! जिल्ह्यासाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली असून ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असला, तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, सायंकाळच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी आणि नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra desh videsh live news 3rd april breaking news politics economy top news live blog marathi breaking news maharashtra politics today stock market india ipl 2026 live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
1

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
2

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
3

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
4

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.