Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

महायुतीमध्ये भुकंप होणार असून तब्बल 50 आमदार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. थेट आकडा सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 02, 2026 | 01:19 PM
maharashtra-politics MP Sanjay Raut press conference on Shivsena and ajit pawar group mla will join bjp

maharashtra-politics MP Sanjay Raut press conference on Shivsena and ajit pawar group mla will join bjp

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स
  • खासदार राऊतांचा राज्यात पुन्हा भूकंप होण्याचा दावा
  • 50 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये लवकरच पुन्हा एकदा राजकीय स्फोट होण्याचा दावा केला जात आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी याबाबत धक्कादायक असे विधान केले. महायुतीमध्ये भुकंप होणार असून तब्बल 50 आमदार हे भाजपमध्ये (BJP Politics) जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. थेट आकडा सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय वक्तव्य केली आहेत. तसेच राज्यामध्ये लवकरच गौप्यस्फोट होणार असल्याचा दावा त्यांनी केला. खासदार राऊत म्हणाले की, “मी वारंवार हेच सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतील असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षाने का बोलावे हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिले, कोणती पद दिले हा त्यांचा विषय आहे. पण भविष्यामध्ये या पक्षातील २५-३० आमदारांसह हा पक्ष भाजपामध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे आताच सांगत नाही,’ असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुढे संजय राऊत यांनी भाजपमध्ये जाणाऱ्या आमदारांचा थेट आकडा सांगितला. ते म्हणाले की, “पुढील काही काळात शिंदेसेनेतील २५ आमदार हे भाजपामध्ये जातील. हे आमदार भाजपामध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावे लागेल,” असे राऊतांनी म्हटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा :  तो आक्षेपार्ह व्हिडिओ अन् पक्षाची झाली थू-थू; सुनेत्रा पवारांचा थेट झिरवळांना फोन

शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर 

शिवसेना शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीसाठी ठाकरे गटाचे दोन खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनरसाठी ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख उपस्थित होते. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळचे खासदास संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते.यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर, आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश आष्टीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

 

Web Title: Maharashtra politics mp sanjay raut press conference on shivsena and ajit pawar group mla will join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.