पाऊस पुन्हा दगा देणार? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र
राज्य सरकारने नुकताच राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर – 1 दुष्काळ जाहीर (Maharashtra Drought) केला आहे. राज्यातील सुमारे 75% भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून लोकांना दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागत आहेत. यातच आता पुन्हा अतिशय चिंताजनक बातमी समोर येत असून पुढच्या वर्षाच्या पावसाबाबतही महत्वाची बातमी समोर येत आहे. आधीच महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना पुढच्या वर्षाच्याही पावसाची चिंता वाढवणार वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात शेती, पिण्याचं पाणी आणि इतर पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीच्या मान्सूनबाबतही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एल निनोचा प्रभाव कायम राहिल्यास महाराष्ट्रासमोर पुन्हा पावसाचं संकट उभं राहू शकतं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
“आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावं लागेल,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्या असलेला एल निनो अद्याप शिगेला पोहोचलेला नसून तो फेब्रुवारीच्या आसपास पीकवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
पावसाने पुन्हा घेतली उघडीप; राज्यात मोठ्या पावसाचा इशारा नाही, काही भागांत मेघगर्जनेसह सरींची शक्यता
पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढल्यामुळे एल निनोची स्थिती तयार होते. याचा परिणाम जगभरातील हवामानावर होऊ शकतो. भारताच्या मान्सूनवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रासाठी ही बाब महत्त्वाची ठरते.
दरम्यान, राज्य सरकारने शनिवारी 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित भागात दुष्काळी उपाययोजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सरकारला आता अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.
दरम्यान, गडचिरोलीतील भामरागड परिसरात छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही नागरिकांना रेस्क्यू टीमच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आज दुपारपर्यंत पुराचं पाणी ओसरण्याची शक्यता असून परिस्थिती नियंत्रणात येईल, असा अंदाज फडणवीस यांनी व्यक्त केला.
एकीकडे राज्यातील मोठा भाग दुष्काळाच्या छायेत असताना दुसरीकडे काही भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासमोर पुढील काळात पाणी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान असणार आहे.
मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी






