महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. यावर्षी लातूर विभागातील तब्बल 123 विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षेत 100 टक्के मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर पुणे विभागाचा निकालात दुसरा क्रमांक लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे प्रमुख गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 95.81 इतकी आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. या वर्षभरात 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 25,770 पुनर्परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,327 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी 12,958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 51.16 इतकी आहे.
तर दुसरीकडे गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्यातील 151 विद्यार्थ्यांपैकी लातूरमधील 108 विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले होते. 2022 मध्ये राज्यातील 122 विद्यार्थ्यांपैकी लातूरच्या 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून लातूरची गुणवत्ता सिद्ध केली असती. तिच परंपरा लातूरच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा राज्यात 81 हजार 991 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच 5 लाख 58 हजार 21 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. विशेषत: 100% गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.
येथे चेक करा दहावीचा निकाल
1. https://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://sscresult.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
5. https://results.targetpublications.org